Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

असं काय घडलं की ठाण्यात गोपीचंद पडळकरांची प्रतिमा जाळली?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे ठाण्यात गोपीचंद पडळकरांची प्रतिमा जाळण्यात आली आहे. चला या घटनेबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 19, 2025 | 10:13 PM
असं काय घडलं की ठाण्यात गोपीचंद पडळकरांची प्रतिमा जाळली?

असं काय घडलं की ठाण्यात गोपीचंद पडळकरांची प्रतिमा जाळली?

Follow Us
Close
Follow Us:

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या गोपीचंद पडळकरांची प्रतिमा राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार जाळण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

गुरूवारी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबत अत्यंत खालच्या दर्जाची टीका केली होती. त्याचा निषेध करण्यासाठी तसेच पडळकर यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिलाध्यक्षा सुजाता घाग, महिला कार्याध्यक्षा साबिया मेमन यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले.

Devendra Fadnavis: “उद्योगांना लागणाऱ्या इमारत बांधकाम परवानगीसाठी…”; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

चोर गोपीचंदचे करायचे काय, खाली डोके वर पाय; मंगळसूत्र चोराला जेरबंद करा; पडळकर मुर्दाबाद; तोंडाने विष्ठा ओकतो कोण, पडळकरशिवाय दुसरा कोण, अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी पडळकरांच्या प्रतिमेला जोडे मारले तसेच त्यांच्या प्रतिमा जाळल्या. या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

या प्रसंगी सुहास देसाई म्हणाले की, तोंडाने विष्ठा ओकणारा माणूस म्हणून गोपीचंद पडळकर याची ओळख निर्माण झाली आहे. पडळकर हा वारंवार आमच्या नेत्यांवर आक्षेपार्ह टीका करीत आहे. अधिवेशनादरम्यान त्याने जितेंद्र आव्हाड यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला होता. पडळकर हा विकृत माणूस आहे आणि अशी विकृती महाराष्ट्र कधीच खपवून घेत नाही. या पडळकर नावाचा साप आता ठेवण्याची वेळ आली आहे. आम्ही पडळकर याला खुले आव्हान देतो की त्याने ठाण्यात येऊन दाखवावे; त्याला पळता भुई थोडी करू. हा पडळकर महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली कीड आहे. आज आम्ही त्याची फक्त प्रतिमा जाळली आहे. पुढे काय करू, हे त्याने समजून जावे, असा इशारा दिला.

Local Body Elections: महापालिका निवडणूक रणधुमाळीला सज्ज! प्रतीक्षा मात्र बिगुल वाजण्याचीच; ९ महीने झाले तरी…

महिलाध्यक्ष सुजाता घाग यांनी पडळकर यांचा कुत्रा असा उल्लेख करून म्हटले की, भाजपच्या बड्या नेत्यांनी हा कुत्रा सोडला आहे का? या आधीही पडळकर यांनी अनेकांवर टीका केल्या आहेत. मात्र, आता त्याने पुरती पातळी घालविली आहे. पडळकर ठाण्यात आल्यावर आम्ही त्यास चप्पलेने ठोकू. तर प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य यांनी, पडळकर यांनी सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड यांच्यावर अशीच टीका केली होती. मात्र, स्वतःला सुसंस्कृत म्हणवून घेणारे भाजपचे नेते यावर प्रतिक्रिया द्यायला तयार नाहीत. भाजप नेत्यांनी पडळकर यांना याच कामांसाठी सोडले आहे का? असा सवाल केला.

Web Title: Thane news gopichand padalkar image burned after critising ncp leader jayant patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2025 | 10:10 PM

Topics:  

  • gopichand padalkar
  • maharashtra news
  • Thane news

संबंधित बातम्या

ठाणेकरांसाठी सुवर्णसंधी; प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेत डाटा एन्ट्री ऑपरेटरची भरती
1

ठाणेकरांसाठी सुवर्णसंधी; प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेत डाटा एन्ट्री ऑपरेटरची भरती

“मुद्दामहून वाचाळवीर निर्माण …सत्ताधाऱ्यांनी महाभागांना पोसलं; पडळकरांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीचा राग उफाळला
2

“मुद्दामहून वाचाळवीर निर्माण …सत्ताधाऱ्यांनी महाभागांना पोसलं; पडळकरांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीचा राग उफाळला

Maharashtra Politics: “…. ते लक्षात घेत नाहीत”; फडणवीसांनी पडळकरांना ‘त्या’ वक्तव्यावरून खडसावलं
3

Maharashtra Politics: “…. ते लक्षात घेत नाहीत”; फडणवीसांनी पडळकरांना ‘त्या’ वक्तव्यावरून खडसावलं

Gopichand Padalkar : पडळकर अडकले वादाच्या भोवऱ्यात! अजित पवारांचे खडेबोल तर शरद पवारांनी लावला थेट फडणवीसांना फोन
4

Gopichand Padalkar : पडळकर अडकले वादाच्या भोवऱ्यात! अजित पवारांचे खडेबोल तर शरद पवारांनी लावला थेट फडणवीसांना फोन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.