Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

१५ वर्षीय मुलगी आणि ७ वर्षीय चिमुरडीवरील अत्याचाराने हादरले कल्याण; महिलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र पोलीस चौकीची मागणी

महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात भाजपा आमदार सुलभा गणपत गायकवाड यांनी कल्याण पूर्वमधील महिलांच्या आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न उपस्थित केला. कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पावधीत घडलेल्या १५ वर्षीय मुलीवरील सामूहिक अत्याचार आणि ७ वर्षीय चिमुरडीवरील लैंगिक अत्याचारावर संताप व्यक्त केला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 27, 2026 | 03:42 PM
१५ वर्षीय मुलगी आणि ७ वर्षीय चिमुरडीवरील अत्याचाराने हादरले कल्याण; महिलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र पोलीस चौकीची मागणी

१५ वर्षीय मुलगी आणि ७ वर्षीय चिमुरडीवरील अत्याचाराने हादरले कल्याण; महिलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र पोलीस चौकीची मागणी

Follow Us
Follow Us:
  • कल्याण पूर्वेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरण
  • भाजपा आमदार सुलभा गायकवाड यांनी अधिवेशनात मांडला मुद्दा
  • महिलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र पोलीस चौकीची मागणी
Women Safety, Minor Girls Assault: महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात भाजपा आमदार सुलभा गणपत गायकवाड यांनी कल्याण पूर्वमधील महिलांच्या आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा अत्यंत गंभीर मुद्दा उपस्थित केला. कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवघ्या काही दिवसांच्या अंतराने घडलेल्या दोन धक्कादायक घटनांनी संपूर्ण परिसर हादरला असून, या घटनांमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनांमध्ये एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली, तर त्यानंतर केवळ ७ वर्षीय निष्पाप चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली. या दोन्ही घटना केवळ गुन्हे नसून समाजाच्या संवेदनशीलतेला आणि विवेकबुद्धीला हादरा देणाऱ्या असल्याचे आमदार गायकवाड यांनी सभागृहात नमूद केले. त्यांनी पीडित मुलींना तातडीने सर्वतोपरी मदत देण्याची मागणी करत आर्थिक, वैद्यकीय आणि मानसिक आधार उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त केली. तसेच, या प्रकरणांतील आरोपींवर जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यांना कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा बसेल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर बकरी ईदच्या दिवशी हिंदूंना प्रवेशबंदी, दोन्ही शिवसेना आणि भाजपकडून घंटानाद आंदोलन

महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक प्रभावीपणे हाताळण्यासाठी कल्याण पूर्वातील चक्की नाका, १०० फुटी रोड आणि मलंग रोड परिसरात स्वतंत्र पोलीस चौकी तातडीने मंजूर करून कार्यान्वित करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. याशिवाय या भागात पोलीस गस्त वाढवून सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

7 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

कल्याणमध्ये एका ७ वर्षांच्या मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी रविवारी तिघांना अटक करण्यात आली. कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी सांगितले की, हे तिन्ही आरोपी गेल्या आठ महिन्यांपासून मुलीच्या निरागसतेचा गैरफायदा घेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते. हे प्रकरण तेव्हा उघडकीस आले, जेव्हा मुलगी तिच्या चुलत बहिणीसोबत खेळत असताना काहीतरी असे करू लागली ज्यामुळे तिच्या आजीला संशय आला. आजीने मुलीला विचारले. मुलीने सांगितलेल्या गोष्टी ऐकून आजीला धक्का बसला. आजीने ही गोष्ट तिच्या मुलाला आणि आईला सांगितली. त्यानंतर पालकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली, ज्यांनी रविवारी गुन्हा दाखल करून तिन्ही आरोपींना अटक केली.

आरोपी शाळेनंतर मुलीवर बलात्कार करत असत. तपासादरम्यान पोलिसांना असे आढळून आले की, शाळेनंतर तिला घेण्यासाठी येणारी ऑटो-रिक्षा यायला १५ मिनिटे लागत असत. या वेळेत, तिन्ही आरोपी मुलीला जवळच्या एका पडक्या इमारतीत घेऊन जात आणि तिच्यावर बलात्कार करत. कल्याण सत्र न्यायालयाने तिन्ही आरोपींना २४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कल्याण पूर्वात घडलेल्या या घटनांमुळे महिलांच्या आणि लहान मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, या मागण्यांवर सरकार कोणती पावले उचलते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Raigad News : मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीचे खारपाडा टोलनाका येथे ठिय्या आंदोलन

Web Title: Mla sulabha gaikwad demands police outpost and women safety measures in kalyan east

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 03:42 PM

Topics:  

  • kalyan
  • Maharashtra Assembly

संबंधित बातम्या

Rukminibai Hospital: फ्रॅक्चर झालेल्या वृद्धाच्या पायाला प्लास्टरऐवजी पुठ्ठा, रुक्मिणीबाई रुग्णालयाचा आणखी एक धक्कादायक प्रकार
1

Rukminibai Hospital: फ्रॅक्चर झालेल्या वृद्धाच्या पायाला प्लास्टरऐवजी पुठ्ठा, रुक्मिणीबाई रुग्णालयाचा आणखी एक धक्कादायक प्रकार

kalyan News: अवघ्या एका तासात 7/12 वर दुसऱ्या व्यक्तीचे नाव; कल्याण तहसीलदार कार्यालयातील प्रकाराने खळबळ
2

kalyan News: अवघ्या एका तासात 7/12 वर दुसऱ्या व्यक्तीचे नाव; कल्याण तहसीलदार कार्यालयातील प्रकाराने खळबळ

KDMC News: शास्त्रीनगर रुग्णालयात धक्कादायक प्रकार; अल्पवयीन मुलीचा प्रेग्नन्सी रिपोर्ट पॉझिटिव्ह, बाहेरील टेस्ट मात्र निगेटिव्ह
3

KDMC News: शास्त्रीनगर रुग्णालयात धक्कादायक प्रकार; अल्पवयीन मुलीचा प्रेग्नन्सी रिपोर्ट पॉझिटिव्ह, बाहेरील टेस्ट मात्र निगेटिव्ह

Kalyan Stray Dog: कुत्र्यांच्या दहशतीने नागरिक भयभीत; कल्याणमध्ये भटक्या कुत्र्‍यांनी 125 हून अधिक नागरिकांचा घेतला चावा
4

Kalyan Stray Dog: कुत्र्यांच्या दहशतीने नागरिक भयभीत; कल्याणमध्ये भटक्या कुत्र्‍यांनी 125 हून अधिक नागरिकांचा घेतला चावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.