Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘राजकारणातील सिंघम’ ;खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने झळकले बॅनर

कल्याण ते बदलापूरपर्यंत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवशी 'राजकारणातील सिंघम' म्हणून परिसरात बॅनर झळकले आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 25, 2025 | 03:47 PM
'राजकारणातील सिंघम' ;खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने झळकले बॅनर

'राजकारणातील सिंघम' ;खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने झळकले बॅनर

Follow Us
Follow Us:

विधानसभा निवडणूकीत महायुतीन बहुमताने राज्यात निवडून आली. शिवसेना शिंदे गट आणि भाजपाच्या युतीने राज्यात आणलेल्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्यांना होताना दिसत आहे. याचपार्श्वभूमीवर आता खासदार श्रीकांत शिंदे यांचा राजकारणातील सिंघम असा उल्लेख असलेले बॅनर सध्या कल्याण बदलापूर परिसरात झळकत आहेत.

खासदार श्रीकांत शिंदे यांचा येत्या ४ फेब्रुवारीला वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या दहा दिवस आधीच कल्याण ते बदलापूरपर्यंत खासदार शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा बॅनर ठिकठिकाणी झळकले आहेत. भल्या मोठ्या बॅनरवर खासदारांच्या फोटोसह राजकारणातील सिंघम असे त्यावर लिहीण्यात आले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेली कामगिरी आणि पक्षाला मिळालेले यशामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे.

महानगरपालिका निवडणूक  लवकरट होणार आहे. या निवडणूकीत कल्याण डोंबिवली सत्ता कोणाची येईल,यासाठी सर्व पक्षांनी आत्तापासूनच तयारी सुरु केली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कल्याण डोंबिवलीत राजकीय परिस्थिती बदलली आहे. शिवसेनेच्या फूटीनंतर पहिली महानगरपालिका निवडणूक होणार आहे. कल्याण डोंबिवली खासदार शिंदे यांचे राजकीय वर्चस्व आहे. सध्या शिवसेनेसमोर एकच पक्ष दिसतो. तो आहे त्याचा मित्र पत्र भाजप. इतर पक्ष नावापूरते असल्याचे बोलले जात आहे.

Sharad Pawar Health Update: शरद पवारांची प्रकृती खालावली; सर्व दौरे रद्द

शिवसेनेचे खासदार शिंदे हे २०१४ साली प्रथम निवडून आले. मात्र २०१९ साली पुन्हा खासदार पदी निवडून आल्यावर त्यांचे पारडे जड होत गेले. लोकसभा मतदार संघात हजारो कोटी रुपयांचा निधी आणून पायाभूत सोयी सुविधांचे आणि जनकल्याणांचे प्रकल्प उभे करण्याचे काम सुरु आहे. काही प्रकल्प मार्गी लागले आहे. या कामांना प्रभावीत होऊन अनेकांनी त्यांचे नेतृत्व स्विकारत शिवसेनेत प्रवेश केला आहे. खासदार शिंदे हे त्यांच्या ताकदीवर शिवसेनेची सत्ता आणू शकतात. हे बोलल्यास वावगं ठरणार नाही. ४ फेब्रुवारी रोजी खासदार शिंदे यांचा वाढदिवस आहे.

Raj Thackeray News: राज ठाकरेंनी नाशिकचा दौरा एका दिवसातच गुंडाळला; नेमकं झालं काय?

पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून दहा दिवस आधीच त्यांच्या वाढदिवसाचा उत्सव सुरु झाला आहे. कल्याण डोंबिवलीत उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, कल्याण ग्रामीणमध्ये त्यांचे बॅनर लावण्यात आले आहेत. कल्याण ग्रामीण, अंबरनाथ आणि कल्याण पश्चिम या विधानसभा खासदार शिंदे यांनी त्यांच्या ताकदीवर आमदारांना निवडून आणले आहे. उल्हासनगर, कल्याण पूर्व, डोंबिवलीत खासदार शिंदे यांनी भाजपला दिलखुलासपणे मदत केली. त्यामुळे भाजपचे आमदार मोठ्या मताधिक्याने निवडून आले. हे देखील तितकेच खरे आहे. म्हणूनच कल्याण बदलापूर परिसरात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचे बॅनर झळकत आहेत.

Web Title: From kalyan to badlapur mp shrikant shindes birthday banner was displayed as political singham

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2025 | 03:43 PM

Topics:  

  • Badlapur
  • kalyan
  • MP Shrikant Shinde
  • shivsena shinde group

संबंधित बातम्या

Video Viral: अवघ्या ३-४ वर्षांच्या मुलांना रंग फासून भीक मागायला लावले? कल्याणमध्ये संतापजनक प्रकार, पोलिसांकडून तपास
1

Video Viral: अवघ्या ३-४ वर्षांच्या मुलांना रंग फासून भीक मागायला लावले? कल्याणमध्ये संतापजनक प्रकार, पोलिसांकडून तपास

KDMC News: केडीएमसीची STP निविदा वादात; नव्या कंत्राटदारांना संधी नसल्याचा नितीन तरे यांचा आरोप
2

KDMC News: केडीएमसीची STP निविदा वादात; नव्या कंत्राटदारांना संधी नसल्याचा नितीन तरे यांचा आरोप

Ulhas River: उल्हास नदीतील गढूळता वाढली; बदलापूर-अंबरनाथमध्ये पाणीपुरवठ्यावर संकट
3

Ulhas River: उल्हास नदीतील गढूळता वाढली; बदलापूर-अंबरनाथमध्ये पाणीपुरवठ्यावर संकट

Ulhas River : उल्हास नदीचा रंग पुन्हा बदलला; रसायने की मातीचा भराव?
4

Ulhas River : उल्हास नदीचा रंग पुन्हा बदलला; रसायने की मातीचा भराव?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.