Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दरवाढीच्या निषेधार्थ ठाकरे गटाचा साताऱ्यात एल्गार; मोती चौकात घोषणाबाजी, अनेक मुद्द्यांवर सरकारला धरले धारेवर

महिला आणि लहान मुलींवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांबाबत सरकारकडून प्रभावी उपाययोजना होत नसल्याचा आरोप करत आंदोलकांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केला. आंदोलनावेळी विविध घोषणांनी मोती चौक परिसर दणाणून गेला.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 28, 2026 | 11:26 AM
दरवाढीच्या निषेधार्थ ठाकरे गटाचा साताऱ्यात एल्गार; मोती चौकात घोषणाबाजी, अनेक मुद्द्यांवर सरकारला धरले धारेवर

दरवाढीच्या निषेधार्थ ठाकरे गटाचा साताऱ्यात एल्गार; मोती चौकात घोषणाबाजी, अनेक मुद्द्यांवर सरकारला धरले धारेवर

Follow Us
Follow Us:

सातारा : राज्यात वाढत चाललेली महागाई, स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीची प्रकरणे तसेच महिला आणि बालकांवरील अत्याचारांच्या घटनांविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने बुधवारी साताऱ्यात तीव्र आंदोलन छेडले. शहरातील मोती चौक परिसरात झालेल्या या आंदोलनात महायुती सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार, खासदार अनिल देसाई, उपनेते नितीन बानगुडे पाटील आणि जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. शहरप्रमुख प्रणव सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान पेट्रोल-डिझेल, घरगुती गॅस सिलेंडर, खाद्यतेल आणि सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडल्याचा आरोप करण्यात आला. तसेच वारंवार समोर येणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू असल्याची टीका आंदोलनकर्त्यांनी केली.

महिला आणि लहान मुलींवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांबाबत सरकारकडून प्रभावी उपाययोजना होत नसल्याचा आरोप करत आंदोलकांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केला. आंदोलनावेळी विविध घोषणांनी मोती चौक परिसर दणाणून गेला. सरकारच्या कारभाराविरोधात प्रतिकात्मक निषेध म्हणून नागरिकांना ‘मेलडी’ चॉकलेटचे वाटप करण्यात आले.

अनेक शिवसैनिकांचा आंदोलनात सहभाग

या आंदोलनात शिवा आरोग्य सेना जिल्हाप्रमुख निमिष शहा, तालुकाप्रमुख रमेश बोराटे, गणेश अहिवळे, अतिश ननावरे, रविराज बडदरे, शैलेश बोडके, शिवेंद्र ताटे, प्रशांत इंगळे, तेजस पिसाळ, आशिष पाटणे, जितू कांबळे, सुनील भोसले, अभिषेक भुजबळ, मोहित शहा, सुमित नाईक, अमोल कोंढाळकर यांच्यासह अनेक शिवसैनिक सहभागी झाले होते.

१२ वर्षांत जगणे ६० ते ७० टक्क्यांनी महागले

नेदरलँडमध्ये भारतीय समुदायाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्ध आणि जगासमोरील इतर आव्हानांचा संदर्भ देत आतापर्यंतचा सर्वात मोठा इशारा दिला. ते म्हणाले की, जगातील सातत्याने वाढणारी संकटे त्वरित थांबवली गेली नाहीत, तर गरिबीविरुद्ध दशकांच्या कठोर परिश्रमाने मिळवलेली प्रगती गंभीर धोक्यात येईल. याचा एक अर्थ असाही होतो की, भारतातून अजूनही गरिबीचे पूर्णपणे निर्मूलन झालेले नाही, तसेच मध्यमवर्गीयांचे संकट आगामी काळात अधिक वाढणार आहे. त्यांच्या या विधानामुळे भारतातील गरिबी निर्मूलन, महागाई आणि आकडेवारीचे गुंतागुंतीचे जाळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

उष्माघाताचा धोका वाढतोय; एकाच दिवशी 10 जणांचा मृत्यू, रेल्वेतच पाच जण दगावले

Web Title: Thackeray group launches protest in satara against price hikes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 11:25 AM

Topics:  

  • Satara News
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Satara Municipal Council:२५ कोटींच्या नुकसानभरपाईचे सात कोटींचे गणित कसे? सातारा पालिकेच्या सभेत प्रशासनाची पोलखोल
1

Satara Municipal Council:२५ कोटींच्या नुकसानभरपाईचे सात कोटींचे गणित कसे? सातारा पालिकेच्या सभेत प्रशासनाची पोलखोल

Satara News : सातारा-जावलीच्या आरोग्य व्यवस्थेचा आढावा, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या महत्त्वपूर्ण सूचना
2

Satara News : सातारा-जावलीच्या आरोग्य व्यवस्थेचा आढावा, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या महत्त्वपूर्ण सूचना

मायणी येथील शिंदेवाडी ग्रामस्थांनी शक्तिपीठ महामार्गाची रोखली मोजणी
3

मायणी येथील शिंदेवाडी ग्रामस्थांनी शक्तिपीठ महामार्गाची रोखली मोजणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.