Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात! एका बाईकवर पाच विद्यार्थी, नियमांची पायमल्ली; Viral Video ने उघड केला निष्काळजीपणा

मीरा रोडच्या नया नगर परिसरात एका दुचाकीवर पाच शाळकरी विद्यार्थी प्रवास करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, नागरिकांनी वाहतूक पोलिसांनी कठोर कारवाई करण्यासह शाळा परिसरात अधिक देखरेख आणि जनजागृती मोहीम राबविण्याची मागणी केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 29, 2026 | 11:58 AM
शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात! एका बाईकवर पाच विद्यार्थी, नियमांची पायमल्ली; व्हायरल व्हिडिओने उघड केला निष्काळजीपणा

शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात! एका बाईकवर पाच विद्यार्थी, नियमांची पायमल्ली; व्हायरल व्हिडिओने उघड केला निष्काळजीपणा

Follow Us
Follow Us:
  • शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात!
  • एका बाईकवर पाच विद्यार्थी, नियमांची पायमल्ली
  • व्हायरल व्हिडिओने उघड केला निष्काळजीपणा
विजय काते, मीर रोड : मीरा रोडच्या नया नगर परिसरात वाहतूक नियमांचे पुन्हा एकदा सर्रास उल्लंघन होत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका दुचाकीवर तब्बल पाच शाळकरी विद्यार्थी प्रवास करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप आणि चिंता व्यक्त केली जात आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये शाळेचा गणवेश परिधान केलेले अल्पवयीन विद्यार्थी एका दुचाकीवर क्षमतेपेक्षा अधिक संख्येने बसून प्रवास करताना दिसत आहेत. अशा प्रकारे दुचाकीवर अतिरिक्त प्रवासी घेऊन प्रवास करणे हे मोटार वाहन कायद्यानुसार गंभीर वाहतूक नियमांचे उल्लंघन मानले जाते. यामुळे अपघाताचा धोका अनेकपटीने वाढतो आणि विद्यार्थ्यांच्या जीवितालाही मोठा धोका निर्माण होतो.

Mira Road News: मीरा रोडच्या पूनम सागर सोसायटीत घोणस सापाची एंट्री; रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण

यापूर्वीही मीरा रोडमधील सेव्हन इलेव्हन शाळेसमोर अशाच प्रकारचा प्रकार उघडकीस आला होता. त्या वेळी वाहतूक विभागाने संबंधितांवर कारवाई केली होती. मात्र, अशा घटना सातत्याने समोर येत असल्याने वाहतूक विभागाच्या कारवाईची प्रभावी अंमलबजावणी होत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

स्थानिक नागरिकांनी शाळांच्या परिसरात वाहतूक पोलिसांची नियमित गस्त वाढवावी, अल्पवयीन वाहनचालकांवर कठोर कारवाई करावी तसेच पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षा व वाहतूक नियमांविषयी व्यापक जनजागृती करावी, अशी मागणी केली आहे. शाळा प्रशासनानेही विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पालकांना वेळोवेळी सूचना देऊन नियमांचे पालन करण्यासाठी प्रबोधन करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे मीरा-भाईंदर शहरातील रस्ता सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. एखादी गंभीर दुर्घटना घडण्यापूर्वी वाहतूक विभाग, शाळा प्रशासन आणि पालक यांनी समन्वयाने काम करून अशा प्रकारांना आळा घालणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

तसेच मीरा रोड परिसरात बेव्हर्ली पार्क परिसरातील ए.एन.के. लक्झरी सलून अँड स्पा येथे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात स्पाच्या आड कथित देहव्यापार सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला. या कारवाईत पाच तरुणींची सुटका करण्यात आली असून, या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांना या स्पामध्ये बेकायदेशीर प्रकार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान स्पा सेंटरमध्ये कथित देहव्यापार सुरू असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून पाच तरुणींना सुरक्षित ताब्यात घेत त्यांची सुटका केली.

Mira Road News: 11 व्या मजल्यावरून टॉवर क्रेन कोसळली; 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू, अनेक वाहनांचा चक्काचूर

Web Title: Mira road five school students on one bike viral video traffic rules violated

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 11:58 AM

Topics:  

  • Mira Road
  • Traffic
  • viral video

संबंधित बातम्या

Exclusive: काशिमीरात मेट्रो ब्रिजखाली थरार! तरुणाच्या अंगावर कोसळला सिमेंटचा ब्लॉक; घटनेचा थरारक CCTV व्हिडिओ ‘नवराष्ट्र’च्या हाती
1

Exclusive: काशिमीरात मेट्रो ब्रिजखाली थरार! तरुणाच्या अंगावर कोसळला सिमेंटचा ब्लॉक; घटनेचा थरारक CCTV व्हिडिओ ‘नवराष्ट्र’च्या हाती

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत;  VIDEO VIRAL
2

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत; VIDEO VIRAL

iPhone 18 Pro Price in India: आयफोन 18 Pro ची किंमत ऐकून ग्राहकांना धक्का; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!
3

iPhone 18 Pro Price in India: आयफोन 18 Pro ची किंमत ऐकून ग्राहकांना धक्का; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!

Asian Games 2026: ‘भारतीय खेळाडूंची कामगिरी…’; Rishabh Pant चा व्हिडिओ Viral
4

Asian Games 2026: ‘भारतीय खेळाडूंची कामगिरी…’; Rishabh Pant चा व्हिडिओ Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.