Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 31 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! जिजामाता उद्यानाच्या धर्तीवर ठाण्यात साकारणार आधुनिक प्राणी संग्रहालय

मुंबईतील जिजामाता भोसले उद्यानाच्या धर्तीवर ठाण्यात अत्याधुनिक वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालय उभारले जाणार आहे. या प्रकल्पामुळे ठाणेकरांना नवे पर्यावरणपूरक पर्यटनस्थळ आणि विरंगुळ्याचे ठिकाण मिळणार आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 31, 2026 | 08:45 AM
फोटो सौजन्य- chatgpt

फोटो सौजन्य- chatgpt

Follow Us
Follow Us:
  • जिजामाता उद्यानाच्या धर्तीवर ठाण्यात साकारणार आधुनिक प्राणी संग्रहालय
  • जिजामाता उद्यानाप्रमाणे ठाणेकरांनाही मिळणार विरंगुळा
  • ठाणेकरांना निसर्गाच्या सान्निध्यात विरंगुळ्यासाठी नवे ‘ग्रीन डेस्टिनेशन’ उपलब्ध होणार
 

 

मुंबईतील प्रसिद्ध जिजामाता भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयाच्या धर्तीवर ठाणे शहरातही निसर्ग, जैवविविधता, पर्यावरण संवर्धन आणि पर्यटनाचा अनोखा संगम घडविणारे अत्याधुनिक वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालय विकसित करण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील आरक्षण क्र. ४, मौजे चितळसर-मानपाडा (टिकुजिनी वाडी) येथील सुमारे १० हेक्टर जागेवर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यातील महानगरपालिकांमध्ये मूलभूत सोयी-सुविधांचा विकास करण्यासाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून अनुदान दिले जाते. त्याअंतर्गत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार ठाणे शहरातील विविध विकासकामांसाठी शासनाने मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर केला असून, त्यामध्ये या वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयाच्या विकासाचाही समावेश करण्यात आला आहे.

जिजामाता उद्यानाप्रमाणे ठाणेकरांनाही मिळणार विरंगुळा

वेगाने विस्तारत असलेल्या ठाणे शहराला केवळ रस्ते, पूल आणि इमारतींचीच नव्हे, तर नागरिकांच्या जीवनमानात भर घालणाऱ्या पर्यावरणपूरक प्रकल्पांचीही आवश्यकता आहे. मुंबईतील जिजामाता भोसले उद्यानाप्रमाणे ठाणेकरांना निसर्गाच्या सान्निध्यात विरंगुळा मिळावा, मुलांना जैवविविधतेची ओळख व्हावी आणि पर्यावरण संवर्धनाचे संस्कार नव्या पिढीमध्ये रुजावेत, या संकल्पनेतून हा प्रकल्प उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

या प्रकल्पामध्ये विविध दुर्मीळ आणि स्थानिक वनस्पतींचे संवर्धन, प्राण्यांसाठी आधुनिक अधिवास, पर्यावरणविषयक माहिती केंद्र तसेच नागरिकांसाठी फिरण्याची आणि विश्रांतीची सुविधा विकसित केली जाण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनासोबतच पर्यटनालाही मोठी चालना मिळणार आहे.

Marathi Language: मराठी सक्तीवर राजकारण सुरू; पण मीरा-भाईंदरातील रिक्षाचालकांनी दाखवली भाषेप्रती सकारात्मक भूमिका

ठाणे शहराला एक नवे ‘ग्रीन डेस्टिनेशन’ मिळणार

चितळसर-मानपाडा परिसरातील सर्वे क्रमांक ५१/अ/१/१ येथील जागेवर प्रस्तावित या प्रकल्पामुळे ठाणे शहराला एक नवे ‘ग्रीन डेस्टिनेशन’ मिळणार आहे. विविध प्रजातींच्या वनस्पतींचे संवर्धन, पर्यावरणविषयक जनजागृती, जैवविविधतेचे दर्शन आणि नागरिकांसाठी दर्जेदार विरंगुळ्याची सुविधा या माध्यमातून उपलब्ध करण्याचा मानस आहे. राज्य शासनाच्या २० जुलै रोजीच्या शासन शुद्धीपत्रकानुसार ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कामांसाठी एकूण १५० कोटींची मंजूर रक्कम नमूद करण्यात आली असून, त्यामध्ये या प्रकल्पासाठी सुरुवातीला १० कोटींची तरतूद दर्शविण्यात आली आहे.

