Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाणे महापालिकेचा पातलीपाडा सेंद्रिय शेती प्रकल्प ठाणेकरांसाठी खुला, काय काय पाहता येणार?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संकल्पनेतून पातलीपाडा सेंद्रिय शेती प्रकल्प ठाणेकरांसाठी खुला झाला आहे. या प्रकल्पात नागरिकंना काय काय पाहता येणार आहे, त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jul 02, 2025 | 08:33 PM
ठाणे महापालिकेचा पातलीपाडा सेंद्रिय शेती प्रकल्प ठाणेकरांसाठी खुला, काय काय पाहता येणार?

ठाणे महापालिकेचा पातलीपाडा सेंद्रिय शेती प्रकल्प ठाणेकरांसाठी खुला, काय काय पाहता येणार?

Follow Us
Close
Follow Us:

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनातून साकार झालेला ठाणे महानगरपालिकेचा पातलीपाडा सेंद्रिय शेती प्रकल्प आता सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित्य साधून या प्रकल्पाचे अनौपचारिक लोकार्पण करण्यात आले असून, ठाणेकरांना सेंद्रिय शेतीचे अनुभव प्रत्यक्ष घेण्याची संधी मिळणार आहे.

या प्रकल्पाची कल्पना फेब्रुवारी महिन्यात आयोजित वृक्षवल्ली प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी उपमुख्यमंत्र्यांनी मांडली होती. त्यांनी नागरिकांसाठी आदर्श ठरेल असा सेंद्रिय शेती प्रकल्प उभारण्याचे निर्देश महापालिकेला दिले होते. त्यानुसार, महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली, उद्यान विभाग व वृक्ष प्राधिकरणाने एप्रिल २०२५ मध्ये या प्रकल्पाचे काम सुरु केले.

Electricity Supply : वीज पुरवठा सुरळीत न ‌झाल्यास तीव्र आंदोलन करणार, संजय जांभळे यांचा इशारा

सुमारे दीड एकर क्षेत्रात उभारण्यात आलेल्या या सेंद्रिय शेती प्रकल्पात भाजीपाला, फळझाडे, धान्य आणि विविध प्रकारच्या शेतीसंबंधित उपक्रमांची रचना करण्यात आली आहे. प्रकल्पाचे संपूर्ण व्यवस्थापन महापालिकेच्या उद्यान विभागामार्फत केले जात असून, प्रकल्प क्षेत्रात कृत्रिम तलाव, मासे आणि वॉटर लिलीचीही निर्मिती करण्यात आली आहे.

या प्रकल्पात काय काय पाहता येणार?

उद्यान अधीक्षक केदार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पात वांगी, भेंडी, टोमॅटो, मका, मिरची, कोबी, भुईमूग, रताळे, सुरण, कारले, दोडका, शिराळी, भोपळा अशा भाज्यांची लागवड करण्यात आली आहे. यासोबत दोन प्रकारचे तांदूळ आणि नाचणीचेही उत्पादन देखील पाहायला मिळेल.

फळवर्गात आंबा, लिंबू, चायनीज लिंबू, ॲवोकॅडो, अंजीर, केळी, सिताफळ, लक्ष्मणफळ, डाळिंब आणि बुटका नारळ यांसारख्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. भविष्यात कोंबडीपालन, गायी, शेळ्या, बदक व टर्की पालन यांचा देखील समावेश करण्याची योजना आहे.

शांतीदूत गृहनिर्माण सोसायटीची कार्यकारिणी समिती बरखास्त करण्याच्या निर्णयाला एसआरएची स्थगिती

या प्रकल्पातून तयार होणारी सेंद्रिय उत्पादने अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमांना देण्यात येणार असून, हा उपक्रम केवळ पर्यावरणपूरकच नव्हे तर सामाजिक भान जपणारा ठरणार आहे.

नागरिकांसाठी प्रवेश खुला

हा प्रकल्प सर्व नागरिकांसाठी सोमवार ते शनिवार, सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत खुला असणार आहे. शाळांनाही त्यांच्या विद्यार्थ्यांसह भेट देण्याचे आयोजन करता येणार आहे, ज्यामुळे शालेय शिक्षणात सेंद्रिय शेतीचे ज्ञान आणि प्रत्यक्ष अनुभव समाविष्ट करता येईल.

पातलीपाडा सेंद्रिय शेती प्रकल्प हा पर्यावरणपूरक, शैक्षणिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून ठाणेकरांसाठी एक प्रेरणादायक उपक्रम ठरेल, असा विश्वास महापालिकेच्या उद्यान विभागाला आहे.

Web Title: Thane municipal corporations patlipada organic farming project is open to thane residents

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2025 | 08:31 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • maharashtra news
  • Thane news

संबंधित बातम्या

मुंबईच्या गणेश विसर्जन सोहळ्याने परदेशी पर्यटक मंत्रमुग्ध, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केली बाप्पाची आरती..!
1

मुंबईच्या गणेश विसर्जन सोहळ्याने परदेशी पर्यटक मंत्रमुग्ध, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केली बाप्पाची आरती..!

शिवभोजन केंद्रसंचालकांचे दीड कोटी थकले; योजना चालवण्यासाठी करावी लागते तारेवरची कसरत
2

शिवभोजन केंद्रसंचालकांचे दीड कोटी थकले; योजना चालवण्यासाठी करावी लागते तारेवरची कसरत

विठ्ठल सूतगिरणीच्या माध्यमातून विठ्ठल परिवार एकवटला; सूतगिरणीच्या जागेवर बाजार समिती उभारण्याचा मानस
3

विठ्ठल सूतगिरणीच्या माध्यमातून विठ्ठल परिवार एकवटला; सूतगिरणीच्या जागेवर बाजार समिती उभारण्याचा मानस

Breaking News : विसर्जनाला गालबोट! ठाण्यात विसर्जनादरम्यान मोठी घटना, 5 जण नदीत बुडाले, एकाचा मृत्यू, 2 बेपत्ता
4

Breaking News : विसर्जनाला गालबोट! ठाण्यात विसर्जनादरम्यान मोठी घटना, 5 जण नदीत बुडाले, एकाचा मृत्यू, 2 बेपत्ता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.