Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 23 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याचा धक्कादायक दावा, राष्ट्रवादीच्या आमदारांना 100 खोक्यांची ऑफर?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर ठाकरे गटातील आमदारांनी खळबळजनक दावा केला आहे.

  • By साधना
Updated On: Jul 05, 2023 | 02:14 PM
rashtrawadi congress leaders

rashtrawadi congress leaders

Follow Us
Follow Us:

मुंबई:गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत आहेत. वर्षभरापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत (Shivsena) फूट पडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येही तशीच फूट पडली आहे. (Rashtrawadi Congress) राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) बहुसंख्य आमदारांना घेऊन शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील झाले आहेत.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना फुटल्यानंतर मोठ्या प्रमाणात खोक्यांचा वापर करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अशाच प्रकारचा खळबळजनक दावा ठाकरे गटातील आमदार तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.

राष्ट्रवादीच्या आमदारांना सरकारच्या गटात खेचण्यासाठी आमदारनिहाय १०० (पन्नास यंदा, पन्नास पुढील वर्षी) कोटींच्या निधी देण्याची डिल सुरू असल्याची बातमी कानी पडली! शिवाय कुठे विनवणी तर कुठे दमदाटी आहेच.. पडद्यामागील कलाकार याबद्दल बोलतील का?#MaharashtraPoliticsCrisis — Ambadas Danve (@iambadasdanve) July 5, 2023


“राष्ट्रवादीच्या आमदारांना सरकारच्या गटात खेचण्यासाठी आमदारनिहाय 100 (पन्नास यंदा, पन्नास पुढील वर्षी) कोटींच्या निधी देण्याची डिल सुरू असल्याची बातमी कानी पडली! शिवाय कुठे विनवणी तर कुठे दमदाटी आहेच…”, असं ट्विट अंबादास दानवे यांनी केलं आहे.

अंबादास दानवे यांच्या ट्विटमुळे राज्यात पुन्हा एकदा खोक्यांवरून राजकारण पेटण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षाचे आमदार फोडण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून खोक्यांचा वापर केला जातोय का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

विशेष बाब म्हणजे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 40 शिवसेनेतून बंड केल्यानंतर ‘50 खोके एकदम ओके’च्या घोषणांनी महाराष्ट्र दणाणून गेला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फोडण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी 100 खोके दिले, असा खळबळजनक दावा अंबादास दानवे यांनी केल्याने पुन्हा एकदा राज्यात खोक्यांवरून वातावरण तापण्याची शक्यता आहे.

अजित पवारांचा थेट राष्ट्रवादीवरच दावा
शिवसेनेतून बंड केल्यानंतर आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला होता. त्यानंतर निवडणूक आयोगात धाव घेत त्यांनी शिवसेना नाव पक्षचिन्हावर ताबा मिळवला. आता अजित पवार (Ajit Pawar) यांनीसुद्धा अशाच प्रकारचा दावा केला असून आपल्यासोबत बहुसंख्य आमदार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार यांच्यामधील हा वाद आता निवडणूक आयोगात जाण्याची शक्यता आहे. सध्याच्या घडीला राष्ट्रवादी पक्षाचे विधानसभेत 53 आमदार आहेत. पक्षावर दावा सांगण्यासाठी यातील एक तृतीयांश आमदार अजित पवार यांच्याकडे असणे आवश्यक आहे. सध्या आपल्यासोबत 42 आमदार असल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे.

Web Title: Thackeray group leader ambadas danve tweet about rashtrawadi congress nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2023 | 02:12 PM

Topics:  

  • Ambadas Danve
  • Rashtrawadi Congress
  • shivsena
  • Thackeray Group

संबंधित बातम्या

Ashish Shelar : ‘सोनिया गांधींचं पुस्तक फाडणं मान्य नाही!’ शिंदेंच्या शिवसेनेने पुस्तक फाडलं, भाजपच्या शेलारांनी स्पष्टच सांगितलं
1

Ashish Shelar : ‘सोनिया गांधींचं पुस्तक फाडणं मान्य नाही!’ शिंदेंच्या शिवसेनेने पुस्तक फाडलं, भाजपच्या शेलारांनी स्पष्टच सांगितलं

Sanjay Shirsat : खासदारांचा भाव १५० कोटी? संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, संजय शिरसाटांचा थेट पलटवार!
2

Sanjay Shirsat : खासदारांचा भाव १५० कोटी? संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, संजय शिरसाटांचा थेट पलटवार!

Food Scholarship Pune: पुण्यात १ हजार विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दोन वेळचे जेवण; असा करा नोंदणीसाठी संपर्क
3

Food Scholarship Pune: पुण्यात १ हजार विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दोन वेळचे जेवण; असा करा नोंदणीसाठी संपर्क

Maharashtra Politics : ‘शिवसेनेत या, मंत्रीपदही देतो,’ शिंदे गटाच्या मंत्र्याची शरद पवारांच्या आमदाराला थेट ऑफर
4

Maharashtra Politics : ‘शिवसेनेत या, मंत्रीपदही देतो,’ शिंदे गटाच्या मंत्र्याची शरद पवारांच्या आमदाराला थेट ऑफर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.