श्लोका हिने यादृच्छिक (Randomly) पद्धतीने दाखविण्यात आलेल्या इंग्रजी वर्णमालेच्या फ्लॅश कार्ड्सवरून अनेक शब्द अचूक ओळखण्याची अनोखी कामगिरी केली. या कामगिरीमुळे “यादृच्छिक पद्धतीने सादर केलेल्या इंग्रजी वर्णमालेच्या फ्लॅश कार्ड्सवरून अनेक शब्द अचूक ओळखणारी सर्वात लहान वयाची बालिका” हा विश्वविक्रम तिच्या नावावर नोंदविण्यात आला.
बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने दिलेल्या प्रमाणपत्रात श्लोकाची विलक्षण स्मरणशक्ती, उत्कृष्ट शिकण्याची क्षमता आणि शब्द ओळखण्याचे कौशल्य यांचे विशेष कौतुक करण्यात आले आहे. तिच्या बौद्धिक विकास, समर्पण आणि नैसर्गिक प्रतिभेची दखल घेत तिला हा जागतिक सन्मान प्रदान करण्यात आला आहे.
अवघ्या अडीच वर्षांच्या वयात मिळविलेल्या या यशामुळे श्लोकाचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, मिरा-भाईंदर शहरासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे. तिच्या या यशामागे तिच्या पालकांचे मार्गदर्शन, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि योग्य प्रशिक्षण यांचाही महत्त्वाचा वाटा असल्याचे बोलले जात आहे.






