Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भूमीपुत्रांच्या जागा घेऊनही विकास नाही; KDMC प्रशासनावर माजी नगरसेवक मयूर पाटील यांचा संतप्त सवाल

KDMC News: कल्याण-डोंबिवली मनपाने मोहिली येथे पाणी प्रकल्पासाठी भूमीपुत्रांच्या जागा घेतल्या, पण गावाचा विकास केला नाही. रस्ते दुरवस्थेत असल्याने माजी नगरसेवक मयूर पाटील यांनी मनपा आयुक्तांवर टीका केली."

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 07, 2025 | 03:22 PM
KDMC प्रशासनावर माजी नगरसेवक मयूर पाटील यांचा संतप्त सवाल (Photo Credit - X)

KDMC प्रशासनावर माजी नगरसेवक मयूर पाटील यांचा संतप्त सवाल (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • प्रकल्पासाठी जागा घेतली
  • विकास कधी करणार?
  • माजी नगरसेवक मयूर पाटील यांचा संतप्त सवाल
कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिकेने मोहिली गावात जलशुद्धीकरणाचा प्रकल्प उभारला आहे. तसेच त्या ठिकाणी आणखीन २०० एमएलडी क्षमतेचा पाणी प्रकल्प उभारला जाणार आहे. या दोन्ही प्रकल्पाच्या विकासासाठी महापालिकेने भूमीपुत्रांच्या जागा घेतल्या आहे. मात्र त्या भागातील विकास केलेला नाही. महापालिकेस विकास प्रकल्पाकरीता भूमीपूत्रांच्या जागा पाहिजेत. महापालिका त्या भागातील विकास कधी करणार ? असा संतप्त सवाल शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक मयूर पाटील यांनी उपस्थित केला आहे.

विकास कामांसाठी दुजाभाव

प्रभाग क्रमांक ११ येथील विकास कामाकरीता शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. या कामाचे भूमीपूजन माजी नगरसेवक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी आमदार भोईर यांचे सुपुत्र वैभव भोईर यांच्यासह माजी नगरसेविका नमिता पाटील, उपशहर प्रमुख अंकूश जोगदंड, विभाग प्रमुख राम तरे, शाखा प्रमुख रोहन कोट आदी मान्यवर उपस्थित होते. या भूमीपूजनाच्या कार्यक्रमा पश्चात माजी नगरसेवक पाटील यांनी उपरोक्त सवाल उपस्थित केला.

हे देखील वाचा: KDMC : मेट्रोच्या कामामुळे नामांकित शाळेला तीन दिवस सुट्टी ; प्रशासनाच्या कामकाजामुळे विद्यार्थ्यांचे होतायत हाल

विरोध न करता जागा महापालिकेस, पण विकास नाही

माजी नगरसेवक पाटील यांनी सांगितले की, १०० एमएलडी क्षमतेच्या मोहिली जलशुद्धीकरण केंद्राच्या उभारणीस स्थानिक भूमीपूत्रांनी जागा दिली. त्यानंतर आणखीन एक २०० एमएलडी क्षमतेचा पाणी प्रकल्प प्रस्तावित आहे. त्यासाठीही भूमीपूत्रांच्या जागा महापालिकेने घेतल्या आहे. विकास कामाला भूमीपूत्रांनी जरा देखील विरोध न करता जागा महापालिकेस दिल्या. मात्र मोहिली परिसरात रस्त्यांची दुरावस्था आहे. त्याठिकाणी डीपी रस्ते झाले पाहिजेत. महापालिका प्रकल्पासाठी जागा घेते. त्या भागातील विकासाकडे दुर्लक्ष करते. विकासाबाबत दुजाभाव केला जातो. या कडे महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी लक्ष दिले पाहिजे अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था

महापालिका हद्दीतील अ प्रभाग क्षेत्र हा ग्रामीण परिसर आहे. ग्रामीण भागाच्या विकासाबाबत महापालिकेकडून दुजाभाव केला जातो. या भागातील डीपी रस्ते १९९५ पासून आहे तसेच आहे. ते विकसीत करण्यात आलेली नाही. महापालिकेने रस्ते विकासासठी निधीची तरतूद केली नाही. काही ठिकाणी केलेली तरतूद ही तुटपूंजी होती. प्रशासकीय राजवटीत रस्ते विकासासाठी निधी मिळाला नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि

हे देखील वाचा: Dombivali भाजपा आणि शिंदेसेनेत तुफान राडा; महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

निधी प्राप्त होताच ही रस्त्याची कामे मार्गी लागतील

खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह आमदार विश्वनााथ भोईर यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. येत्या काही दिवसात या डीपी रस्त्यासाठी लवकरच निधी प्राप्त होणे अपेक्षित आहे. निधी प्राप्त होताच ही रस्त्याची कामे मार्गी लागतील. दरम्यान आज बल्याणी, मोहिली, तिपन्नानगर या प्रभागातील विकास कामाकरीता दिलेल्या दीड कोटीच्या निधीतून होत असलेल्या कामाचे भूमीपूजन माजी नगरसेवक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

Web Title: Former corporator mayur patils angry question on kdmc administration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2025 | 03:22 PM

Topics:  

  • KDMC
  • Shinde group
  • shivsena
  • Water problem

संबंधित बातम्या

Kolhapur Corporation Election मातोश्रीचा आदेश आल्यास शिवसेना महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्यास तयार
1

Kolhapur Corporation Election मातोश्रीचा आदेश आल्यास शिवसेना महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्यास तयार

कोल्हापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढणार; माजी महापौर सई खराडे यांचा शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश
2

कोल्हापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढणार; माजी महापौर सई खराडे यांचा शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश

KDMC : मेट्रोच्या कामामुळे नामांकित शाळेला तीन दिवस सुट्टी ; प्रशासनाच्या कामकाजामुळे विद्यार्थ्यांचे होतायत हाल
3

KDMC : मेट्रोच्या कामामुळे नामांकित शाळेला तीन दिवस सुट्टी ; प्रशासनाच्या कामकाजामुळे विद्यार्थ्यांचे होतायत हाल

Tapovan News : टिल्लू-लेव्हल बुद्धीत! नाशिकच्या तपोवनावरुन पेटलं रान; राणेंवर शिवसेनेचा प्रहार
4

Tapovan News : टिल्लू-लेव्हल बुद्धीत! नाशिकच्या तपोवनावरुन पेटलं रान; राणेंवर शिवसेनेचा प्रहार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.