Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayandar News: ‘मासेमारी सुरू करायची तरी कधी?’; केंद्राची परवानगी, राज्याची बंदी, भाईंदरच्या मच्छीमारांची कोंडी

Mira Bhayandar News: केंद्र सरकारने १ ऑगस्टपासून किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपुढील खोल समुद्रात मासेमारीला परवानगी दिली असली, तरी महाराष्ट्राच्या प्रादेशिक जलक्षेत्रात १५ ऑगस्टपर्यंत मासेमारीबंदी कायम आहे. त्यामुळे भाईंदरमधील उत्तन, पाली आणि चौक परिसरातील पारंपरिक व लहान मच्छीमारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 08, 2026 | 04:14 PM
‘मासेमारी सुरू करायची तरी कधी?’; केंद्राची परवानगी, राज्याची बंदी, भाईंदरच्या मच्छीमारांची कोंडी

‘मासेमारी सुरू करायची तरी कधी?’; केंद्राची परवानगी, राज्याची बंदी, भाईंदरच्या मच्छीमारांची कोंडी

Follow Us
Follow Us:
  • १ ऑगस्टपासून खोल समुद्रात मासेमारीला परवानगी
  • तरी भाईंदरच्या मच्छीमारांचा संभ्रम कायम
  • लहान मच्छीमारांची नुकसानभरपाईची मागणी
विजय काते, भाईंदर : केंद्र शासनाने १ ऑगस्टपासून किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपुढील खोल समुद्रात मासेमारी करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, महाराष्ट्राच्या प्रादेशिक जलक्षेत्रात १५ ऑगस्टपर्यंत मासेमारीबंदी लागू असल्याने भाईंदर परिसरातील पारंपरिक आणि लहान मच्छीमारांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. उत्तन, पाली आणि चौक परिसरातील मच्छीमारांना केंद्राची परवानगी मिळाली असली तरी राज्याच्या हद्दीतील बंदीमुळे किनाऱ्यालगतच्या समुद्रात मासेमारी करता येत नाही. त्यामुळे ‘मासेमारी सुरू करायची तरी कधी?’ असा प्रश्न मच्छीमारांकडून उपस्थित केला जात आहे.

लहान बोटी असल्याने खोल समुद्रात जाणे शक्य नाही

भाईंदर परिसरातील अनेक पारंपरिक मच्छीमार लहान आकाराच्या बोटींच्या माध्यमातून मासेमारी करतात. या बोटींची क्षमता मर्यादित असल्याने त्यांना १२ सागरी मैलांपुढील खोल समुद्रात जाणे शक्य होत नाही. त्यामुळे मोठ्या बोटी असलेल्या मच्छीमारांना केंद्राच्या निर्णयाचा फायदा मिळू शकतो; मात्र लहान मच्छीमारांसाठी परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. मच्छीमारांच्या म्हणण्यानुसार, “आमच्याकडे मोठ्या बोटी नसल्याने आमच्यासाठी मासेमारी प्रत्यक्षात १५ ऑगस्टनंतरच सुरू होणार आहे. तोपर्यंत कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा?”

Mira-Bhayander: मीरा-भाईंदरमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाईला वेग; ९ कोटींच्या ई-निविदेला सुरुवात

उत्पन्नाचे साधन बंद; नुकसानभरपाईची मागणी

मासेमारीबंदीच्या काळात लहान मच्छीमारांचे प्रमुख उत्पन्नाचे साधन बंद राहते. त्यातच केंद्र आणि राज्याच्या नियमांमधील फरकामुळे काही मच्छीमारांना आणखी काही दिवस समुद्रात जाता येणार नसल्याने आर्थिक अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंदीच्या कालावधीसाठी लहान आणि पारंपरिक मच्छीमारांना आर्थिक मदत किंवा नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मच्छीमारांच्या कुटुंबांचा दैनंदिन खर्च, बोटींची देखभाल, कर्जाचे हप्ते आणि इतर आर्थिक जबाबदाऱ्या लक्षात घेता शासनाने या काळात मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

