Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘कॅमेऱ्यासमोर डायलॉगबाजी केली म्हणजे तुम्ही फार मोठ्या नेत्या होत नाहीत,’ सुषमा अंधारेंचा नवनीत राणांना टोला

नवनीत राणांच्या उद्धव ठाकरे आणि हनुमान चालीसावरील वक्तव्यानंतर ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारेंनी सोशल मीडियावरून जोरदार प्रत्युत्तर देत त्यांच्या स्वाभिमान आणि राजकीय भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

  • By विवेक
Updated On: Jul 12, 2026 | 10:11 PM
'कॅमेऱ्यासमोर डायलॉगबाजी केली म्हणजे तुम्ही फार मोठ्या नेत्या होत नाहीत,' सुषमा अंधारेंचा नवनीत राणांना टोला

'कॅमेऱ्यासमोर डायलॉगबाजी केली म्हणजे तुम्ही फार मोठ्या नेत्या होत नाहीत,' सुषमा अंधारेंचा नवनीत राणांना टोला

Follow Us
Follow Us:
  • नवनीत राणांच्या उद्धव ठाकरेवरील टीकेला सुषमा अंधारेंनी सोशल मीडियावरून जोरदार प्रत्युत्तर दिले.
  • ‘कॅमेऱ्यासमोर डायलॉगबाजी केली म्हणजे मोठ्या नेत्या होत नाहीत,’ असा टोला अंधारेंनी लगावला.
  • स्वाभिमान, हिंदुत्व आणि भाजप प्रवेशावरून सुषमा अंधारेंनी नवनीत राणांवर अनेक प्रश्न उपस्थित केले.
 

माजी खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीत एका कार्यक्रमात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. “मुख्यमंत्री असतानाच हनुमान चालीसा वाचली असती तर पक्षातील फूट, आमदारांचे बंड आणि पक्षाची पडझड टळली असती,” असे विधान त्यांनी केल्यामुळे आता नवा राजकीय वाद उद्भवला आहे. यावरून आता ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी नवनीत राणांवर अत्यंत शेलक्या शब्दांत टीका केली आहे.

सुषमा अंधारे यांनी आपल्या अधिकृत ‘X ‘ अकाऊंटवरून पोस्ट करत नवनीत राणांना प्रत्युत्तर दिले आहे. ‘कॅमेऱ्यासमोर डायलॉगबाजी केली म्हणजे तुम्ही फार मोठ्या नेत्या होत नाहीत,’ असा टोला लगावत अंधारेंनी नवनीत राणांना प्रत्युत्तर दिले आहे.

‘सरकारने बाभळी पेरली अन् जनतेला आंब्याची स्वप्ने दाखवली’; समृद्धी महामार्गावरून रोहिणी खडसेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

नेमकं काय म्हणाल्या सुषमा अंधारे ?

आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून अंधारे म्हणाल्या, “नवनीत राणा उगा आपलं डायसवर उभे राहिले की, बॉलीवूडच्या कॅमेऱ्यासमोर उभे राहिल्यासारखे डायलॉगबाजी केली म्हणजे तुम्ही फार मोठ्या नेत्या होत नाहीत…!!”

नवनीत राणा
उगा आपलं डायसवर उभे राहिले की, बॉलीवूडच्या कॅमेऱ्यासमोर उभे राहिल्यासारखे डायलॉगबाजी केली म्हणजे तुम्ही फार मोठ्या नेत्या होत नाहीत…!!
ना तुम्हाला हनुमान चालीसा म्हणता येते ना तुम्हाला नीट गणेशविसर्जन करता येतं… कुठल्या हिंदुत्वाच्या बाता.. आणि कसला स्वाभिमान आहे…
— SushmaTai Andhare (@andharesushama) July 12, 2026


“ना तुम्हाला हनुमान चालीसा म्हणता येते ना तुम्हाला नीट गणेशविसर्जन करता येतं… कुठल्या हिंदुत्वाच्या बाता.. आणि कसला स्वाभिमान आहे तुम्हाला…? स्वाभिमान शाबूत असता तर स्वाभिमान युवा मंचाच्या बॅनर वरच निवडणूक लढवून जिंकायचा प्रयत्न केला असता ना…? स्वतःच्या कुटुंबातला पक्ष सोडून खासदारकी मिळावी म्हणून भाजपमध्ये गेलेल्या तुम्ही… अन् तुम्ही नैतिकतेच्या गप्पा मारायच्या होय… ?” असा खोचक सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

काय म्हणाल्या होत्या नवनीत राणा

अमरावतीत एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नवनीत राणा म्हणाल्या की, “ते मुख्यमंत्री असताना त्यांना हनुमान चालीसा नको होती. सत्ता गेल्यानंतरच त्यांना राम आणि हनुमानाची आठवण झाली.”

त्यांनी पुढे आरोप केला की, मुख्यमंत्री असतानाच हनुमान चालीसा वाचली असती तर पक्षातील फूट, आमदारांचे बंड आणि पक्षाची पडझड टळली असती. तसेच स्वतःला तुरुंगात जावे लागलेल्या 14 दिवसांचा अनुभव आपण कधीही विसरणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

‘लोक नगरसेवकपदासाठी लोटांगण घालतात, मी राज्यसभेला ठोकर मारली, दुसऱ्यांच्या दारी गेले नाही’; नवनीत राणांचा टोला

नवनीत राणांचा विरोधकांवर पलटवार

अमरावतीतील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी, “लोक नगरसेवकपदासाठीही लोटांगण घालतात, पण मी स्वाभिमानी असल्याने राज्यसभेसाठी कधीही दुसऱ्यांच्या दारी गेले नाही. त्या संधीला ठोकर मारली. मी शांत आहे, पण शेरनी शांत असली तरी गर्जना करायला विसरत नाही. माझा स्वाभिमान इतका मोठा आहे की, राज्यसभेसाठी मी कोणाच्याही दारात गेले नाही. माझ्या विचारांशी तडजोड करण्यापेक्षा मी ती संधी नाकारली.” असे त्या म्हणाल्या.

Web Title: Sushma andhare slams navneet rana over uddhav thackeray remarks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 10:11 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Navneet Rana
  • sushma andhare
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Disha Salian Case : ‘फालतू चारित्र्यहनन बस्स झालं!’ दिशा सालियन प्रकरणावर उद्धव ठाकरे संतापले
1

Disha Salian Case : ‘फालतू चारित्र्यहनन बस्स झालं!’ दिशा सालियन प्रकरणावर उद्धव ठाकरे संतापले

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड
2

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड

Maharashtra Cabinet Decisions: देवेंद्र फडणवीसांचे मोठे निर्णय! ‘महा-टॅक’ कक्ष स्थापन; साखर कारखान्यांना मिळणार सॉफ्ट लोन
3

Maharashtra Cabinet Decisions: देवेंद्र फडणवीसांचे मोठे निर्णय! ‘महा-टॅक’ कक्ष स्थापन; साखर कारखान्यांना मिळणार सॉफ्ट लोन

Shivsena Symbol Supreme Court Hearing: ठाकरे-शिंदे वादाचा अंतिम टप्पा; सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी
4

Shivsena Symbol Supreme Court Hearing: ठाकरे-शिंदे वादाचा अंतिम टप्पा; सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.