Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : ठाणेकरांसाठी खुशखबर! कारासवडवली उड्डाणपूलाचं होणार लोकार्पण

वाहतूक प्रकल्पांपैकी महत्वाचा कारासवडवली उड्डाणपूल प्रकल्पाचा पहिला टप्पा अंतिम टप्यात आहे. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. त्यामुळे ठाणेकरांना वाहतूक कोंडीतून काहीसा दिलासा मिळणार आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jul 07, 2025 | 03:26 PM
Thane News :   ठाणेकरांसाठी खुशखबर! कारासवडवली उड्डाणपूलाचं होणार लोकार्पण
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे/ स्नेहा जाधव,काकडे : दिवसेंदिवस वाहतूक कोंडी मोठी समस्या होत आहे. शहरातील वाढत जाणाऱ्या या समस्येचा त्रास नागरिकांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे. याचपार्श्वभूमीवर आता ठाणेकरांसाठी खुशखबरआहे. ठाणे जिल्ह्यातील महत्वाच्या वाहतूक प्रकल्पांपैकी एक असलेला कारासवडवली उड्डाणपूल प्रकल्पाचा पहिला टप्पा अंतिम टप्यात असून उद्यापासून (८ जुलै) हा पुल वाहतुकीसाठी खुला होणार आहे. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.मंत्री सरनाईक म्हणाले, कासारवडवली उड्डाणपूलाच्या पहिल्या टप्प्यात डाव्या बाजूची मार्गिका उद्यापासून (८ जुलै) वाहतुकीसाठी खुली होणार असून या उड्डाणपूला वर ३०० मीमी जाडीचा एम-40 ग्रेड सिमेंट काँक्रीटी थर असून मध्यभागी असलेल्या भूयारी मार्गाच्या पृष्ठभागावर मॅट्रेसचा थर पसरवून सदर पुलाचे भक्कम बांधकाम करण्यात आले आहे.

या उड्डाणपुलाच्या निर्मितीमुळे ठाणे, मुंबई आणि नवी मुंबई तसेच जेएनपीटी, बोरीवली, वसई, विरार आणि गुजरातकडे जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी उत्तम कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. तसेच गुजरात ते जेएनपीटी दरम्यानच्या वाहतुकीस अडथळा न होता सुलभ मार्ग उपलब्ध होणार. या बरोबरच वाशी ते ठाणे, नवी मुंबई कार्यालयात जाणाऱ्या वाहनांसाठी भुयारी मार्गाच्या र्निर्मितीमुळे गायमुख ते वाघबिळ या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

उड्डाणपुलाचे लोकार्पण
दरम्यान विधिमंडळाचे अधिवेशन चालू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कामकाजात व्यस्त असल्यामुळे त्यांच्या सूचनेनुसार उद्या म्हणजे ८ जुलैला  दुपारी २ वाजता या कासारवडवली उड्डाणपूलाच्या उजव्यामार्गिकेचे लोकार्पण परिवहन मंत्री श प्रताप सरनाईक यांच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की लोकप्रतिनिधी या नात्याने कासारवडवली, गायमुख, घोडबंदर या भागात उड्डाणपुल व्हावे ही मागणी मी स्वतः केली होती. त्यानुसार तत्कालीन मुख्यमंत्री व मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पला मंजुरी होती. तथापि या प्रकल्पाच्या पूर्णत्वामुळे घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल!

घोडबंदर मार्गावरील तीव्र वाहतूक भार लक्षात घेता उड्डाणपूल दोन टप्प्यांमध्ये बांधण्यात येत आहे.पहिला टप्प्यात डावीकडील बाजू (ठाण्याकडून गाईमुखकडे) पूर्ण झाली असून उद्यापासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात उजवीकडील बाजूची (गायमुखकडून ठाणेकडे) पावसाळ्यानंतर स्थापत्य कामे हाती घेण्यात येणार आहेत.

Web Title: Thane news good news for thane residents karasavadavli flyover to be inaugurated

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2025 | 03:23 PM

Topics:  

  • Pratap Saranaik
  • Thane news
  • Traffic Issue
  • Traffic News

संबंधित बातम्या

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात
1

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Science Centre Inauguration: मीरा-भाईंदरसहित संपूर्ण मुंबई विभागासाठी फायद्याचे! आता मनोरंजातून शिका विज्ञान
2

Science Centre Inauguration: मीरा-भाईंदरसहित संपूर्ण मुंबई विभागासाठी फायद्याचे! आता मनोरंजातून शिका विज्ञान

Ulhasnagar : सिंधी समाजाच्या निषेधार्थ सिंधी एकता पत्रकार मंचाची ऐतिहासिक आक्रोश रॅली
3

Ulhasnagar : सिंधी समाजाच्या निषेधार्थ सिंधी एकता पत्रकार मंचाची ऐतिहासिक आक्रोश रॅली

Thane : ठाण्यात एमडी ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश
4

Thane : ठाण्यात एमडी ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.