केंद्र आणि राज्याच्या नियमांबाबत स्पष्टता हवी

केंद्र सरकारने १२ सागरी मैलांपुढील खोल समुद्रात मासेमारीला परवानगी दिली असताना महाराष्ट्राच्या प्रादेशिक जलक्षेत्रातील बंदी नेमकी कोणत्या भागाला लागू आहे, याबाबत मत्स्य विभागाने स्पष्ट सूचना जारी कराव्यात, अशी मागणी मच्छीमारांकडून करण्यात आली आहे. नियमांची माहिती स्पष्ट नसल्यास मच्छीमारांकडून अनवधानाने नियमांचे उल्लंघन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने बंदीची सीमा, परवानगी असलेले क्षेत्र आणि संबंधित नियम याबाबत स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी आहे.

काही बोटी समुद्रात जात असल्याचा आरोप

दरम्यान, काही भागातील बोटी समुद्रात जात असल्याचा आरोपही स्थानिक मच्छीमारांनी केला आहे. जर बंदी लागू असेल तर नियमांची अंमलबजावणी सर्व मच्छीमारांसाठी समान पद्धतीने झाली पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे. काहींना समुद्रात जाण्याची परवानगी आणि काहींना बंदी, अशी परिस्थिती निर्माण झाल्यास लहान मच्छीमारांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

शासनाच्या स्पष्टीकरणाकडे लक्ष

एकीकडे केंद्राकडून खोल समुद्रातील मासेमारीला परवानगी देण्यात आली आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या प्रादेशिक जलक्षेत्रातील बंदी १५ ऑगस्टपर्यंत कायम असल्याने भाईंदरमधील लहान मच्छीमारांची कोंडी झाली आहे. मोठ्या बोटी नसलेल्या मच्छीमारांना केंद्राच्या निर्णयाचा प्रत्यक्ष लाभ मिळत नसल्याने त्यांना आणखी काही दिवस आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे मासेमारीबंदीचा नेमका नियम, केंद्र आणि राज्याच्या आदेशातील समन्वय, तसेच लहान मच्छीमारांना नुकसानभरपाई किंवा आर्थिक मदत मिळणार का, याबाबत शासन काय स्पष्टीकरण देते, याकडे उत्तन, पाली, चौक आणि भाईंदर परिसरातील मच्छीमारांचे लक्ष लागले आहे.

Mira Bhayandar: ९८ मीटर जलवाहिनीचे काम रखडले; १५ लाख नागरिकांच्या पाणीपुरवठ्यावर संकट, सक्तीच्या भूसंपादनाची मागणी

Web Title: Bhayandar fishermen confusion deep sea fishing permission august 1 maharashtra ban

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 04:07 PM

Topics:  

  • fishermen
  • maharashtra
  • mira bhayandar

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: भीषण दुष्काळामुळे गाव सोडण्याची वेळ! अहिल्यानगरच्या चापडगावात 1972 पेक्षाही भयावह परिस्थिती
1

Ahilyanagar News: भीषण दुष्काळामुळे गाव सोडण्याची वेळ! अहिल्यानगरच्या चापडगावात 1972 पेक्षाही भयावह परिस्थिती

Pavana River Pollution : पवना नदी पुन्हा फेसाळली, रासायनिक सांडपाण्यामुळे जलचर धोक्यात; प्रशासनाचे दुर्लक्ष
2

Pavana River Pollution : पवना नदी पुन्हा फेसाळली, रासायनिक सांडपाण्यामुळे जलचर धोक्यात; प्रशासनाचे दुर्लक्ष

ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शकुंतला नगरकर यांचं निधन; 50 वर्षांहून अधिक काळ लावणी गाजवल्यानंतर घेतला अखेरचा श्वास
3

ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शकुंतला नगरकर यांचं निधन; 50 वर्षांहून अधिक काळ लावणी गाजवल्यानंतर घेतला अखेरचा श्वास

Gondiya News: बाळापाठोपाठ मातेचाही मृत्यू! गंगाबाई रुग्णालयातील घटना; डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप!
4

Gondiya News: बाळापाठोपाठ मातेचाही मृत्यू! गंगाबाई रुग्णालयातील घटना; डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.