Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

समस्या सुटली नाही तर वाहनांची तोडफोड… कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडीवरून मनसे आक्रमक

कल्याण-शीळ रस्त्यावरील अवजड वाहनांमुळे नागरिक, विद्यार्थी आणि वाहनचालक त्रस्त झाले आहेत. याचप्रकरणी कल्याण फाटा मार्गावर मनसेच्या नेतृत्वात वाहतूक कोंडी विरोधात जन आंदोलन करण्यात आले.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 11, 2026 | 02:14 PM
समस्या सुटली नाही तर वाहनांची तोडफोड... कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडीवरून मनसे आक्रमक

समस्या सुटली नाही तर वाहनांची तोडफोड... कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडीवरून मनसे आक्रमक

Follow Us
Follow Us:
  • कल्याण फाटा मार्गावर मनसेच्या नेतृत्वात वाहतूक कोंडी विरोधात जन आंदोलन
  • कल्याण-शीळ रस्त्यावरील अवजड वाहनांमुळे नागरिक, विद्यार्थी आणि वाहनचालक त्रस्त
  • वाहतूक विभागाचे पोलीस अधिकारी पैसे घेतात याचा माझ्याकडे पुरावा – मनसे नेते राजू पाटील
कल्याण-शीळ रस्त्यावरील वाढत्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) ने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या मार्गावरील वाहतूक कोंडीला जबाबदार असलेल्या परिस्थितीविरोधात आज मनसेच्या नेतृत्वात कल्याण फाटा येथे जनआंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि समाजवादी पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते देखील उपस्थित होते. या आंदोलनाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या आंदोलनात मनसे डोंबिवली शहर अध्यक्ष हर्षद पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी भाऊ पाटील सत्यवान म्हात्रे अरुण जांभळे जिल्हाध्यक्ष राहुल कामत आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

रुग्णवाहिका हॉस्पिटलमध्ये पोहोचली, पण पुढच्याच क्षणी घडलं धक्कादायक; नागरिकांनी चालकाला धरलं धारेवर

वाहतूक कोंडीचा सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी आणि वाहनचालकांना फटका

कल्याण-शीळ रस्त्यावर अवजड वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा फटका सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी आणि वाहनचालकांना बसत आहे. अवजड वाहनांमुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. याचा त्रास या मार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी आणि वाहनचालकांना होतो. याप्रकरणी आता मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

वाहतूक विभागातील अधिकाऱ्यांविरोधात मनसेचा गंभीर आरोप

वाहतूक विभागातील काही अधिकारी पैसे घेऊन अवजड वाहने सोडत असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. यासंदर्भातील व्हिडिओ पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा देखील मनसे नेते राजू पाटील यांनी केला आहे. या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही. मात्र राजू पाटील यांनी केलेल्या दाव्यामुळे आता सर्वत्र चर्चा सुरु झाल्या आहेत.

मनसे नेते राजू पाटील यांनी दिला इशारा

काही दिवसांपूर्वी मनसेच्या वतीने सात दिवस आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान ६४ वाहनांची तोडफोड झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर काही काळ वाहतूक कोंडीची समस्या कमी झाली होती; मात्र आता पुन्हा परिस्थिती पूर्ववत झाल्याचा दावा मनसेने केला आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. “वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला नाही, तर यापुढे गाड्या आणि टोलनाकेही फोडू,” असा इशारा मनसे नेते राजू पाटील यांनी दिल्याचे सांगितलं जात आहे.

Mumbai Central Railway : सीएसएमटी ते दादरदरम्यान चार तासांच्या विशेष ब्लॉकमध्ये स्वच्छता मोहीम; 881 कर्मचाऱ्यांचा सहभाग

आजचे आंदोलन हा केवळ इशारा असून, प्रश्न मार्गी न लागल्यास पुढील भूमिका अधिक आक्रमक असेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. कल्याण-शीळ मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन आणि वाहतूक विभाग आता कोणती पावले उचलतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Kalyan shil road traffic jam mns holds protest at kalyan phata raju patil warns of stronger agitation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 02:14 PM

Topics:  

  • MNS
  • mns raju patil
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Raigad News: ऑक्टोबर हिटचा तडाखा! म्हसळ्यात खरीप पिके संकटात, पाणीटंचाईचीही धास्ती
1

Raigad News: ऑक्टोबर हिटचा तडाखा! म्हसळ्यात खरीप पिके संकटात, पाणीटंचाईचीही धास्ती

Pune Navratri : पुण्यातील श्री महालक्ष्मी मंदिरात देवीला सुवर्ण मुकुटाचा साज
2

Pune Navratri : पुण्यातील श्री महालक्ष्मी मंदिरात देवीला सुवर्ण मुकुटाचा साज

MPSC Students: ठोस निर्णय घ्या, अन्यथा विद्यार्थी तीव्र पावले उचलतील! रोहित पवारांचा सरकारला इशारा
3

MPSC Students: ठोस निर्णय घ्या, अन्यथा विद्यार्थी तीव्र पावले उचलतील! रोहित पवारांचा सरकारला इशारा

CJP Protest : कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात इम्रान खान आणि तुषार गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
4

CJP Protest : कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात इम्रान खान आणि तुषार गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.