विवाहित महिलेला इन्स्टाग्रामवर 'तो' व्हिडिओ पाठवला अन् नंतर...
सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय आहे. असे असताना सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यात धक्कादायक प्रकरण उघडकीस आले. मंगळवेढ्याच्या ग्रामीण भागातील एका 24 वर्षीय तरुण विवाहित महिलेच्या मोबाईल इन्स्टाग्रामवर बनावट अकाऊंट तयार करुन अश्लील व्हिडिओ पाठवल्याचे समोर आले.
याबाबत मंगळवेढा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील सदर 24 वर्षीय पीडित तरुणी ही मंगळवेढ्याच्या ग्रामीण भागात राहत असून, पती नांदवत नसल्यामुळे ती सध्या आई-वडिलाकडे राहत आहे. 11 जून 2025 रोजी सदर पीडितेच्या मोबाईल क्रमांकावर आरोपीने कॉल केला. पीडितेने त्याला आपले नाव विचारले असता त्याने फोन कट केला. त्यानंतरही तो आरोपी वारंवार पीडितेच्या मोबाईलवर फोन करत असे. मात्र, तो रिप्लाय देत नव्हता म्हणून पीडितेने तिचा इन्स्टाग्राम आयडी बंद केला.
हेदेखील वाचा : Nanded Crime: नांदेडमध्ये माणुसकीला काळिमा! 60 वर्षीय नराधमाकडून 8 वर्षांच्या चिमुकलीचा विनयभंग, आरोपी अटकेत
दरम्यान, 12 जून रोजी इन्स्टाग्रामवर अज्ञात व्यक्तीने एका अनोळखी इसमासोबत किस केलेले व एकमेकास मिठी मारलेले व्हिडिओ व फोटो तयार करुन त्याखाली Hi Meri Jaan असे लिहून ते व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड केले. सदर घटना पीडितेने आपल्या कुटुंबातील भावाला व आई-वडिलांना सांगितले. त्यानंतर आरोपीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉक्टरांना फोन करून बोलावून लुटले
पुण्यातून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. एका बनावट इमर्जन्सी कालच्या माध्यमातून उपचारांसाठी डॉटरांना बोलावून त्याना लुटण्यात आले आहे. दोन अज्ञात व्यक्तींनी वडील गंभीर आजाराने ग्रस्त असल्याचे खोट सांगून डॉक्टरांना बोलावले. त्यानंतर चाकूचा धाक दाखवत त्यांच्यावर हल्ला केला.या हल्ल्यात डॉक्टर गंभीररित्या जखमी झाले तेव्हा त्यांच्याकडून पैसे आणि त्याच्या मौल्यवान वस्तू घेऊन फरार झाले. ही घटना पुण्यातील सहकार नगर परिसरात घडली आहे.
हेदेखील वाचा : Solapur Crime: आधी प्रेयसीचा गळा चिरला, नंतर प्रियकराने स्वतःच्याही गळ्यावर केले वार; कारण काय?






