Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Narali Purnima: पारंपरिक वेशभूषेत फोटोशूटपासून कोळीगीतांच्या गजरापर्यंत; कल्याणमध्ये नारळी पौर्णिमेची धूम

चार महिन्यांनंतर कोळी बांधवांना पुन्हा ‘दर्याची ओढ’ लागली आहे. नारळी पौर्णिमेनिमित्त कल्याणच्या भोईवाडा कोळीवाड्यात पारंपरिक वेशभूषा, कोळीगीतांचा गजर आणि समुद्रपूजेची लगबग सुरू झाली आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 27, 2026 | 09:25 AM
फोटो सौजन्य- गुगल

फोटो सौजन्य- गुगल

Follow Us
Follow Us:
  • चार महिन्यांनंतर कोळी बांधवांना पुन्हा लागली ‘दर्याची ओढ’
  • कल्याणच्या भोईवाडा कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेची लगबग
  • तरुणाईमध्ये पारंपरिक वेशभूषेतील फोटोशूटची क्रेझ
 

चार महिने दर्यापासून दूर राहिलेल्या कोळी बांधवांना आता पुन्हा समुद्राची ओढ लागली आहे. नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने कल्याणच्या भोईवाडा कोळीवाड्यात सणाची लगबग सुरू झाली असून, आज २७ ऑगस्टला पारंपरिक पद्धतीने नारळी पौर्णिमेचा उत्सव साजरा केला जाणार आहे. मिरवणूक काढत कोळी बांधव खाडीकिनारी समुद्रपूजेसाठी जाणार आहेत.

कल्याण भोईवाडाकरांची गणेश घाटापर्यंतची पारंपरिक कोळी वेशभूषा आणि कोळी गीतांच्या गजरात निघणारी मिरवणूक म्हणजे संस्कृतीचा जिवंत आविष्काच असतो. पारंपरिक कोळी वेशभूषेत महिला-पुरुष मिरवणुकीत सहभागी होतात. ढोलाच्या तालावर कोळी गाणी म्हणत, नाचत आणि जल्लोष करत ही मिरवणूक गणेश घाटावर पोहोचते. तेथे नारळाची पूजा करून तो दर्याला अर्पण केला जातो. ‘दर्या सुखाचा ठेव, आमच्या बोटी सुखरूप परत येऊ दे, कामधंद्याला बरकत दे, अशी प्रार्थना करून कोळी बांधव समुद्राला नमन करतात. कोळी समाजासाठी हा सण म्हणजे नव्या हंगामाची सुरुवात असते. पावसाळ्यात मासळीचा प्रजननकाळ असल्याने तसेच समुद्र खवळलेला असल्याने सुमारे चार महिने मासेमारी बंद असते. नारळी पौर्णिमेनंतर मात्र समुद्राची पूजा करून बोटी पुन्हा दर्यात सोडल्या जातात. त्यामुळे कोळी समाजासाठी हा सण केवळ उत्सव नसून मासेमारीच्या हंगामाची सुरुवात आणि दर्याशी असलेल्या नात्याचा सोहळा आहे.

करोडोंचा चुराडा, तरीही प्रतीक्षानगर पाण्यात! पावसाने उघडीप दिली तरी सांडपाण्याचा पूर; मनसेचा पालिकेला आंदोलनाचा इशारा

नारळी पौर्णिमेआधीच ‘फोटोशूट फिव्हर’ !

नारळी पौर्णिमेच्या आठवडाभर आधीच तरुण-तरुणी पारंपरिक कोळी वेशभूषेत सजून नदीकिनारी फोटोशूट करताना दिसून आले. नऊवारी साडी, पारंपरिक दागिने, कोळी टोपी आणि पारंपरिक पोशाखात सजलेली तरुणाई कॅमेऱ्यासमोर ‘पोझ’ देत होते. नुकतेच कल्याणच्या गणेश घाटावर पारंपरिक वेशात सजलेल्या तरुणाईंच्या गर्दीचे फोटो आणि व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. त्यामुळे यंदाच्या नारळी पौर्णिमेबरोबरच पारंपरिक कोळी वेशभूषेतील फोटोशूटचीही चांगलीच चर्चा रंगली आहे.

Navarashtra Impact: अल्पवयीन मुलीशी गैरवर्तनाचा आरोप; अखेर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल, ‘नवराष्ट्र’च्या वृत्तानंतर कारवाई

‘नारळी पुनवच्या सणाला…’ गाण्यांची सर्वत्र रंगत

‘नारळी पुनवच्या सणाला… येउंदे मंगारी घराला’ ‘सण आयलो गं नारळी पौर्णिमेचा’ अशा पारंपरिक कोळी गीतांच्या तालावर नारळी पौर्णिमेचा उत्साह आणखी वाढतो. त्यात नवनवीन कोळीगीतांची आणखी भर पडते. मिरवणुकीत सोन्याने मढलेल्या, नटलेल्या सर्वच वयोगटातील महिलांच्या उत्साहाला तरुणाईंची साथ मिळते आणि ढोलाच्या ठेक्यावर संपूर्णच कोळीवाडा जणू ताल धरतो. जुन्या कोळीगीतांबरोबर नव्या पिढीची गाणीही रंगतात. त्यामुळे नारळी पौर्णिमेचा उत्साह म्हणजे गाणी, नृत्य आणि जल्लोषाची खास कोळी मैफल ठरते.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Narali purnima kalyan koli culture traditional celebration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • Hindu Festival
  • kalyan
  • Koli Community

संबंधित बातम्या

Narali Purnima: ‘सण आयलो गं नारळी पौर्णिमेचा’ या कोळीगीतांमागे काय आहे संस्कृती? जाणून घ्या खास परंपरा
1

Narali Purnima: ‘सण आयलो गं नारळी पौर्णिमेचा’ या कोळीगीतांमागे काय आहे संस्कृती? जाणून घ्या खास परंपरा

Narali Purnima: कोळी बांधवांसाठी का खास आहे नारळी पौर्णिमा? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व
2

Narali Purnima: कोळी बांधवांसाठी का खास आहे नारळी पौर्णिमा? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

नारळी पौर्णिमा सणांचा वाढेल आनंद आणि गोडवा! नातेवाईक आणि आप्तेष्टांना पाठवा ‘या’ सुंदर मराठमोळ्या शुभेच्छा
3

नारळी पौर्णिमा सणांचा वाढेल आनंद आणि गोडवा! नातेवाईक आणि आप्तेष्टांना पाठवा ‘या’ सुंदर मराठमोळ्या शुभेच्छा

Raksha Bandhan: रक्षाबंधनाच्या दिवशी तयार होत आहे अद्भुत त्रिवेणी संगम, ‘या’ शुभ मुहूर्तावर राखी बांधल्यास भावाचे चमकेल नशीब
4

Raksha Bandhan: रक्षाबंधनाच्या दिवशी तयार होत आहे अद्भुत त्रिवेणी संगम, ‘या’ शुभ मुहूर्तावर राखी बांधल्यास भावाचे चमकेल नशीब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.