Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News: कशेळी मेट्रो डेपोच्या भरावाचे काम संशयाच्या भोवऱ्यात; एमएमआरडीएच्या ठेकेदारावर स्थानिकांचे गंभीर आरोप

Thane News: मेट्रो मार्गिका-५ अंतर्गत कशेळी मेट्रो डेपोच्या भरावाच्या कामावरून स्थानिकांनी एमएमआरडीए आणि कंत्राटदारावर गंभीर आरोप केले आहेत. ट्विन टनेलमधील मलबा व दगड डेपोच्या भरावासाठी वापरला जात असल्याचा दावा करत त्याची मंजुरी आणि गुणवत्ता तपासणीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 30, 2026 | 09:25 AM
फोटो सौजन्य- गुगल

फोटो सौजन्य- गुगल

Follow Us
Follow Us:
  • कशेळी मेट्रो डेपोच्या भरावासाठी टनेलमधील दगड आणि मलबा वापरला जात आहे का?
  • कशेळी मेट्रो डेपोच्या भरावाचे काम संशयाच्या भोवऱ्यात
  • एमएमआरडीएच्या ठेकेदारावर स्थानिकांचे गंभीर आरोप
मेट्रो मार्गिका-५ अंतर्गत कशेळी येथील मेट्रो कार डेपोच्या भरावाच्या कामावरून स्थानिक नागरिकांनी गंभीर आरोप केले आहेत. मानपाडा-बोरिवली ट्विन टनेलमधून उत्तखनन होणार मलबा आणि दगड कशेळी डेपोच्या भरावासाठी वापरला जात आहे. विशेष म्हणजे शेकडो कोटीचे टेंडर काढलेले असताना एमएमआरडीएची ठेकेदारावर मेहेरबानी कशासाठी सुरु आहे, असा आरोप स्थानिक नागिकांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास बड़े मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.

हा दगड डेपोमध्ये वापरण्याची मंजुरी नेमकी कुणी दिली, त्याची गुणवत्ता, तांत्रिक तपासणी करण्यात आली आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. एमएमआरडीएकडून मिळालेल्या माहितीनुसार, कशेळी मेट्रो डेपोच्या बांधकामाचे सुमारे ५८९ कोटी ५६ लाख रुपयांचे कंत्राट रित्विक प्रोजेक्टस प्रा. लि या कंपनीला देण्यात आले आहे.

ऐरोली-काटई नाका उन्नत मार्ग महिन्याभरात होणार सुरू; नवी मुंबई-डोंबिवली प्रवासाचा वेळ होणार कमी

या कंत्राटात रस्ते आणि ड्रेनेजची कामे समाविष्ट आहेत. उपलब्ध प्रकल्प अहवालानुसार मातीकाम आणि खोदकाम यासाठी १२ कोटी ३१ लाख, मातीचा भराव करण्सायासाठी ३५ कोटी ३९ लाख आणि मातीच्या मुख्य भरावावर दगडी वाळूमिश्रित संरक्षक थर टाकण्यासाठी १६ कोटी ६७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

स्थानिक नागरिकांचे एमएमआरडीएला सवाल

टनेलमधील दगड कशेळी डेपोमध्ये वापरण्याची परवानगी कुणी दिली, आतापर्यंत किती दगड डेपोमध्ये आणण्यात आला, त्याच्या वाहतूक व वापरासाठी किती खर्च झाला, कंत्राटदाराला आतापर्यंत किती रक्कम अदा करण्यात आली, असे विविध सवाल स्थानिक नागरिकांनी एमएमआरडीएला केले आहेत. या प्रश्नांवरील अधिकृत कागदपत्रे आणि तांत्रिक अहवाल सार्वजनिक झाल्यानंतरच टनेलमधील दगडाचा कशेळी डेपोमध्ये केलेला वापर मंजूर निकषांनुसार आहे की नाही, हे स्पष्ट होणार आहे.

बुलेट ट्रेनसाठी भिवंडीत महाराष्ट्रातील पहिला स्टील पूल तयार; ५४ हजारांहून अधिक बोल्टचा वापर

चिखलमय मातीमुळे तांत्रिक तपासणी महत्त्वाची

एमएमआरडीएच्या माहितीनुसार कशेळी डेपो सुमारे २७ हेक्टर क्षेत्रात विकसित होत असून परिसरातील खाडीतील चिखलमय मातीची परिस्थिती लक्षात घेऊन जमिनीला खचण्यापासून रोखण्यासाठी आणि तिची ताकद वाढवण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो आहे. त्यासाठी आयआयटी मुंबईची मदतही घेण्यात येत आहे. त्यामुळे भरावासाठी वापरण्यात येणाऱ्या दगडाची गुणवत्ता, माती घट्ट बसवण्यासंदर्भात आणि तांत्रिक मान्यता याबाबत पारदर्शक माहिती द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. मात्र, केवळ दगडाचा वापर झाल्याने डेपो असुरक्षित आहे, असा निष्कर्ष काढता येत नाही. त्यासाठी मटेरियल टेस्टिंग, सॉईल इन्व्हेस्टिगेशन, कॉम्पॅक्शन रिपोर्ट्स आणि जिओटेक्निकल सर्टिफिकेशन तपासणे आवश्यक असल्याचे एमएमआरडीएने कळविले आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Metro line 5 kasheli metro depot filling work allegations mmrda contractor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • Metro
  • MMRDA
  • Thane news

संबंधित बातम्या

Pune News: पुणे मेट्रोच्या विस्ताराला राज्याची मोठी चालना; तीन मार्गांसाठी १८० कोटींचा निधी मंजूर
1

Pune News: पुणे मेट्रोच्या विस्ताराला राज्याची मोठी चालना; तीन मार्गांसाठी १८० कोटींचा निधी मंजूर

Thane Crime: ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची हत्या; कार्यालयात घुसून गोळीबार, धारदार शस्त्रानेही हल्ला
2

Thane Crime: ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची हत्या; कार्यालयात घुसून गोळीबार, धारदार शस्त्रानेही हल्ला

Ulhas River: उल्हास नदीतील गढूळता वाढली; बदलापूर-अंबरनाथमध्ये पाणीपुरवठ्यावर संकट
3

Ulhas River: उल्हास नदीतील गढूळता वाढली; बदलापूर-अंबरनाथमध्ये पाणीपुरवठ्यावर संकट

Thane News: मंगळुरू एक्सप्रेसमधून दारूची तस्करी; रेल्वे अटेंडंटकडून ७१ हजारांचा मद्यसाठा जप्त
4

Thane News: मंगळुरू एक्सप्रेसमधून दारूची तस्करी; रेल्वे अटेंडंटकडून ७१ हजारांचा मद्यसाठा जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.