Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raju Patil: वाढदिवसाच्या शुभेच्छा डिजिटल द्या! ‘जनतेला त्रास देऊन मिळालेल्या शुभेच्छा नको’; वाढदिवसापूर्वी राजू पाटील यांची पोस्ट

Raju Patil: मनसे नेते राजू रतन पाटील यांचा 26 सप्टेंबर रोजी वाढदिवस असून, त्यानिमित्त शहरात फ्लेक्स, बॅनर किंवा होर्डिंग्स लावू नयेत, असे आवाहन त्यांनी समर्थक, मनसैनिक, स्नेही आणि मित्रपरिवाराला केले आहे. जनतेला त्रास होईल अशा पद्धतीने शुभेच्छा देण्याऐवजी डिजिटल माध्यम, फोन किंवा मेसेजद्वारे शुभेच्छा द्याव्यात, अशी विनंती केली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 24, 2026 | 01:01 PM
वाढदिवसाच्या शुभेच्छा डिजिटल द्या! ‘जनतेला त्रास देऊन मिळालेल्या शुभेच्छा नको’; वाढदिवसापूर्वी राजू पाटील यांची पोस्ट

वाढदिवसाच्या शुभेच्छा डिजिटल द्या! ‘जनतेला त्रास देऊन मिळालेल्या शुभेच्छा नको’; वाढदिवसापूर्वी राजू पाटील यांची पोस्ट

Follow Us
Follow Us:
  • ‘माझ्या वाढदिवसाला फ्लेक्स-बॅनर लावू नका’
  • राजू पाटील यांचे समर्थकांना आवाहन
  • वाढदिवसापूर्वी राजू पाटील यांची पोस्ट
Raju Patil: राजकीय नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील चौक, रस्ते आणि प्रमुख ठिकाणी शुभेच्छांचे फ्लेक्स, बॅनर आणि होर्डिंग्स लावले जातात. मात्र, आपल्या वाढदिवसानिमित्त अशा प्रकारचे फलक लावू नयेत, असे आवाहन मनसे नेते राजू रतन पाटील यांनी समर्थक आणि कार्यकर्त्यांना केले आहे.

राजू पाटील यांचा वाढदिवस

राजू पाटील यांचा 26 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी समर्थकांकडून दरवर्षी विविध ठिकाणी फलक लावले जातात. यंदा मात्र राजू पाटील यांनी स्वतःच पुढाकार घेत समर्थक, मनसैनिक, स्नेही आणि मित्रपरिवाराला फ्लेक्स, बॅनर किंवा होर्डिंग्स न लावण्याची विनंती केली आहे.

‘आमच्या नादात लागू नका’, मनसे नेते राजू पाटील यांचा भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांना थेट इशारा

राजू पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली आहे. ज्या जनतेच्या प्रेमावर आणि पाठिंब्यावर आपण उभे आहोत, त्याच जनतेला त्रास देऊन मिळालेल्या शुभेच्छा आपल्याला पटत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

होर्डिंग्समुळे शहराच्या सौंदर्यावर परिणाम

शहरात मोठ्या प्रमाणात लावण्यात येणाऱ्या फ्लेक्स आणि होर्डिंग्समुळे शहराच्या सौंदर्यावर परिणाम होऊ शकतो. काही ठिकाणी रस्त्यालगत किंवा चौकांमध्ये लावण्यात येणाऱ्या फलकांमुळे नागरिकांना अडचणींचाही सामना करावा लागू शकतो. त्यामुळे वाढदिवस साजरा करताना सार्वजनिक जागा आणि नागरिकांच्या सोयीचा विचार करण्याची भूमिका पाटील यांनी मांडली आहे.

‘शुभेच्छा द्या, पण डिजिटल माध्यमातून’

कार्यकर्त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ नयेत, असे मात्र राजू पाटील यांनी म्हटलेले नाही. शुभेच्छा जरूर द्याव्यात; मात्र त्यासाठी डिजिटल माध्यम, फोन किंवा मेसेजचा वापर करावा, अशी त्यांची विनंती आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात जाहिरात फलक लावण्याऐवजी सोशल मीडिया आणि इतर डिजिटल पर्यायांचा वापर करण्यावर त्यांनी भर दिला आहे.

मनसेच्या कार्यकर्त्यांसह राजू पाटील यांना मानणारा तरुण वर्ग असल्याने त्यांच्या या आवाहनाला वाढदिवसाच्या दिवशी समर्थकांकडून कसा प्रतिसाद मिळतो, याकडे लक्ष असेल.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही जून 2026 मधील आपल्या वाढदिवसापूर्वी कार्यकर्त्यांना मोठी होर्डिंग्स लावण्याऐवजी लोकोपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन केले होते.

KDMC Politics: केडीएमसीतील शिंदेसेना-मनसे मैत्रीवर रविंद्र चव्हाणांचे मोठे विधान; ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ म्हणत निशाणा

Web Title: Mns leader raju patil appeals supporters not to put flex banners hoardings on his birthday

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 01:01 PM

Topics:  

  • Kalyan-Dombivli
  • MNS
  • raju patil

संबंधित बातम्या

Rajendra Lodha ED Arrest: राजेंद्र लोढांच्या अटकेवर हायकोर्टाचे ताशेरे; विनोद पाटील यांच्या ईडी चौकशीचीही पुन्हा चर्चा
1

Rajendra Lodha ED Arrest: राजेंद्र लोढांच्या अटकेवर हायकोर्टाचे ताशेरे; विनोद पाटील यांच्या ईडी चौकशीचीही पुन्हा चर्चा

MNS : जामदा प्रकल्प क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांविरोधात मनसे आक्रमक; मनसेच्या अविनाश सौंदळकरांकडून सखोल चौकशीची मागणी
2

MNS : जामदा प्रकल्प क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांविरोधात मनसे आक्रमक; मनसेच्या अविनाश सौंदळकरांकडून सखोल चौकशीची मागणी

Amit Thackeray :  ती लहान मुलं आहेत, निष्पाप आहेत… त्यामुळे आसपासदिसलं, तर ते तिथल्या तिथे थांबवा! अमित ठाकरे यांची भावनिक पोस्ट
3

Amit Thackeray : ती लहान मुलं आहेत, निष्पाप आहेत… त्यामुळे आसपासदिसलं, तर ते तिथल्या तिथे थांबवा! अमित ठाकरे यांची भावनिक पोस्ट

राज ठाकरेंवर रील केली अन् महेश मोटेला ‘मनसे’वाल्यांनी काळं फासलं; डोक्यावर चप्पल ठेवून उठाबशा, VIDEO व्हायरल
4

राज ठाकरेंवर रील केली अन् महेश मोटेला ‘मनसे’वाल्यांनी काळं फासलं; डोक्यावर चप्पल ठेवून उठाबशा, VIDEO व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.