
फोटो सौजन्य- chatgpt
गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि उत्साहाचा सण मानला जातो. मात्र प्लास्टर ऑफ पॅरिस (POP) मूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण आणि पर्यावरणावरील परिणाम लक्षात घेता, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून ‘माझी वसुंधरा’ या उपक्रमातंर्गत पर्यावरण दक्षता मंडळ आणि एन्व्हायरो व्हिजील यांच्या संयुक्त विद्यमाने माझे घर, माझा बाप्पा या अभिनव उपक्रमांतर्गत विनामूल्य गणेशमूर्ती कार्यशाळा व जनजागृती कार्यक्रम २०२६ आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमातून शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती स्वतः तयार करण्याचे प्रशिक्षण नागरिकांना दिले जाणार असून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही दिला जाणार आहे. हा उपक्रम ठाणे महापालिकेच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव मोहिमेचा एक भाग असून या मोहिमेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.
ही कार्यशाळा ऑगस्ट महिन्यातील प्रत्येक शनिवार व रविवार आयोजित करण्यात येणार आहे. कार्यशाळेचे ठिकाण टीएमसी शाळा क्र. १९-२०, नौपाडा, ठाणे असून सकाळी १०.०० ते दुपारी १.०० आणि दुपारी २.०० ते सायंकाळी ५.०० अशा दोन सत्रांमध्ये प्रशिक्षण दिले जाईल.
कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नागरिकांनी नोंदणीसाठी देण्यात आलेला QR कोड स्कॅन करावा. सहभागी होताना दोन लहान आकाराचे कागद, जुनी वृत्तपत्रे किंवा टिश्यू पेपर (२ नग), मूर्ती कोरण्यासाठी कार्डबोर्ड किंवा कोणतेही हार्डबोर्ड, २० x २० सें.मी. आकाराचा एक पाट आणि एक वाटी स्वतःसोबत आणावी.
ठाणे महानगरपालिकेने सर्व नागरिक, विद्यार्थी, पालक आणि गणेशभक्तांना या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रत्येकाने स्वतःच्या हाताने शाडू मातीची गणेशमूर्ती तयार करून ‘माझे घर, माझा बाप्पा श्रद्धा, संस्कार आणि आनंदाचा संगम’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश नागरिकांना पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्त्व पटवून देणे आणि स्वतःच्या हाताने शाडूची गणेशमूर्ती तयार करण्यास प्रोत्साहित करणे हा आहे. यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचा वापर कमी होऊन जलप्रदूषण रोखण्यास मदत होणार आहे.
Ans: नागरिकांना शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण देणे आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
Ans: ठाणे महानगरपालिकेच्या 'माझी वसुंधरा' उपक्रमांतर्गत पर्यावरण दक्षता मंडळ आणि एन्व्हायरो व्हिजील यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
Ans: ऑगस्ट महिन्यातील प्रत्येक शनिवार आणि रविवारी टीएमसी शाळा क्र. १९-२०, नौपाडा, ठाणे येथे कार्यशाळा होणार आहे.