Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अनाथाश्रमापासून Gen Z भेटीपर्यंत’ रविंद्र चव्हाणांचा वाढदिवस असा झाला खास, धार्मिक विधींसोबत सामाजिक उपक्रमांची रेलचेल

भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण-डोंबिवलीत विविध धार्मिक, सामाजिक आणि समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आले. यावेळी Gen Z तरुणांनी त्यांची भेट घेत गुलाबपुष्प देत शुभेच्छा दिल्या.

  • By विवेक
Updated On: Sep 21, 2026 | 09:42 PM
Ravindra Chavan

Ravindra Chavan

Follow Us
Follow Us:
  • रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण-डोंबिवलीत विविध कार्यक्रम.
  • Gen Z तरुणांनी गुलाबपुष्प देत रविंद्र चव्हाण यांचं अभीष्टचिंतन केलं.
  • धार्मिक कार्यक्रमांसोबत अन्नधान्य, सायकली, सोलार पॅनेल, हेल्मेट आणि ज्येष्ठ नागरिक दाखल्यांचं वाटप
 

भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध धार्मिक, सामाजिक आणि समाजोपयोगी उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं. कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांनी प्रत्यक्ष भेटी, दूरध्वनी तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

डोंबिवलीचे ग्रामदैवत श्री गणेश मंदिर संस्थान येथे दर्शन घेऊन रविंद्र चव्हाण यांनी आपल्या वाढदिवसाची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ‘जननी आशिष’ अनाथाश्रम, ‘आपलं घर’ वृद्धाश्रम आणि ‘डोंबिवलीकर न्यू फोर्स अकॅडमी’ला सहकुटुंब भेट दिली. यावेळी तेथील नागरिक आणि प्रशिक्षणार्थींसोबत त्यांनी वाढदिवस साजरा केला.

Gen Z तरुण थेट रविंद्र चव्हाणांसमोर

कल्याण-डोंबिवलीतील विविध भाजप कार्यालयांच्या उद्घाटनाचा कार्यक्रमही वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित करण्यात आला. यावेळी Gen Z युवकांनी रविंद्र चव्हाण यांची भेट घेतली. तरुणांनी गुलाबपुष्प देत त्यांचं अभीष्टचिंतन केलं.

Navi Mumbai: कंत्राटी कामगारांच्या वेतनवाढीवरून महासभेत प्रशासनाला धारेवर धरले; १५ दिवसांत कार्यवाहीचे निर्देश

या भेटीमुळे वाढदिवसाच्या कार्यक्रमात युवा सहभागाचाही विशेष उल्लेख झाला. मतदारसंघातील जनसंपर्क कार्यालयांमध्येही अभीष्टचिंतन सोहळे पार पडले. महिला पदाधिकाऱ्यांनी औक्षण केलं, तर नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी शुभेच्छा दिल्या.

धार्मिक विधींसोबत सामाजिक उपक्रम

रविंद्र चव्हाण यांच्या दीर्घायुष्यासाठी होमहवनासारखे धार्मिक विधीही करण्यात आले. त्याचबरोबर राज्यभरात विविध कल्याणकारी उपक्रम राबवण्यात आले.

गरजू नागरिकांना मोफत अन्नधान्य, विद्यार्थ्यांना सायकली, अपारंपरिक ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी सोलार पॅनेल, तरुणांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स आणि हेल्मेट, तसेच ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिक दाखल्यांचं वाटप करण्यात आलं.

सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात आलं. वृद्धाश्रमांना वॉशिंग मशीन आणि इतर आवश्यक साहित्याची मदतही देण्यात आली.

KDMC News: रस्त्याच्या भरावामुळे नाल्याचा प्रवाह अडला? इंदिरा नगरमध्ये घर-दुकानांत घुसले घाण पाणी; मनसे आक्रमक

मंत्री आणि आमदारांकडूनही शुभेच्छा

कौशल्य विकास व रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार महेंद्र थोरवे, आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक यांनी रविंद्र चव्हाण यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.

धार्मिक श्रद्धा, सामाजिक उपक्रम, युवा सहभाग आणि ज्येष्ठांचा सन्मान अशा विविध उपक्रमांमधून रविंद्र चव्हाण यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. नागरिकांनी व्यक्त केलेला विश्वास आणि आपुलकी ही जनसेवेच्या कामासाठी आणखी बळ देणारी असल्याची प्रतिक्रिया रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केली.

Web Title: Gen z youth ravindra chavan birthday kalyan dombivli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 09:42 PM

Topics:  

  • kalyan dombivali news
  • Ravindra Chavan
  • Thane news

संबंधित बातम्या

Thane Metro News: ठाणेकरांना वाहतूक कोंडीतून मिळणार दिलासा; गायमुख-कापूरबावडी मेट्रो डिसेंबरमध्ये सुरू करण्याचे उद्दिष्ट
1

Thane Metro News: ठाणेकरांना वाहतूक कोंडीतून मिळणार दिलासा; गायमुख-कापूरबावडी मेट्रो डिसेंबरमध्ये सुरू करण्याचे उद्दिष्ट

Dombivli News : मोदींच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत ‘आशीर्वादाचा दिवा’, रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ‘सेवा संकल्प अभियान’ सुरु
2

Dombivli News : मोदींच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत ‘आशीर्वादाचा दिवा’, रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ‘सेवा संकल्प अभियान’ सुरु

Thane Ganesh Visarjan: ठाणेकरांची पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला साथ; हजारो किलो निर्माल्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन
3

Thane Ganesh Visarjan: ठाणेकरांची पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला साथ; हजारो किलो निर्माल्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन

Kalyan Dombivli: २७ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई, महासभेत कुणाल पाटलांचा प्रशासनाला घेराव, ‘केडीएमसी-म्हाडीकडून तातडीने उपाययोजना करा
4

Kalyan Dombivli: २७ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई, महासभेत कुणाल पाटलांचा प्रशासनाला घेराव, ‘केडीएमसी-म्हाडीकडून तातडीने उपाययोजना करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.