Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayander : भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य; नवघर पोलीस ठाण्यात नगरसेवकांचे आंदोलन

मिरा-भाईंदर शहरातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत असून, भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्याविरोधात समाजमाध्यमांवर करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 17, 2026 | 03:44 PM
Mira Bhayander : भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य; नवघर पोलीस ठाण्यात नगरसेवकांचे आंदोलन
Follow Us
Close
Follow Us:

 

  • भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य
  • नवघर पोलीस ठाण्यात नगरसेवकांचे आंदोलन
भाईंदर/ विजय काते : मिरा-भाईंदर शहरातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत असून, भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्याविरोधात समाजमाध्यमांवर करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. या प्रकरणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत भाजपच्या 50 हून अधिक नगरसेवकांनी भाईंदरमधील नवघर पोलीस ठाण्यात धाव घेत आंदोलन केले.मागील काही दिवसांपासून आमदार नरेंद्र मेहता आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यातील वाद चिघळला असून, दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. याचपार्श्वभूमीवर हा वाद आता समाजमाध्यमांवरही पोहोचला असून समर्थकांमध्ये तीव्र शब्दयुद्ध रंगले आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या युवासेनेचे पदाधिकारी गुरु ज्योतसिंग यांनी समाजमाध्यमावर एक व्हिडिओ प्रसिद्ध करत आमदार मेहता यांच्यावर टीका केली. या व्हिडिओमध्ये आक्षेपार्ह भाषा व शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. या घटनेचा निषेध व्यक्त करत भाजप नगरसेवकांनी संबंधित पदाधिकाऱ्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. याशिवाय, समाजमाध्यमांवर बनावट फोटो आणि आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणाऱ्यांवरही कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवकांनी पोलिसांकडे केली आहे.

दरम्यान, नगरसेवकांचे निवेदन नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी यांनी स्वीकारले असून, या प्रकरणाचा सखोल तपास करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.या संपूर्ण प्रकारामुळे मिरा-भाईंदरमधील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत असून, आगामी काळात हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Mira Bhayander : ”प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर…”; भाजप आमदाराच्या वक्तव्यानंतर वाद चिघळळा; पुर्वेश सरनाईकांनी केली टीका

नरेंद्र मेहता यांनी एका युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत असं म्हणाले होते की, “प्रताप सरनाईक मेरे ड्रायव्हर होते”. या वक्तव्यामुळे सरनाईक विरुद्ध मेहता हा वाद चांगलाच चिघळला आहे. यासगळ्याने सरनाईक यांचे सुपुत्र पुर्वेश सरनाईक यांनी नरेंद्र मेहता यांना निवेदन देत सणसणीत टीका केली. नरेंद्र मेहता यांना दिलेल्या निवेदनात पुर्वेश सरनाईक म्हणाले की, सर्वप्रथम, मीरा भाईंदर महानगरपालिकेतील आपल्या भव्य विजयाबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन. जनतेने दिलेला हा कौल आम्ही पूर्णपणे मान्य करतो आणि त्याचा आदरही करतो. लोकशाहीत जनतेचा निर्णय अंतिम असतो हे आम्हालाही तेवढ्याच प्रामाणिकपणे पटते. मात्र, या विजयानंतर आपण आता शहराच्या विकासावर, जनतेच्या प्रश्नांवर आणि ठोस कामांवर लक्ष केंद्रित कराल, अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे. परंतु, दुर्दैवाने गेल्या काही दिवसांत आपल्या वक्तव्यांमध्ये केवळ प्रताप सरनाईक यांच्यावर टीका करण्याचीच घाई दिसून येत आहे. जे स्वतः चार वेळा जनतेने निवडून दिलेले आमदार आणि आज राज्याचे मंत्री आहेत.

आपले अलीकडील वक्तव्य “प्रताप सरनाईक मेरे ड्राइवर होते” हे ऐकून खरोखरच आश्चर्य वाटले नाही. कारण ते आपल्या राजकीय संस्कारांचेच प्रतिबिंब होते. मात्र, त्यातून आपल्या व्यक्तिमत्त्वातील खालच्या पातळीचा अंदाज नक्कीच आला. मेहताजी, राजकारणात मतभेद असू शकतात, विचार वेगळे असू शकतात पण त्यात एक सभ्यता आणि मर्यादा असते. ती राखणे ही प्रत्येक जनप्रतिनिधीची जबाबदारी असते.राजकारणात मोठेपणा शब्दांनी नव्हे, तर वर्तनाने सिद्ध करावा लागतो. माझ्या आई-वडिलांनी मला एक गोष्ट शिकवली आहे.विचार जुळत नसले तरी व्यक्तीचा आदर ठेवावा आणि तेच मी आजपर्यंत पाळत आलो आहे, अशा तीव्र शब्दात पुर्वेश यांनी मेहता यांचा निषेध केला.

Pratap Sarnaik : मीरा-भाईंदरचे राजकारण तापले; आरोप-प्रत्यारोपांची पातळी घसरली, सरनाईक-मेहता आमनेसामने

Web Title: Mira bhayander offensive statement against bjp mla narendra mehta corporators protest at navghar police station

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 03:44 PM

Topics:  

  • Marathi News
  • navrashtra news
  • Pratap Saranaik

संबंधित बातम्या

Kolhapur News : भारतीय वायू दलात अभियंत्यांसाठी मोठ्या संधी; डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये वायू दल अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन
1

Kolhapur News : भारतीय वायू दलात अभियंत्यांसाठी मोठ्या संधी; डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये वायू दल अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन

भारतीय खाद्यपदार्थ आता युरोपच्या शेल्फवर! लेबलिंग नियमांच्या मार्गदर्शनासाठी TPCI आणि LabelBlind यांचा विशेष उपक्रम
2

भारतीय खाद्यपदार्थ आता युरोपच्या शेल्फवर! लेबलिंग नियमांच्या मार्गदर्शनासाठी TPCI आणि LabelBlind यांचा विशेष उपक्रम

Latur News : आरक्षण नव्हे सत्तेत भागीदारी! लातुरातील महिलांचा ऐतिहासिक पदयात्रेने हुंकार
3

Latur News : आरक्षण नव्हे सत्तेत भागीदारी! लातुरातील महिलांचा ऐतिहासिक पदयात्रेने हुंकार

Pratap Sarnaik : राज्यातील सर्व एसटी स्वच्छतागृहे 1 जूनपासून मोफत,कोल्हापुरात मंत्र्यांची मोठी घोषणा 
4

Pratap Sarnaik : राज्यातील सर्व एसटी स्वच्छतागृहे 1 जूनपासून मोफत,कोल्हापुरात मंत्र्यांची मोठी घोषणा 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.