Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कसारात रेल्वे नोटीसांचा धडाका; टपरीधारक व दुकानदारांत संभ्रम, शेकडो कुटुंबे बेघर होण्याची भीती

कसारा येथील सार्वजनिक जागेवरील अनधिकृत बांधकामाच्या आरोपावरून रेल्वे प्रशासनाने दुकानदार व घरमालकांना नोटीसा दिल्या आहेत. दुकानं हटवण्याच्या निर्णयामुळे शेकडो कुटुंबांचा उदरनिर्वाह धोक्यात आला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 06, 2026 | 03:46 PM
kasara

kasara

Follow Us
Close
Follow Us:
  • रेल्वे प्रशासनाकडून टपरीधारक व घरमालकांना वारंवार नोटीसा
  • दुकाने हटवल्यास शेकडो कुटुंबांचा उदरनिर्वाह धोक्यात
  • दिलासासाठी दुकानदार मुंबईतील रेल्वे कार्यालयात धाव घेणार
कसारा : कसारा येथील सार्वजनिक जागेवर अनधिकृत बांधकाम केले असल्याचा दावा करत रेल्वे प्रशासनाने टपरीधारक व घरमालकांना वारंवार नोटीसा बजावल्या जात असल्याने स्थानिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. रेल्वे प्रशासनाने संरक्षण भिंत टाकून आपली हद्द निश्चित केली असल्याची समज टपरी धारकांना सतावत आहे. मग दुकान बांधकामे हटवण्याचा रेल्वे प्रशासनाचा अट्टाहास कशासाठी असा सवालही या निमित्ताने उपस्थित होत आहे. या निर्णयाने शेकडो कुटुंबे उघड्यावर येणार असल्याने तोंडचे पाणी पळाले आहे. मध्य रेल्वे परिसराच्या चारी बाजूने लोकवस्तीचा वेढा आहे.

सोशल मीडियावरील ओळख अन् तरुणी निघाली रायबरेलीला; पण हातकणंगले पोलिसांना माहिती मिळताच…

रेल्वे प्रशासन दिलासा देईल, गावकऱ्यांना विश्वास

असे हृदय पिळवटून टाकणाऱ्या प्रश्नांचे कसारा गावामधील स्थानिकांच्या मनात काहूर माजलंयं. रेल्वे प्रशासनाने नोटीसीद्वारे सुचविलेल्या कागदपत्रांसह शेकडो दुकानदार मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील रेल्वे प्रशासनाच्या मंडळ विभागाच्या संबंधित कार्यालयात पोहचणार आहे. रेल्वे प्रशासन दिलासा देईल या अपेक्षित निर्णयाकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.

रेल्वे प्रशासनाच्या नोटिसांमुळे बाजारपेठेतील अनेक दुकाने आली धोक्यात

  • रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर उदरनिर्वाह करण्यासाठी राज्यातील विविध भागातून अनेक कुटुंब मिळेल त्या जागेवर निवारा उभा करून स्थायिक झाली.
  • कुणी मुंबईकडे नोकरीनिमित्त तर, कुणी गावातच लहानसहान व्यवसाय सुरु करून पोटाची खळगी भरण्यासाठी रुजू झाली.
  • कित्येक वर्षांच्या उभारलेल्या निवाऱ्यांची अर्थात टपरीधारकांची रेल्वे प्रशासनाच्या नोटीसांमुळे केविलवाणी अवस्था झाली आहे.
  • आमचा घर, संसार, पोरांचं शिक्षण सगळ काही दुकानांवर चाललंय. गावातील व आसपासच्या खेडेगावातील ग्राहक आले तरच आमची दुकान चालत असतात.
  • त्यातून मिळणाऱ्या पैशातूनच आम्ही आमच्या कुटुंबाचा गाडा हाकत असतो.
  • पण आता रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या नोटीसांमुळे बाजारपेठेतील आमची दुकाने धोक्यात आली आहे. भविष्यात असं काही घडलं तर हे गावासाठी व गावातील बाजारपेठेसाठी रौनक हिरावून घेतल्यासारखे होईल.
खळबळजनक ! विवाहित महिलेला इन्स्टाग्रामवर ‘तो’ व्हिडिओ पाठवला अन् नंतर…
💡

Frequently Asked Questions

  • Que: रेल्वे प्रशासनाने नोटीसा का दिल्या आहेत?

    Ans: सार्वजनिक जागेवर अनधिकृत बांधकाम केल्याचा दावा करत रेल्वे प्रशासनाने ही कारवाई सुरू केली आहे.

  • Que: या निर्णयाचा स्थानिकांवर काय परिणाम होणार?

    Ans: बाजारपेठेतील दुकाने हटवल्यास अनेक कुटुंबे उघड्यावर येण्याची आणि गावाची आर्थिक रचना ढासळण्याची भीती आहे.

  • Que: दुकानदार पुढे काय पाऊल उचलणार आहेत?

    Ans: आवश्यक कागदपत्रांसह शेकडो दुकानदार मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील रेल्वे कार्यालयात जाऊन दिलासाची मागणी करणार आहेत.

Web Title: A flurry of railway notices in kasara confusion among stall owners and shopkeepers and fear of hundreds of families becoming homeless

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2026 | 03:46 PM

Topics:  

  • thane

संबंधित बातम्या

Thane : मयूर पाटील यांची प्रभाग ४ ब मध्ये प्रचारात आघाडी
1

Thane : मयूर पाटील यांची प्रभाग ४ ब मध्ये प्रचारात आघाडी

Thane : एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ठाण्याच्या विकासाचा संकल्प -हनुमंत जगदाळे
2

Thane : एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ठाण्याच्या विकासाचा संकल्प -हनुमंत जगदाळे

Thane : मीटर गटारापलीकडे जाऊन नागरिकांना सुविधा दिल्या – मयूर पाटील
3

Thane : मीटर गटारापलीकडे जाऊन नागरिकांना सुविधा दिल्या – मयूर पाटील

Vasai Crime: जामिनासाठी खर्च केलेल्या पैशांवरून बहिणीवर गोळीबार; घरातून जिवंत हँड ग्रेनेड व गावठी रिव्हॉल्व्हर जप्त
4

Vasai Crime: जामिनासाठी खर्च केलेल्या पैशांवरून बहिणीवर गोळीबार; घरातून जिवंत हँड ग्रेनेड व गावठी रिव्हॉल्व्हर जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.