Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: मनपाहद्दीत रिक्षा चोरांचा सुळसुळाट; कल्याणमध्ये नेमकं चाललंय तरी काय ?

कल्याण डोंबिवली मनपा हद्दीतील रिक्षांची चोरी करणाऱ्या चोराला कोळसेवाडी पोलीसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 06, 2025 | 04:46 PM
Crime News:  मनपाहद्दीत रिक्षा चोरांचा सुळसुळाट; कल्याणमध्ये नेमकं चाललंय तरी काय ?
Follow Us
Close
Follow Us:

कल्याण डोंबिवलीमध्ये गुन्हेगारी वाढत जात चालली असून चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. याचपार्श्वभूमीवर कोळसेवाडी पोलिसांनी एका सराईत चोरट्याला ताब्यात घेतलं आहे. राजेंद्र जाधव असे चोरट्याचं नाव असून तो डोंबिवली येथे राहणारा आहे. राजेंद्र कल्याण डोंबिवलीत रिक्षा चोरून कर्जत परिसरात विकत होता. राजेश जाधव विरोधात या आधी देखील डोंबिवली ,मानपाडा, कोळशेवाडी पोलीस ठाण्यात रिक्षा चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली .राजेश कडून चोरी केलेल्या चार रिक्षा कोळसेवाडी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

कल्याण पूर्व परिसरात गेल्या काही दिवसांपासून रिक्षा चोरीच्या घटना वाढत होत्या.  या पार्श्वभूमीवर डीसीपी अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोळशेवाडी पोलिसांचे पथक या चोरट्यांचा शोध घेत होते . या दरम्यान रिक्षा चोरी करणारा सराईत चोरटा राजेश जाधव डोंबिवलीत राहत असल्याची माहिती मिळताच पोलीसांच्या पथकाने राजेश जाधव याला ताब्यात घेतलं . पोलीसी खाक्या दाखवताच जाधवने रिक्षा चोरीची कबुली दिली . पोलिसांनी राजेश जाधव विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

Crime News Updates: महिलांच्या दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी

राजेश जाधव याच्याकडून चोरी केलेल्या चार रिक्षा पोलिसांनी हस्तगत केल्यात . राजेश कल्याण डोंबिवलीसह आजूबाजूच्या परिसरात पार्किंग मध्ये किंवा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रिक्षा चोरायचा आणि त्या रिक्षा कर्जत परिसरात विकत होता. राजेश जाधव विरोधात याआधी देखील डोंबिवली, मानपाडा, कोळशेवाडी परिसरात रिक्षा चोरी संदर्भात गुन्हे दाखल आहेत . त्याला याआधी देखील रिक्षा चोरीच्या गुन्ह्यात अटक झाली होती मात्र जामिनावर सुटल्यानंतर त्याने पुन्हा रिक्षा चोरी करणं सुरू केलं . राजेशने आणखी काही रिक्षा चोरी केला असल्याचा संशय पोलिसांना असून पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून वारंवार छेडछाड; वडिलांनाही दिली धमकी, पोलिसांत तक्रार येताच…

गेल्या वर्षी कल्याण परिसरात किती गुन्ह्यांवर कारवाई या बाबतदेखील काही दिवसांपूर्वी पोलीस आयुक्त अतुल झेंडे यांनी माहिती दिली होती. दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत जात असून याबाबतची माहिती या वर्षाच्या सुरुवातीला सांगण्यात आली होती. सार्वजनिक ठिकाणी, निर्जनस्थळ नशा करणाऱ्यांवर तसेच अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई सुरुच राहणार, प्रत्येक पोलीस स्टेशनला एका दामिनी पथकाची नियुक्ती केली आहे, शासनाने दिलेल्या नियमांचे उल्लंघन ज्या ठिकाणी होते तिथे कारवाई केली आहे, लेडीज बार, ऑर्केस्ट्रा बार असणाऱ्या 26 हॉटेलवर वर्षभरात कारवाई केली आहे. असं अतुल झेंडे यांनी सांगितलं होतं. पुढे ते असंही म्हणाले होते की, परिसरातील 3 बारचे लायसन्स रद्द झाले आहेत, सार्वजनिक ठिकाणी दंगा करणे,मद्य प्राशन करणे, रहदारीला अडथळा निर्माण करणाऱ्या 1100 लोकांवर कारवाई केली आहे, जे आस्थापने वेळेपेक्षा जास्त वेळ सुरु ठेवणाऱ्या 3095 लोकांवर कारवाई केली आहेत, सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्या 4114 जणांवर कारवाई केली आहे, अशी माहिती शहराचे डीसीपी अतुल झेंडे यांनी दिली होती.

 

 

Web Title: Marathi crime news auto rikshaw thieves are rampant in kdmc area kolsewadi police arrest thief who stole auto rickshaw

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2025 | 04:46 PM

Topics:  

  • crime news
  • Kalyan Police
  • KDMC

संबंधित बातम्या

Kalyan Bicycle Travel : १५ सायकलस्वारांचा कल्याण ते उटी सायकल प्रवास, एका आठवड्यात कापणार १२०० किमीचे अंतर
1

Kalyan Bicycle Travel : १५ सायकलस्वारांचा कल्याण ते उटी सायकल प्रवास, एका आठवड्यात कापणार १२०० किमीचे अंतर

Mumbai Crime: ‘डिलिव्हरी बॉय बनून घरात घुसला, चाकूचा धाक दाखवला अन्….’ अंधेरीत धक्कादायक घटना
2

Mumbai Crime: ‘डिलिव्हरी बॉय बनून घरात घुसला, चाकूचा धाक दाखवला अन्….’ अंधेरीत धक्कादायक घटना

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर तळीरामांवर धडक कारवाई; १०.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त, ४७ आरोपींवर गुन्हे
3

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर तळीरामांवर धडक कारवाई; १०.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त, ४७ आरोपींवर गुन्हे

Fake Gutkha Factory: बनावट गुटख्याचा घरगुती कारखाना उद्ध्वस्त! ३.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त
4

Fake Gutkha Factory: बनावट गुटख्याचा घरगुती कारखाना उद्ध्वस्त! ३.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.