कर्नाटकला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. दक्षिण भारतीय पदार्थ जगभरात सगळीकडे प्रसिद्ध आहेत. या पदार्थांची चव चाखल्यानंतर मनाला सुख मिळते. तिथे मिळणारा प्रत्येक पदार्थ पारंपरिक चवीचा आणि सुगंधी मसाल्यांचा वापर करून बनवला जातो. कर्नाटकमधील शाहाकारी पदार्थ चवीसोबतच आरोग्यासाठी सुद्धा अतिशय गुणकारी आहे. तिथे केवळ इडली डोसाचं नाहीतर अनेक वेगवेगळे पारंपरिक पदार्थ खूप फेमस आहे. चला तर जाणून घेऊया या पदार्थांची यादी. (फोटो सौजन्य – istock)
कर्नाटकमध्ये केवळ इडली डोसाचं नाहीतर तर 'हे' पदार्थ सुद्धा आहेत खूप फेमस

मंगळुरूचा पातळ आणि मऊ नीर डोसा जगभरात सगळीकडे फेमस आहे. या पदार्थाची चव चाखण्यासाठी लांबून पर्यटक कर्नाटकमध्ये जातात. नीर डोसा नारळाच्या चटणीसोबत किंवा टोमॅटो चटणीसोबत सुंदर लागतो.

पारंपरिक डाळ तांदुळाच्या इडलीपेक्षा रवा इडली चवीला अतिशय वेगळी लागते. मऊ आणि झटपट तयार होणारी इडली सांबार किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता.

दक्षिण भारतातील फेमस पदार्थ म्हणजे नाचणीच्या पिठाचे रागी मुड्डे. हा पदार्थ कोणत्याही चिकन रस्सा किंवा आमटी सोबत अतिशय सुंदर लागतो.

उद्दपी स्टाईल मसाला सांबर चवीला अतिशय सुंदर लागते. आंबटगोड सांबर संपूर्ण जेवणाची चव वाढवतो. डोसा, इडली किंवा वड्यासोबत तुम्ही सांबर खाऊ शकता.

म्हैसूर पाक हा चणाडाळ, तूप आणि साखरेपासून बनवला जातो. याशिवाय त्यात केशराची सुंदर चव लागते. घरातील शुभ प्रसंगी गोड पदार्थांमध्ये मैसूर पाक आवडीने आणला जातो.






