Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Election Result : राज्यातील 12 जिल्हा परिषदांसह 125 पंचायत समितींचे निकाल आज; मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

निवडणुकीच्या आयोजित कार्यक्रमानुसार, ५ फेब्रुवारीला मतदान होऊन ७ फेब्रुवारीला निकाल जाहीर केले जाणार होते. मात्र, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 09, 2026 | 07:14 AM
Election Result : राज्यातील 12 जिल्हा परिषदांसह 125 पंचायत समितींचे निकाल आज; मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

Election Result : राज्यातील 12 जिल्हा परिषदांसह 125 पंचायत समितींचे निकाल आज; मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

Follow Us
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांसाठी शनिवारी मतदान पूर्ण झाले. आता या निवडणुकीचे निकाल आज (दि.9) जाहीर केले जाणार आहेत. या निवडणुकीची मतमोजणी सकाळी दहापासून सुरु होणार असल्याची माहिती दिली जात आहे. त्यानंतर राज्यातील निवडणुकीचे कल समोर येणार आहेत. यामुळे राज्यभरातील ७४३८ उमेदवारांची धाकधूक आणखी वाढली आहे.

निवडणुकीच्या आयोजित कार्यक्रमानुसार, ५ फेब्रुवारीला मतदान होऊन ७ फेब्रुवारीला निकाल जाहीर केले जाणार होते. मात्र, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. आता या निवडणुकीत राज्यभरातील ७४३८ उमेदवारांचे भवितव्य मतयंत्रात बंद झाले आहे. १२ जिल्हा परिषद क्षेत्रात सकाळी ७:३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. जिल्हा परिषदेच्या ७३१ जागांसाठी एकूण २६२४ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीची मतमोजणी आज होणार असून, त्यानंतर आचारसंहिता उठवली जाणार आहे.

हे देखील वाचा : मोठी बातमी ! दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर घेतला जाणार महत्त्वाचा निर्णय; ‘या’ तारखेला मोठ्या घडामोडी घडणार?

राज्य आयोगाच्या माहितीनुसार, दुपारी दीड वाजेपर्यंत अंदाजे ३७.९४% मतदान झाले होते. रायगड, सोलापूर, सातारा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ईव्हीएम संदर्भात तक्रारी समोर आल्या असून, अनेक ठिकाणी मतदान प्रक्रिया काही काळ ठप्प झाली होती. पण नंतर प्रशासनाकडून त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात आली.

नावांबाबत होता किरकोळ गोंधळ

काही ठिकाणी सकाळच्या वेळेत मतदार यादीतील नावांबाबत किरकोळ गोंधळ निर्माण झाला. प्रशासनाने तातडीने मदत कक्ष सक्रिय करून समस्या सोडवल्याने मतदानावर फारसा परिणाम झाला नाही. तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी राखीव यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.

सध्याचे मुद्दे लक्षात घेतले अन् बजावला हक्क

स्थानिक प्रश्नांवर मतदारांनी मतदान केल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि ग्रामीण विकास हे मुद्दे केंद्रस्थानी असल्याचे मतदारांच्या प्रतिक्रियांतून स्पष्ट झाले. प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर आज प्रत्यक्ष निर्णयाचा दिवस असल्याची भावना सर्वत्र जाणवत होती.

हे देखील वाचा : ११११ शेतकऱ्यांना मिळाली यंत्र-अवजारे! कृषी यांत्रिकीकरण योजनाः ‘प्रथम अर्ज’ करणाऱ्याला ‘प्रथम प्राधान्य’

Web Title: Results of 12 zilla parishads and 125 panchayat samiti in maharashtra will be declared today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 07:10 AM

Topics:  

  • Election Result
  • Maharashtra Politics
  • Panchayat Samiti Elections
  • Zilla Parishad

संबंधित बातम्या

Maharashtra Political: वेळ आली तर दोन्ही जागा भाजप स्वबळावर लढणार; जयकुमार गोरेंचा इशारा
1

Maharashtra Political: वेळ आली तर दोन्ही जागा भाजप स्वबळावर लढणार; जयकुमार गोरेंचा इशारा

KDMC Politics: बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या नरेंद्र पवारांना अटक कधी? वरुण सरदेसाईंचा सवाल
2

KDMC Politics: बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या नरेंद्र पवारांना अटक कधी? वरुण सरदेसाईंचा सवाल

Aditya Thackeray Arrest News: आदित्य ठाकरेंना अटक होणार? दिशा सालियन प्रकरणात अडचणी वाढणार
3

Aditya Thackeray Arrest News: आदित्य ठाकरेंना अटक होणार? दिशा सालियन प्रकरणात अडचणी वाढणार

Eknath Shinde : ‘गावी आलो, लंडनला गेलो तरी विरोधकांना पोटदुखी’; दरे गावातून एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला
4

Eknath Shinde : ‘गावी आलो, लंडनला गेलो तरी विरोधकांना पोटदुखी’; दरे गावातून एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.