Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayandar BJP: स्वकीयांमुळेच महासभेत भाजपची कोंडी; नगरसेविका निला सोन्स यांची आक्रमक भूमिका चर्चेत

Mira Bhayandar BJP: मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभांमध्ये भाजपच्या नगरसेविका निला सोन्स यांच्या आक्रमक भूमिकेची चर्चा रंगली आहे. प्रभाग क्रमांक १८ मधून सलग दहाव्यांदा भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या निला सोन्स विविध नागरी प्रश्नांवर सत्ताधारी पक्षासह प्रशासनालाही जाब विचारत आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 21, 2026 | 12:09 PM
स्वकीयांमुळेच महासभेत भाजपची कोंडी; नगरसेविका निला सोन्स यांची आक्रमक भूमिका चर्चेत

स्वकीयांमुळेच महासभेत भाजपची कोंडी; नगरसेविका निला सोन्स यांची आक्रमक भूमिका चर्चेत

Follow Us
Follow Us:
  • सत्ताधाऱ्यांपेक्षा स्वकीय नगरसेविकेचाच आक्रमक बाणा!
  • निला सोन्स यांच्या भूमिकेने भाजपची महासभेत कोंडी
  • विविध नागरी प्रश्नांवर आक्रमक भूमिका
विजय काते, मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या गेल्या काही महासभांमध्ये सत्ताधारी भाजपला विरोधकांपेक्षा स्वकीय नगरसेविका निला सोन्स यांच्या आक्रमक भूमिकेमुळेच अधिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विविध नागरी प्रश्नांवर त्या सत्ताधारी पक्षासह प्रशासनालाही जाब विचारत असल्याने त्यांच्या भूमिकेची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

प्रभाग क्रमांक १८ मधून सलग दहाव्यांदा भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या निला सोन्स या पक्षाच्या भूमिकेशी विसंगत वाटणाऱ्या मुद्द्यांवरही सभागृहात उघडपणे आक्षेप घेत आहेत. जनहिताच्या विरोधात किंवा चुकीचे निर्णय घेतले जात असल्याचे सांगत त्या सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारत आहेत. मालमत्ता भाड्याने देणे, करवाढ तसेच विविध नागरी प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आक्रमक भूमिका घेतली आहे.

पालिका शाळेच्या इमारतीच्या प्रस्तावाला विरोध

मंगळवारी झालेल्या महासभेत पालिका शाळेची इमारत भाड्याने देण्याच्या प्रस्तावाला सोन्स यांनी विरोध दर्शवला. स्वतःचा वैयक्तिक ठराव मांडण्यासाठी त्या उभ्या राहिल्या असता, त्याचवेळी सत्ताधारी पक्षाकडून दुसरा ठराव मांडण्यास सुरुवात झाल्याने सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. ठराव मांडण्याची मुभा नसल्याचे सांगत त्यांना संधी देण्यात आली नसल्याचा आरोपही करण्यात आला. या प्रकारानंतर काही नगरसेवकांनी सोन्स यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करण्याची मागणी केली. मात्र, या मागणीवर महापौर किंवा इतर पदाधिकाऱ्यांकडून ठोस भूमिका घेण्यात आली नसल्याचे दिसून आले.

Mira Bhayandar News: ‘महासभा लाईव्ह का नाही?’ मिरा-भाईंदर महापालिकेबाहेर समाजसेवकांचे ठिय्या आंदोलन

महासभेतील चित्रीकरणावरही प्रश्नचिन्ह

महासभेतील छायाचित्रण आणि चित्रीकरणास मनाई करण्याच्या निर्णयाचीही चर्चा सुरू आहे. सोन्स यांच्या महासभेतील भूमिका, व्हिडिओ किंवा छायाचित्रे समाजमाध्यमे आणि प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध होऊ नयेत, यासाठीच हा निर्णय घेतला गेला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, याबाबत अधिकृत कारण स्पष्ट झालेले नाही. महासभेचे थेट प्रक्षेपण केले जाणार असल्याचा दावा सत्ताधारी भाजपकडून करण्यात आला असला, तरी गेल्या काही महिन्यांत त्याबाबत ठोस कार्यवाही झालेली नसल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.

विरोधकांपेक्षा स्वकीय नगरसेविकेचीच आक्रमकता

मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपला ७८ जागा मिळाल्या असून काँग्रेसला १३, तर शिवसेनेला तीन जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे भाजप सत्तेत असून काँग्रेस आणि शिवसेना विरोधी बाकांवर आहेत. नागरिकांच्या प्रश्नांवर विरोधकांकडून आक्रमक भूमिका अपेक्षित असताना, गेल्या काही महासभांमध्ये सत्ताधाऱ्यांना सर्वाधिक प्रश्न स्वकीय नगरसेविकेकडूनच विचारले जात असल्याचे चित्र आहे.

सोन्स यांच्या प्रश्नांना उत्तर देताना प्रशासनालाही सावध भूमिका घ्यावी लागत असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या मुद्द्यांना खोडून काढण्यासाठी तसेच त्यांच्यावर दबाव निर्माण करण्यासाठी भाजपकडून काही महिला नगरसेविकांच्या माध्यमातून सभागृहात ‘फिल्डिंग’ लावली जात असल्याची राजकीय चर्चा आहे. मात्र, त्यानंतरही सोन्स यांना गप्प करण्यात भाजपला अपेक्षित यश मिळत नसल्याचे चित्र आहे.

त्यामुळे आगामी महासभांमध्ये निला सोन्स यांची भूमिका काय राहणार आणि पक्ष त्यांच्याविरोधात कोणती भूमिका घेणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Mira Bhayandar News: मिरा-भाईंदर महापालिकेत पुन्हा राजकीय रणकंदन; शिवसेना नगरसेविकांचा सभात्याग

Web Title: Mira bhayandar bjp corporator neela sonis aggressive stand general body meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 12:09 PM

Topics:  

  • BJP
  • mira bhayandar
  • Property Tax

संबंधित बातम्या

West Bangal : ‘पश्चिम बंगाल’ होणार आता.. .! नामांतराच्या हालचालींना वेग, विधानसभेत विधेयक आणणार
1

West Bangal : ‘पश्चिम बंगाल’ होणार आता.. .! नामांतराच्या हालचालींना वेग, विधानसभेत विधेयक आणणार

Nagpur News :चार उमेदवारांचे अर्ज दाखल; शक्तिप्रदर्शनाचा जोर, भाजपची रॅली मात्र रद्द
2

Nagpur News :चार उमेदवारांचे अर्ज दाखल; शक्तिप्रदर्शनाचा जोर, भाजपची रॅली मात्र रद्द

Ulhasnagar Political News: भाजपा-शिवसेनेचा संघर्ष चिघळला; कमलेश निकम यांच्या तक्रारीवर भाजपच्या 6 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा
3

Ulhasnagar Political News: भाजपा-शिवसेनेचा संघर्ष चिघळला; कमलेश निकम यांच्या तक्रारीवर भाजपच्या 6 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

Mira Bhayandar News: फेरीवाला ओळखपत्र वाटपाचा अधिकार ठेकेदाराला कोणी दिला? समितीला अंधारात ठेवून कार्डांचे वाटप
4

Mira Bhayandar News: फेरीवाला ओळखपत्र वाटपाचा अधिकार ठेकेदाराला कोणी दिला? समितीला अंधारात ठेवून कार्डांचे वाटप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.