Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : महापालिका वर्षा मॅरेथॉनचे विजेते जाहीर; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही घेतला धावण्याचा आनंद

ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा हौशी अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या ३१व्या वर्षा मॅरेथॉनचे रविवार सकाळी आयोजन करण्यात आले असून यात ठाणेकरांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Aug 10, 2025 | 04:32 PM
Thane News : महापालिका वर्षा मॅरेथॉनचे विजेते जाहीर; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही घेतला धावण्याचा आनंद
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे/ स्नेहा जाधव,काकडे – ‘मॅरेथॉन ठाण्याची, उर्जा तरुणाईची’ या घोषवाक्यासह आयोजित करण्यात आलेल्या एकतिसाव्या ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन या स्पर्धेत पुरुष गटात पुण्याच्या एएसआयच्या धर्मेंद्र याने अव्वल स्थान पटकावले. त्याने ०१ तास ०७ मिनिटे आणि ४१ सेकंद वेळेसह २१ किमीचे अंतर पार केले. तर, महिला गटात नाशिकच्या रविना गायकवाड यांनी ०१ तास २५ मिनिटे आणि ४६ सेकंद वेळ घेत शर्यत पूर्ण केली. या स्पर्धेत सुमारे २५ हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी मॅरेथॉनला झेंडा दाखवला. तर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या हस्ते विजेत्या धावपटूंना गौरविण्यात आले.

कोरोनापासून गेली पाच वर्षे खंडित झालेली ही स्पर्धा यंदा आबालवृद्धांच्या सहभागाने अत्यंत उत्साहात झाली. यावेळी सहभागी धावपटूंचा उत्साह पाहून मॅरेथॉनला झेंडा दाखवल्यानंतर स्वत: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मॅरेथॉनमध्ये धावण्याचा आनंद घेतला. त्यांनी धावपटूंसमवेत काही अंतर धावून त्यांचा उत्साह वाढवला आहे.

ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा हौशी अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या ३१व्या वर्षा मॅरेथॉनचे रविवार सकाळी आयोजन करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरुष गटाच्या तर लता शिंदे यांनी महिला गटाच्या स्पर्धेला झेंडा दाखवला. त्यानंतर, टप्प्याटप्याने एकूण १२ गटातील स्पर्धांचा शुभारंभ महापालिका मुख्यालयासमोरील चौकातून करण्यात आला. याप्रसंगी, खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी उपमहापौर पल्लवी कदम, महापालिका आयुक्त सौरभ राव, माजी ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, एकनाथ भोईर, परिवहन सेवेचे माजी सभापती विलास जोशी, माजी नगरसेवक पवन कदम, विकास रेपाळे, नम्रता भोसले, राजेश मोरे, सिद्धार्थ ओवळेकर, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, परिवहन व्यवस्थापन भालचंद्र बेहरे, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, सचिन सांगळे, दिनेश तायडे, शंकर पाटोळे, मिताली संचेती, क्रीडा उपायुक्त मीनल पालांडे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद पाटील आदी उपस्थित होते.

ठाणे वर्षा मॅरेथॉन थोड्या खंडानंतर आता पुन्हा होत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. या क्षणी या मॅरेथॉनसाठी पहिल्यापासून पुढाकार घेणारे माजी खासदार सतीश प्रधान यांनी प्रकर्षाने आठवण होत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मॅरेथॉनला प्रारंभ करून देताना सांगितले. ठाणे बदलतंय आणि त्या बदलत्या ठाण्याबरोबर ठाण्यातील तरुणाईलाही उर्जा देण्याचे काम ही मॅरेथॉन करत आहे.

खेळाडूंचा सत्कार

ठाणे महापालिका वर्षा मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात धर्मेंद्र आणि महिला गटात रविना गायकवाड ठरले विजेते आहेत. याप्रसंगी, इंग्लड ते फ्रान्स हे सागरी अंतर पोहून जाणाऱ्या भारतीय संघातील जलतरणपटू आयुषी कैलास आखाडे, आयुष प्रवीण तावडे, मानव राजेश मोरे या जलतरणपटूंचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे, आतंरराष्ट्रीय अ‍ॅथलिट शौर्या अविनाश अंबुरे आणि फुल्ल आर्यनमॅन स्पर्धा पूर्ण करणाऱ्या स्मिता जावळे यांचाही उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.महापालिका अधिकारी कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांच्यासाठी एक कि.मी ची ‘कॉर्पोरेट रन’ ठेवण्यात आली होती. या स्पर्धेत महापालिका अधिकारी, कर्मचारी, पत्रकार यांनी सहभाग घेतला. त्याचप्रमाणे, ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांच्या स्पर्धेत महिला आणि पुरुष गटात ज्येष्ठ नागरिक उत्साहाने सहभागी झाले होते. त्याचबरोबर, दिव्यांगांच्या त्रिदल समुहानेही या मॅरेथॉनमध्ये विशेष सहभाग घेतला.

एकूण १० लाखांची बक्षिसे

ठाणे वर्षा मॅरेथॉन स्पर्धा विविध १२ गटात झाली. विजेत्यांना एकूण १० लाख ३८ हजार ९०० रुपयांची रोख पारितोषिके देण्यात आली. मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना देण्यात येणाऱ्या पारितोषिकांमध्ये वाढ करण्यात आली. २१ कि.मी स्पर्धेतील विजेत्यास एक लाखांचे रोख पारितोषिक, सन्माचिन्ह, मेडल व प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.

 

 

Web Title: Thane news winners of the municipal varsha marathon announced deputy chief minister eknath shinde also enjoyed running in the marathon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2025 | 04:29 PM

Topics:  

  • latest news
  • Marathi News
  • muncipal corporation
  • Thane news

संबंधित बातम्या

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे
1

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी
2

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?
3

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन
4

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.