Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Water Shortage: अरे देवा! आठवड्यात फक्त १५ मिनिटे पाणी! फायर ब्रँड खासदार-आमदारांच्या मतदारसंघात पाणीटंचाईचा कहर

Water Shortage: कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचा दावा होत असतानाच कल्याण पूर्वेतील आशेले गाव परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. पूर्वी आठवड्यातून तीन वेळा होणारा पाणीपुरवठा आता आठवड्यातून अवघ्या १५ मिनिटांवर आल्याचा दावा ठाकरे गटाच्या नगरसेविका कीर्ती ढोणे यांनी केला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 31, 2026 | 05:49 PM
अरे देवा! आठवड्यात फक्त १५ मिनिटे पाणी! कार्यसम्राट खासदार-आमदारांच्या मतदारसंघात पाणीटंचाईचा कहर

अरे देवा! आठवड्यात फक्त १५ मिनिटे पाणी! कार्यसम्राट खासदार-आमदारांच्या मतदारसंघात पाणीटंचाईचा कहर

Follow Us
Follow Us:
  • आठवड्यात फक्त १५ मिनिटे पाणी!
  • कार्यसम्राट खासदार-आमदारांच्या मतदारसंघात पाणीटंचाईचा कहर
  • आठवड्यात तीन वेळा मिळणारे पाणी १५ मिनिटांवर?
Water Shortage: एकीकडे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) क्षेत्रात विकास आणि स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल होत असल्याचे दावे केले जात आहेत, तर दुसरीकडे नागरिकांना पाणी, रस्ते आणि वीज यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याचे पाहायला मिळत आहे.  कल्याण पूर्वेतील आशेले गाव परिसरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे (Water Shortage) नागरिक त्रस्त झाले असून, आठवड्यातून केवळ १५ मिनिटे पाणीपुरवठा होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

आठवड्यात तीन वेळा मिळणारे पाणी १५ मिनिटांवर?

आशेले गाव परिसरात यापूर्वी आठवड्यातून तीन वेळा पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, सध्या परिस्थिती गंभीर झाली असून आठवड्यातून केवळ १५ मिनिटे पाणी मिळत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगरसेविका कीर्ती ढोणे यांनी केला आहे. अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना दैनंदिन गरजा भागवतानाही अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Satara Voter List: साताऱ्यात मतदार यादीचा ‘SIR’ धक्का! ३.४२ लाख मतदार संशयाच्या कक्षेत; तर ८८ हजार मृत

आयुक्त आणि महापौरांकडे तक्रार

पाणीटंचाईच्या प्रश्नावर कीर्ती ढोणे यांनी कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले. त्याचबरोबर महापौर हर्षाली चौधरी यांच्याकडेही समस्या मांडत प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली . पाणीपुरवठ्यातील अडथळे नेमके कशामुळे निर्माण झाले, याचा शोध घेऊन आशेले गावातील पाणीपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी करण्यात आली आहे.

आठ दिवसांचा अल्टिमेटम

प्रशासनाने केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष उपाययोजना करावी, अशी मागणी ढोणे यांनी केली आहे. पुढील आठ दिवसांत पाणीटंचाईचा प्रश्न सुटला नाही, तर KDMC आयुक्तांच्या कार्यालयात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

महापौरांच्या उत्तरावरूनही प्रश्न

या प्रश्नासंदर्भात महापौर हर्षाली चौधरी यांच्याकडे निवेदन देण्यात आले. त्यावर “माझ्याकडे निवेदन आले आहे, बघू काय करायचे आहे,” अशा स्वरूपाचे उत्तर मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे गंभीर पाणीटंचाईच्या प्रश्नाबाबत महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी किती गंभीर आहेत, असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.

कल्याण-डोंबिवलीतील काही भागांत खराब रस्ते, वीजपुरवठ्यातील अडथळे आणि पाणीपुरवठ्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. अशात आशेले गावातील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षाचा मुद्दा बनण्याची चिन्हे असून, आठ दिवसांच्या अल्टिमेटमनंतर प्रशासन काय पावले उचलते, याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Dombivli News: मुसळधार पावसातही तिरंगा रॅलीचा जल्लोष; संस्था-शाळांचा श्रीकांत शिंदेंच्या हस्ते गौरव

Web Title: Kalyan east ashele village water shortage residents get water only 15 minutes a week kdmc ultimatum

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 05:49 PM

Topics:  

  • kalyan
  • Water Crisis
  • Water Shortage

संबंधित बातम्या

बुलढाण्यात पाणीटंचाईचं संकट? आमदार संजय गायकवाडांकडून आढावा; अधिकाऱ्यांना दिले महत्त्वाचे निर्देश
1

बुलढाण्यात पाणीटंचाईचं संकट? आमदार संजय गायकवाडांकडून आढावा; अधिकाऱ्यांना दिले महत्त्वाचे निर्देश

Buldhana: अवैध पाणी उपशावर कारवाई करा, पाणीटंचाई निवारणासाठी सज्ज राहा; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
2

Buldhana: अवैध पाणी उपशावर कारवाई करा, पाणीटंचाई निवारणासाठी सज्ज राहा; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Wardha News : वर्धेकरांनो, पाणी जपून वापरा! १४ गावांचा पाणीपुरवठा ५ दिवस बंद, २१ ऑक्टोबरपासून तांत्रिक कामासाठी शटडाऊन
3

Wardha News : वर्धेकरांनो, पाणी जपून वापरा! १४ गावांचा पाणीपुरवठा ५ दिवस बंद, २१ ऑक्टोबरपासून तांत्रिक कामासाठी शटडाऊन

Maharashtra Drought 2026: दुष्काळाचा हाहाकार! पाच दुष्काळ पाहिलेल्या ९५ वर्षीय वृद्धाची हृदयद्रावक हाक; ‘अशी परिस्थिती कधी…’
4

Maharashtra Drought 2026: दुष्काळाचा हाहाकार! पाच दुष्काळ पाहिलेल्या ९५ वर्षीय वृद्धाची हृदयद्रावक हाक; ‘अशी परिस्थिती कधी…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.