Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FDA Action : रुग्णांच्या ताटात झुरळ; एफडीएची धडक कारवाई, राम कॅटरर्सचे उपाहारगृह सील

कळवा रुग्णालयातील रुग्णाच्या जेवणात झुरळ आढळल्याच्या घटनेनंतर एफडीएने रुग्णालयातील स्वयंपाकघराची तपासणी केली. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळताच राम कॅटरर्सचे उपाहारगृह सील करण्यात आले.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 05, 2026 | 12:15 PM
FDA Action : रुग्णांच्या ताटात झुरळ; एफडीएची धडक कारवाई, राम कॅटरर्सचे उपाहारगृह सील

FDA Action : रुग्णांच्या ताटात झुरळ; एफडीएची धडक कारवाई, राम कॅटरर्सचे उपाहारगृह सील

Follow Us
Follow Us:
  • २८ ऑगस्ट रोजी रुग्णाच्या जेवणाच्या ताटात झुरळ आढळले.
  • तपासणीत स्वच्छतेचा अभाव आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्याने कॅन्टीन सील.
  • कॅन्टीन बंद असल्याने रुग्णांसाठी प्रशासनाने दुसऱ्या ठिकाणाहून सुरक्षित आणि स्वच्छ भोजनाची व्यवस्था केली.
ठाणे, वा. कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णाच्या जेवणाच्या ताटात झुरळ आढळल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने अखेर धडक कारवाईचा बडगा उगारला आहे. एफडीएच्या विशेष पथकाने रुग्णालयातील स्वयंपाकघराची झडती घेत अन्न सुरक्षा नियमांचे उघड उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर रुग्णांना भोजन पुरवणाऱ्या राम कॅटरर्सचे उपाहारगृह तातडीने बंद केले आहे. संपूर्ण तपासणी पूर्ण होऊन अधिकृत परवानगी मिळत नाही, तोपर्यंत हे उपाहारगृह कोणत्याही परिस्थितीत सुरू होणार नाही, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

Thane Dahi handi 2026: संकल्प दहीहंडीचा थरार! विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदांना मिळणार २१ लाख

रुग्णालयातील अधिष्ठाता दालनात मनसेने केले होते ठिय्या आंदोलन

कळवा रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ६ मध्ये २८ ऑगस्ट रोजी डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी दाखल असलेल्या एका रुग्णाच्या जेवणाच्या ताटात झुरळ आढळले होते. या प्रकारानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेत थेट रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. स्वप्नाली कदम यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले होते. गोरगरीब रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या बेजबाबदार ठेकेदारावर तात्काळ गुन्हा नोंदवून त्याला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी मनसेने लावून धरली होती. या आंदोलनाची आणि जनक्षोभाची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा टाकला. प्राथमिक तपासणीतच स्वच्छतेचा अभाव आणि अन्न सुरक्षा मानकांचे पालन न केल्याचे समोर आल्याने पथकाने तात्काळ कॅन्टीनचे कामकाज रोखले.

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ. स्वप्नाली कदम यांनी सांगितले की, “दाखल असतात, एफडीएच्या कारवाईमुळे उपाहारगृह सील करण्यात आल्याने रुग्णांच्या जेवणाचा पुरवठा खंडित होऊ नये, यासाठी प्रशासनाने तात्काळ पर्यायी यंत्रणा उभारली आहे. जोपर्यंत स्वयंपाकघराचा प्रश्न पूर्णपणे मार्गी लागत नाही, तोपर्यंत रुग्णांना सुरक्षित, पौष्टिक आणि स्वच्छ अन्न दुसऱ्या ठिकाणाहून पुरवण्याची तात्पुरती पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे”.

Navi Mumbai Dahi Handi: अनधिकृत बॅनरबाजीचा नवी मुंबईत धुमाकूळ, पालिकेच्या बुडीत महसूलाला जबाबदार कोण?

ठाणे शहर अध्यक्ष स्वप्निल महिंद्रकर म्हणाले, “एफडीएने कारवाई केली असली तरी केवळ कॅन्टीन बंद करून चालणार नाही. संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून रुग्णांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा ठेकेदाराला भविष्यात ठाणे महापालिकेचे कोणतेही काम मिळू नये यासाठी त्याला महापालिकेतून कायमचे हद्दपार केले पाहिजे”.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Kalwa hospital cockroach food fda action ram caterers sealed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 12:15 PM

Topics:  

  • FDA
  • FDA Action
  • Hospital

संबंधित बातम्या

भेसळखोरांनो सावधान ! सणासुदीतील ‘या’ पदार्थांवर असणार आता FDA ची नजर; तुकाराम मुंढेंकडून कॅलेंडरच जारी
1

भेसळखोरांनो सावधान ! सणासुदीतील ‘या’ पदार्थांवर असणार आता FDA ची नजर; तुकाराम मुंढेंकडून कॅलेंडरच जारी

२५ कोटींचे डीएसए यंत्र पुन्हा वापरात; ट्रॉमा रुग्णालयात बंद ‘न्युरोइंटरव्हेन्शन’ सेवा सुरू
2

२५ कोटींचे डीएसए यंत्र पुन्हा वापरात; ट्रॉमा रुग्णालयात बंद ‘न्युरोइंटरव्हेन्शन’ सेवा सुरू

आता महाप्रसाद, लंगर आणि भंडाऱ्यांवरसुद्धा FDAची नजर; तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय, वर्षभरासाठी ‘स्टँडिंग ऑर्डर्स’
3

आता महाप्रसाद, लंगर आणि भंडाऱ्यांवरसुद्धा FDAची नजर; तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय, वर्षभरासाठी ‘स्टँडिंग ऑर्डर्स’

Sharad Pawar on Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या कारवाईवर शरद पवारांची प्रतिक्रिया; FDA च्या कारवाईमुळे दूधाच्या दरावर परिणाम?
4

Sharad Pawar on Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या कारवाईवर शरद पवारांची प्रतिक्रिया; FDA च्या कारवाईमुळे दूधाच्या दरावर परिणाम?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.