Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक प्रकार : शासकीय रुग्णालयात १.६५ कोटींची मुदतबाह्य औषधे; प्रशासनाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

मीरा-भाईंदरमधील शासकीय रुग्णालयात तब्बल १.६५ कोटी रुपयांची मुदतबाह्य औषधे सापडल्याने खळबळ उडाली आहे. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 24, 2026 | 05:45 PM
धक्कादायक प्रकार : शासकीय रुग्णालयात १.६५ कोटींची मुदतबाह्य औषधे; प्रशासनाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

धक्कादायक प्रकार : शासकीय रुग्णालयात १.६५ कोटींची मुदतबाह्य औषधे; प्रशासनाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

Follow Us
Close
Follow Us:
  • शासकीय रुग्णालयात १.६५ कोटींची मुदतबाह्य औषधे
  • प्रशासनाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
  • तब्बल १ कोटी ६५ लाख रुपयांच्या मुदतबाह्य
भाईंदर : भाईंदर पश्चिम येथील पंडित भीमसेन जोशी शासकीय रुग्णालयात तब्बल १ कोटी ६५ लाख रुपयांच्या मुदतबाह्य (एक्सपायर) औषधांचा साठा आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ही औषधे एका सामाजिक संस्थेकडून देणगी स्वरूपात देण्यात आली होती. मात्र रुग्णालय प्रशासनाच्या वेळेवरच्या सतर्कतेमुळे ही औषधे रुग्णांना देण्यात आली नाहीत आणि संभाव्य मोठा अनर्थ टळला.

देणगीतून आलेला साठा, पण मुदत संपलेली औषधे मिळालेल्या माहितीनुसार, २७ मार्च रोजी ‘सक्षम फाउंडेशन’ या सामाजिक संस्थेमार्फत रुग्णालयाला मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा देण्यात आला. या कार्यक्रमावेळी आमदार नरेंद्र मेहता, महापौर डिंपल मेहता आणि उपमहापौर ध्रुव किशोर पाटील उपस्थित असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, रुग्णालय प्रशासनाने औषधांची तपासणी केली असता धक्कादायक बाब समोर आली. या औषधांपैकी अनेक औषधांची मुदत ३० मार्चलाच संपत असल्याचे निदर्शनास आले. काही औषधे आधीच मुदतबाह्य झालेली होती.

Farmer Potest : साजिद हसन मुश्रीफ यांनी खरेदी केलेल्या जमिनीतून शेतकऱ्यांना रस्ता नाही, उलट आरोप होत असल्याने शेतकरी संतप्त

प्रशासनाची तत्परता; औषधांचा वापर थांबवला

रुग्णालयाचे व्यवस्थापक जाफर तडवी यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेत संबंधित संस्थेला लेखी तक्रार दिली. तसेच या घटनेची माहिती राज्य शासनालाही कळवण्यात आली. महत्वाचे म्हणजे, ही औषधे रुग्णांना वितरित न करता ताब्यात ठेवण्यात आली, त्यामुळे कोणतीही जीवितहानी टळली.

मंत्री प्रताप सरनाईक यांची पाहणी; गुन्हा दाखल करण्याचे निर्देश

या गंभीर प्रकाराची माहिती मिळताच महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी रुग्णालयाला भेट देत संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी रुग्णालय प्रशासनाच्या सतर्कतेचे कौतुक करत, संबंधित सामाजिक संस्थेविरुद्ध रुग्णांच्या जीवाशी खेळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.तसेच रुग्णालयात असलेल्या विविध गैरसोयी आणि सुविधांतील त्रुटी दूर करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना देण्यात आल्या.

शहरातील एकमेव मोठे शासकीय रुग्णालय; सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

भाईंदरमधील २०० खाटांचे पंडित भीमसेन जोशी शासकीय रुग्णालय हे परिसरातील एकमेव मोठे शासकीय आरोग्य केंद्र आहे. येथे दररोज मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र, अपुऱ्या सुविधा, मनुष्यबळाची कमतरता आणि व्यवस्थापनातील त्रुटी यामुळे रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत.

गंभीर प्रश्न उपस्थित

एवढ्या मोठ्या प्रमाणात मुदतबाह्य औषधे देणगी म्हणून कशी स्वीकारली गेली?
औषधांची गुणवत्ता आणि मुदत तपासण्याची जबाबदारी कोणाची?
सामाजिक संस्थांची पडताळणी कितपत काटेकोरपणे केली जाते?

पुढील कारवाईकडे लक्ष

या प्रकरणात आता पोलीस तपास आणि प्रशासकीय चौकशी सुरू होण्याची शक्यता असून, दोषींवर कठोर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, नागरिकांमध्ये या घटनेबाबत संताप व्यक्त होत असून, रुग्णांच्या सुरक्षेबाबत अधिक कडक नियमांची मागणी होत आहे.

भिवंडीत आरोग्यव्यवस्थेच्या निष्काळजीपणाचा बळी! रुग्णवाहिका न मिळाल्याने घरात प्रसूती; नवजात बाळाचा मृत्यू

Web Title: Mira bhayandar government hospital expired medicines 1 65 crore alert prevented mishap

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 05:45 PM

Topics:  

  • india
  • maharashtra
  • mira bhayandar

संबंधित बातम्या

Government Employees : राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप;  मात्र अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात रुग्णसेवा सुरू
1

Government Employees : राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; मात्र अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात रुग्णसेवा सुरू

Panvel News: पनवेल महानगरात मनसेची ‘मराठी’ स्टिकर मोहीम; नव्या नियमाच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापले
2

Panvel News: पनवेल महानगरात मनसेची ‘मराठी’ स्टिकर मोहीम; नव्या नियमाच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापले

अहिल्यानगरमध्ये ‘ग्रामीण AI समिट’चा उत्साह; सावेडीतील माऊली संकुलात तंत्रज्ञानाचा जागर
3

अहिल्यानगरमध्ये ‘ग्रामीण AI समिट’चा उत्साह; सावेडीतील माऊली संकुलात तंत्रज्ञानाचा जागर

Mira-Bhayandar : भाईंदरमध्ये अमली पदार्थविरोधी कारवाई; नायजेरियन नागरिक अटकेत, कोकेन जप्त
4

Mira-Bhayandar : भाईंदरमध्ये अमली पदार्थविरोधी कारवाई; नायजेरियन नागरिक अटकेत, कोकेन जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.