Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rukminibai Hospital: फ्रॅक्चर झालेल्या वृद्धाच्या पायाला प्लास्टरऐवजी पुठ्ठा, रुक्मिणीबाई रुग्णालयाचा आणखी एक धक्कादायक प्रकार

Rukminibai Hospital Kalyan: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात फ्रॅक्चर झालेल्या एका वयोवृद्ध रुग्णाच्या पायाला प्लास्टरऐवजी पुठ्ठा लावल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. बेतूरकर पाडा येथील राम सोनी यांच्या पायाला फ्रॅक्चर झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आले होते.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 14, 2026 | 01:02 PM
फ्रॅक्चर झालेल्या वृद्धाच्या पायाला प्लास्टरऐवजी पुठ्ठा, रुक्मिणीबाई रुग्णालयाचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर

फ्रॅक्चर झालेल्या वृद्धाच्या पायाला प्लास्टरऐवजी पुठ्ठा, रुक्मिणीबाई रुग्णालयाचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर

Follow Us
Follow Us:
  • रुक्मिणीबाई रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
  • फ्रॅक्चर झालेल्या वृद्धाच्या पायाला प्लास्टरऐवजी पुठ्ठा
  • वृद्धाच्या उपचारावरून मनसे आक्रमक
Rukminibai Hospital Kalyan: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा प्रकार समोर आला आहे. फ्रॅक्चर झालेल्या एका वयोवृद्ध रुग्णाच्या पायाला प्लास्टरऐवजी पुठ्ठा लावण्यात आल्याचा आरोप रुग्णाच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकारामुळे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये आवश्यक वैद्यकीय सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत का, असा सवाल उपस्थित झाला आहे.

वृद्धाच्या पायाला फ्रॅक्चर

कल्याणमधील बेतूरकर पाडा परिसरातील रहिवासी राम सोनी यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले होते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात आणले. मात्र, रुग्णालयात प्लास्टर उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. बाहेरून प्लास्टर आणण्यास सांगण्यात आल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

पुणे जिल्ह्यासाठी रिंगरोड घेतोय आकार; सहा तालुके, 82 गावांना जोडणार

प्लास्टरऐवजी पुठ्ठा लावल्याचा आरोप

दरम्यान, रुग्णाच्या पायाला प्लास्टर करण्याऐवजी पुठ्ठ्याचा आधार देण्यात आल्याचे समोर आले. त्यामुळे रुग्णालयाच्या उपचारपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, प्लास्टरची व्यवस्था बाहेरून करण्यास सांगण्यात आली होती. मात्र, तोपर्यंत पायाला पुठ्ठा लावण्यात आल्याचा आरोप आहे.

ऑर्थोपेडिक डॉक्टर उपलब्ध नसल्याचे रुग्णालयाचे म्हणणे

या प्रकरणाबाबत रुग्णालयाकडून ऑर्थोपेडिक डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे संबंधित तंत्रज्ञाकडूनही प्लास्टर करता आले नसल्याचे सांगण्यात आल्याची माहिती आहे. यामुळे महापालिकेच्या रुग्णालयात गंभीर दुखापत झालेल्या रुग्णांसाठी आवश्यक तज्ज्ञ सेवा उपलब्ध नसल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मनसे नगरसेवक गणेश लांडगे रुग्णालयात

या प्रकाराची माहिती मिळताच मनसे नगरसेवक गणेश लांडगे रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी रुग्णालयातील परिस्थितीची पाहणी करत प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले. महापालिकेच्या रुग्णालयात सामान्य नागरिक उपचारासाठी येतात. मात्र, जर आवश्यक वैद्यकीय सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरच उपलब्ध नसतील, तर सर्वसामान्य रुग्णांनी उपचारासाठी कुठे जावे?, असा सवाल गणेश लांडगे यांनी उपस्थित केला.

महापालिका प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

या घटनेमुळे रुग्णालयातील वैद्यकीय सुविधा, डॉक्टरांची उपलब्धता आणि फ्रॅक्चरच्या रुग्णांसाठी आवश्यक उपचारांची व्यवस्था याबाबत चर्चा सुरू झाली आहे. प्लास्टरऐवजी पुठ्ठा लावल्याचा आरोप नेमका कोणत्या परिस्थितीत करण्यात आला, रुग्णावर पुढील उपचार काय करण्यात आले आणि रुग्णालयात ऑर्थोपेडिक डॉक्टर का उपलब्ध नव्हते, याबाबत महापालिका प्रशासनाकडून सविस्तर स्पष्टीकरण अपेक्षित आहे. या प्रकरणात संबंधितांवर कारवाई केली जाते का आणि रुग्णालयातील वैद्यकीय सुविधा सुधारण्यासाठी प्रशासन कोणती पावले उचलते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Thane Water leakage : – ठाण्यातील तीन हात नाका परिसरात मुंबई III जलवाहिनीला मोठी गळती.

Web Title: Kalyan rukminibai hospital fracture patient cardboard instead of plaster allegation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 01:02 PM

Topics:  

  • Dombivli
  • kalyan

संबंधित बातम्या

kalyan News: अवघ्या एका तासात 7/12 वर दुसऱ्या व्यक्तीचे नाव; कल्याण तहसीलदार कार्यालयातील प्रकाराने खळबळ
1

kalyan News: अवघ्या एका तासात 7/12 वर दुसऱ्या व्यक्तीचे नाव; कल्याण तहसीलदार कार्यालयातील प्रकाराने खळबळ

श्रावणात एक धार्मिक पुस्तक घरी आणा, वाचा आणि संस्कार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवा; डोंबिवलीत अनोखा उपक्रम
2

श्रावणात एक धार्मिक पुस्तक घरी आणा, वाचा आणि संस्कार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवा; डोंबिवलीत अनोखा उपक्रम

Dombivli Tiranga Rally: १५ ऑगस्टनिमित्त डोंबिवलीत भव्य तिरंगा रॅली; 35 हजार स्क्वेअर फिट राष्ट्रध्वजासह देशभक्तीचा जल्लोष
3

Dombivli Tiranga Rally: १५ ऑगस्टनिमित्त डोंबिवलीत भव्य तिरंगा रॅली; 35 हजार स्क्वेअर फिट राष्ट्रध्वजासह देशभक्तीचा जल्लोष

KDMC News: शास्त्रीनगर रुग्णालयात धक्कादायक प्रकार; अल्पवयीन मुलीचा प्रेग्नन्सी रिपोर्ट पॉझिटिव्ह, बाहेरील टेस्ट मात्र निगेटिव्ह
4

KDMC News: शास्त्रीनगर रुग्णालयात धक्कादायक प्रकार; अल्पवयीन मुलीचा प्रेग्नन्सी रिपोर्ट पॉझिटिव्ह, बाहेरील टेस्ट मात्र निगेटिव्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.