Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ulhasnagar News: सुभाष टेकडी परिसरात दूषित पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर; उलट्या, जुलाबाच्या तक्रारींमुळे नागरिकांमध्ये भीती

Ulhasnagar News: कॅम्प क्रमांक ४ मधील सुभाष टेकडी परिसरात अनियमित आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गढूळ पाण्यामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढत असल्याने महापालिकेने तातडीने उपाययोजना करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 04, 2026 | 09:25 AM
फोटो सौजन्य- gemini

फोटो सौजन्य- gemini

Follow Us
Follow Us:
  • उल्हासनगर कॅम्प क्रमांक ४ मधील सुभाष टेकडी परिसरात भीषण पाणीटंचाईची समस्या
  • पाणी उकळल्यानंतरही त्याची दुर्गंधी जात नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
  • पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घुले यांनी तांत्रिक कारणांमुळे दूषित पाणी येत असल्याचे सांगितले
 

कॅम्प क्रमांक ४ मधील सुभाष टेकडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून दोन ते तीन दिवसांआड नळाला पाणी येत असून, तेही अत्यंत गढूळ आणि दुर्गधीयुक्त असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पाण्याचा वापर केल्यामुळे काही नागरिकांना खोकला, उलट्या आणि जुलाबाचा त्रास होत होऊ लागला आहे.

सुभाष टेकडी परिसरातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, महानगरपालिकेने बसविलेल्या बोअरवेलची दुरवस्था झाली असून, नियमित पाणीपुरवठाही होत नसल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दोन-तीन दिवसांनंतर नळाला पाणी आल्यास ते साठवून ठेवण्याशिवाय नागरिकांकडे पर्याय राहत नाही. मात्र, नळाद्वारे येणारे पाणी गढूळ रंगाचे असून त्यातून प्रचंड दुर्गंधी येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Thane Unauthorized Stalls : ठाण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नगरसेविका आक्रमक; अनधिकृत टपऱ्या, रिक्षा आणि बेवारस वाहनांवर कारवाई

पाणी उकळल्यानंतरही दुर्गंधी; संताप व्यक्त

विशेष म्हणजे हे पाणी उकळून घेतल्यानंतरही त्याची दुर्गंधी जात नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. अशा पाण्याचा वापर करण्याची वेळ नागरिकांवर आल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही नागरिकांना उलट्या, जुलाब, घशाचा त्रास आणि खोकल्याच्या तक्रारी जाणवत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सुभाष टेकडी परिसरातील रहिवाशामध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे.

समाजसेवक वाघमारेंनी व्यक्त केली नाराजी

यासंदर्भात समाजसेवक संजय वाघमारे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

ते म्हणाले की, सुभाष टेकडी परिसरात येणारे गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाणी पिण्यासाठी तर सोडाच, घरगुती वापरासाठीदेखील योग्य नाही.

या पाण्याला सडलेल्या माशाप्रमाणे भयंकर दुर्गंधी येत आहे.

CIDCO : सिडकोचा मोठा निर्णय! प्रत्येक नोडमध्ये 24 तास पाणी बंद; 2 नोव्हेंबरपासून 15 टक्के पाणीकपात लागू

नागरिकांना स्वच्छ आणि मुबलक पाणी उपलब्ध करून देणे ही महापालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे.

महानगरपालिकेने सुभाष टेकडी परिसरातील पाणीपुरवठ्याची तातडीने तपासणी करून पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

…तर तीव्र आंदोलन छेडणार

महापालिकेने तातडीने पाणीप्रश्न सोडवला नाही, तर सुभाष टेकडी परिसरातील नागरिकांना एकत्र करून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संजय वाघमारे यांनी दिला आहे.

यासंदर्भात पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घुले यांच्याशी संपर्क साधला असता, काही तांत्रिक बाबींमुळे दूषित पाणी येत असून एमआयडीसीला पत्रव्यवहार करण्यात आल्याचे सांगितले.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: उल्हासनगरमधील कोणत्या परिसरात दूषित पाणीपुरवठ्याची समस्या निर्माण झाली आहे?

    Ans: उल्हासनगर कॅम्प क्रमांक ४ मधील सुभाष टेकडी परिसरात दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठ्याची समस्या निर्माण झाली आहे.

  • Que: . दूषित पाण्यामुळे नागरिकांना कोणत्या आरोग्यविषयक तक्रारी जाणवत आहेत?

    Ans: काही नागरिकांना उलट्या, जुलाब, खोकला आणि घशाचा त्रास होत असल्याचे सांगण्यात आले आहे.

  • Que: दूषित पाणीपुरवठ्याबाबत महापालिकेने काय माहिती दिली?

    Ans: पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घुले यांनी काही तांत्रिक कारणांमुळे दूषित पाणी येत असल्याचे सांगितले. यासंदर्भात एमआयडीसीला पत्रव्यवहार केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Ulhasnagar subhash tekdi contaminated water supply health issues pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • thane
  • Thane news
  • Ulhasnagar

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar Case : ज्यांच्यावर आरोप झाले, त्याच मिनाक्षी शिंदेंनी पूर्णेकर कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी लिहिलं पत्र!
1

Pradeep Purnekar Case : ज्यांच्यावर आरोप झाले, त्याच मिनाक्षी शिंदेंनी पूर्णेकर कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी लिहिलं पत्र!

Thane Unauthorized Stalls : ठाण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नगरसेविका आक्रमक; अनधिकृत टपऱ्या, रिक्षा आणि बेवारस वाहनांवर कारवाई
2

Thane Unauthorized Stalls : ठाण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नगरसेविका आक्रमक; अनधिकृत टपऱ्या, रिक्षा आणि बेवारस वाहनांवर कारवाई

Thane Mahayuti Rally : ठाण्यात फडणवीसांचा राहुल गांधींवर सर्वात मोठा हल्लाबोल! ‘चीनकडून पैसे का मिळतात?’ राहुल गांधींना थेट सवाल
3

Thane Mahayuti Rally : ठाण्यात फडणवीसांचा राहुल गांधींवर सर्वात मोठा हल्लाबोल! ‘चीनकडून पैसे का मिळतात?’ राहुल गांधींना थेट सवाल

Thane News: ठाण्यातील १५ कंत्राटी सफाई कामगारांना दिलासा; थकीत वेतनासह ७.५६ लाख रुपये जमा
4

Thane News: ठाण्यातील १५ कंत्राटी सफाई कामगारांना दिलासा; थकीत वेतनासह ७.५६ लाख रुपये जमा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.