Shravan 2026: ‘हर हर महादेव’च्या जयघोषात रंगणार श्रावणोत्सव; ठाण्यातील शिवमंदिरामध्ये जय्यत तयारी

पर्यावरण संवर्धनाला मिळणार चालना

या प्रकल्पाचा मुख्य उद्देश केवळ प्राणी संग्रहालय उभारणे नसून विविध वनस्पतींचे संवर्धन, जैवविविधतेचे जतन आणि पर्यावरणाविषयी जनजागृती करणे हा आहे. विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना निसर्गाबद्दल प्रत्यक्ष माहिती मिळावी तसेच पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व समजावे, यासाठी येथे विविध उपक्रमही राबवले जाणार आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ठाण्यात वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालय कुठे उभारले जाणार आहे?

    Ans: हा प्रकल्प ठाण्यातील चितळसर-मानपाडा (टिकुजिनी वाडी) परिसरातील सुमारे १० हेक्टर जागेवर साकारला जाणार आहे.

  • Que: या प्रकल्पाचा ठाणेकरांना काय फायदा होणार आहे?

    Ans: ठाणेकरांना नवे पर्यावरणपूरक पर्यटनस्थळ, निसर्गाच्या सान्निध्यात विरंगुळा, तसेच विद्यार्थ्यांना जैवविविधता आणि वन्यजीवांविषयी प्रत्यक्ष माहिती मिळण्याची संधी उपलब्ध होईल.

  • Que: या प्रकल्पामुळे पर्यावरणाला कसा फायदा होईल?

    Ans: विविध वनस्पतींचे संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण, हिरवळ वाढविणे आणि पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यास या प्रकल्पामुळे मदत होईल.

Web Title: Modern zoological museum to be built in thane

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 08:45 AM

Topics:  

  • thane
  • Thane news
  • Thane News update

संबंधित बातम्या

ठाण्याच्या विकासाला नवी गती! जागतिक दर्जाचा वॉटरफ्रंट प्रकल्प उभारणार; तब्बल 50 एकरांहून अधिक क्षेत्रात…
1

ठाण्याच्या विकासाला नवी गती! जागतिक दर्जाचा वॉटरफ्रंट प्रकल्प उभारणार; तब्बल 50 एकरांहून अधिक क्षेत्रात…

Shravan 2026: ‘हर हर महादेव’च्या जयघोषात रंगणार श्रावणोत्सव; ठाण्यातील शिवमंदिरामध्ये जय्यत तयारी
2

Shravan 2026: ‘हर हर महादेव’च्या जयघोषात रंगणार श्रावणोत्सव; ठाण्यातील शिवमंदिरामध्ये जय्यत तयारी

Navi Mumbai: कचऱ्यात फेकलेल्या सफरचंदांचा बाजार? एपीएमसीतील धक्कादायक प्रकार; चौकशीच्या मागणीला जोर
3

Navi Mumbai: कचऱ्यात फेकलेल्या सफरचंदांचा बाजार? एपीएमसीतील धक्कादायक प्रकार; चौकशीच्या मागणीला जोर

Barvi Dam: बारवी धरणातील पाणीसाठा 73.58 टक्क्यांचा टप्पा पार, ठाणे जिल्ह्याची चिंता कमी
4

Barvi Dam: बारवी धरणातील पाणीसाठा 73.58 टक्क्यांचा टप्पा पार, ठाणे जिल्ह्याची चिंता कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.