Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira-Bhayander: मीरा-भाईंदरमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाईला वेग; ९ कोटींच्या ई-निविदेला सुरुवात

मीरा-भाईंदर शहरातील अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे आणि धोकादायक इमारतींवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने मोठे पाऊल उचलले आहे. या कारवाईसाठी आवश्यक यंत्रसामग्री आणि वाहने उपलब्ध करून देण्यासाठी तब्बल ९ कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चाची तीन वर्षांची ई-निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 08, 2026 | 10:15 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • मीरा-भाईंदरमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई होणार
  • कारवाईसाठी आवश्यक यंत्रसामग्री आणि वाहने उपलब्ध होणार
  • २८ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत निविदा सादर करता येणार
 

 

मीरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीतील अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे तसेच धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतीवर प्रभावीपणे कारवाई करण्यासाठी महापालिका प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे. कारवाईसाठी आवश्यक असलेली यंत्रसामग्री आणि वाहने उपलब्ध करून घेण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागामार्फत तीन वर्षांच्या कालावधीसाठी ई-निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या कामासाठी सुमारे ९ कोटी रुपयांची अंदाजित तरतूद करण्यात आली आहे. मीरा-भाईंदर शहरात अनधिकृत बांधकामांचा प्रश्न सातत्याने चर्चेत असतानाच धोकादायक इमारतींचाही प्रश्न गंभीर बनला आहे. यावर्षी शहरातील तब्बल ४४ इमारती अतिधोकादायक स्थितीत असल्याचे समोर आले आहे.

२८ ऑगस्ट निविदा सादर करण्याची अंतिम तारीख

महापालिकेने या कामासाठी इच्छुक कंत्राटदारांकडून ई-निविदा मागविल्या आहेत. ५ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट या कालावधीत इच्छुक निविदाधारकांना ई-निविदा पत्रके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. निविदा सादर करण्याची अंतिम मुदत २८ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे.

मिरा-भाईंदरमधील अडीच वर्षांच्या श्लोका शाहचा विश्वविक्रम; ‘बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये नोंद

ऑनलाइन प्रक्रियेलाच प्राधान्य

निविदा प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार असून, निविदा पत्रके किंवा निविदा पोस्टाद्वारे स्वीकारली जाणार नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. निविदा इसारा रक्कम तसेच निविदा शुल्क ऑनलाइन रिसीट प्रणालीद्वारे भरावे लागणार आहे

कारवाईला मिळणार यंत्रबळ

शहरातील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे आणि धोकादायक इमारतींवर कारवाई करताना महापालिकेला अनेकदा पुरेशी यंत्रसामग्री आणि वाहने उपलब्ध नसल्याने अडचणी निर्माण होतात.
तीन वर्षांसाठी करण्यात येणाऱ्या या निविदेमुळे आवश्यक यंत्रसामग्री व वाहनांची उपलब्धता सुनिश्चित होऊन कारवाईला गती मिळण्याची अपेक्षा आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेवर भर

धोकादायक इमारती आणि अनधिकृत बांधकामांचा थेट संबंध नागरिकांच्या सुरक्षिततेशी आहे. त्यामुळे केवळ कारवाई करणेच नव्हे, तर धोकादायक परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेही महत्त्वाचे आहे. महापालिकेच्या या ई-निविदेमुळे आवश्यक यंत्रबळ उपलब्ध होऊन अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे आणि अतिधोकादायक इमारतींवरील कारवाई अधिक प्रभावी आणि वेगवान होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Mira Bhayandar: ९८ मीटर जलवाहिनीचे काम रखडले; १५ लाख नागरिकांच्या पाणीपुरवठ्यावर संकट, सक्तीच्या भूसंपादनाची मागणी

अतिक्रमणांवरही कारवाईची शक्यता

शहरातील विविध भागांमध्ये रस्ते, सार्वजनिक जागा आणि इतर ठिकाणी झालेल्या अतिक्रमणांमुळे वाहतूक तसेच नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. अनधिकृत बांधकामांमुळे शहराच्या नियोजनावरही परिणाम होण्याची शक्यता असते. महापालिकेच्या अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागामार्फत करण्यात येणाऱ्या कारवाईसाठी आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध झाल्यास अशा कारवायांना अधिक गती मिळण्याची अपेक्षा आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मीरा-भाईंदरमध्ये किती इमारती अतिधोकादायक आहेत?

    Ans: यावर्षी शहरातील ४४ इमारती अतिधोकादायक स्थितीत असल्याचे समोर आले आहे.

  • Que: अनधिकृत बांधकामांवर कारवाईसाठी किती रुपयांची तरतूद करण्यात आली आहे?

    Ans: कारवाईसाठी आवश्यक यंत्रसामग्री आणि वाहने उपलब्ध करून घेण्यासाठी सुमारे ९ कोटी रुपयांची अंदाजित तरतूद करण्यात आली आहे.

  • Que: निविदा सादर करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?

    Ans: निविदा २८ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत सादर करता येणार आहे.

Web Title: Mira bhayandar unauthorized construction action 9 crore e tender

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 10:15 AM

Topics:  

  • maharshtra
  • mira bhayandar
  • Mira Bhayandar Municipal Corporation

संबंधित बातम्या

Mira Bhayandar Schools: चार महिने उलटले, तरी विद्यार्थ्यांच्या हातात पाण्याची बाटली नाही! महापालिका शाळांचा ढिसाळ कारभार
1

Mira Bhayandar Schools: चार महिने उलटले, तरी विद्यार्थ्यांच्या हातात पाण्याची बाटली नाही! महापालिका शाळांचा ढिसाळ कारभार

Maharashtra News: तंजावरच्या मातीत घुमणार मराठीचा जयघोष! दक्षिण भारतातील पहिलं मराठी साहित्य संमेलन 23 तारखेला
2

Maharashtra News: तंजावरच्या मातीत घुमणार मराठीचा जयघोष! दक्षिण भारतातील पहिलं मराठी साहित्य संमेलन 23 तारखेला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.