Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai Traffic: कोपरखैरणेकर वाहतूककोंडीने हैराण! भुयारी मार्गात टेम्पो अडकतात, वाहतूक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न

Navi Mumbai Traffic: नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरात वाहतूककोंडीची समस्या गंभीर बनली आहे. विशेषतः संध्याकाळी स्टेशन परिसर आणि मुख्य रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, वाहतूक पोलिसांच्या नियोजनावर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 10, 2026 | 09:25 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • कोपरखैरणे स्टेशन परिसरात दररोज वाहतूक कोंडीचा त्रास
  • संध्याकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत वाहनांच्या लांबच लांब रांगा
  • भुयारी मार्गात मोठे टेम्पो अडकल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प
 

नवी मुंबई शहराची शहराची गणना ‘वेल प्लॅन्ड सिटी’ (सुजाण नियोजनबद्ध शहर) म्हणून केली असली, तरी कोपरखैरणेवासीयांना मात्र रोजच्या तुफान वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः संध्याकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत कोपरखैरणे स्टेशन परिसरातून गाडी घेऊन जाणे म्हणजे वाहनधारकांसाठी मोठा मनस्ताप ठरत आहे.

भुयारी मार्गात टेम्पो; वाहतूक ठप्प

कोपरखैरणे भुयारी मार्गाजवळ वाहतूक पोलीस तैनात नसल्याचा गैरफायदा काही बेजबाबदार टेम्पो चालक घेत आहेत. सायंकाळच्या गर्दीच्या वेळी भुयारी मार्गाची उंची आणि रुंदीचा अंदाज न घेता सर्रास मोठे टेम्पो यात घातले जातात. योग्य जजमेंट न मिळाल्याने अनेकदा हे टेम्पो भुयारी मार्गातच अडकून पडतात. त्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प होते.

डी-मार्ट ते सेक्टर १५-२० रस्त्याची दुरवस्था

केवळ स्टेशन परिसरच नाही, तर संध्याकाळच्या वेळी डी-मार्टपासून ते सेक्टर १५ आणि सेक्टर २० पर्यंत घणसोलीच्या दिशेने जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर वाहनांच्या प्रचंड रागा लागतात.

Navi Mumbai News: नवी मुंबईत रात्रीच्या फूड स्टॉल्सचा सुळसुळाट; हायवेवर सिलेंडरच्या वापरामुळे सुरक्षेचा प्रश्न

रेल्वे स्टेशनवरून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांची गर्दी आणि भुयारी मार्गातून ये-जा करणारी वाहने यांच्या एकत्रित लोटामुळे या संपूर्ण परिसराला ट्रॅफिक जॅमचे स्वरूप प्राप्त होते. नागरिकांचा मोलाचा वेळ या कोंडीतच वाया जात आहे.

वाहतूक पोलिसांचे अभय की वसुलीवर भर?

स्थानिक नागरिकांच्या मते, वाहतूक नियमन कक्षाचे या गंभीर समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. अनेक महत्वाच्या चौकांमध्ये किंवा सिग्नलवर वाहतूक पोलीस कर्मचारी हजर नसतात. ते सिग्नल सोडून अर्धा ते एक किलोमीटर अंतरावर लपून-छपून उभे राहतात.

नागरिकांनी आरोप केला आहे की, वाहतूक कोंडी सोडवण्याऐवजी चालक किंवा ई-चलान फाडण्यातच पोलीस कर्मचारी व्यस्त असतात. एकाच ठिकाणी ३ ते ४ कर्मचारी ई-चलान मशीन घेऊन उभे राहिलेले दिसतात. जर हेच कर्मचारी थेट सिग्नलवर किंवा गर्दीच्या ठिकाणी उभे राहिले, तर वाहनचालकांमध्ये नियमांची भीती राहील आणि कोंडी होणार नाही.
फोन केल्याशिवाय पोलिस येतच नाहीत!

Navi Mumbai Crime: कोपरखैरणे हादरले! बॅटच्या प्रहाराने कवटी फ्रॅक्चर, चार दिवसांनी मृत्यू; पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू

रजोपर्यंत नागरिक स्वतः वाहतूक नियंत्रण कक्षाला फोन करून तक्रार करत नाहीत, तोपर्यंत परिसरात एकही वाहतूक पोलीस फिरकत नाही. एरवी आम्ही रोजच्या कोंडीतून कसातरी मार्ग काढत कसेबसे घर गाठतो, अशी उद्विग्न प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशांनी दिली.ॉ

पोलिस आयुक्तांकडून तोडगा निघणार का?

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात सध्याच्या वाहतूक पोलीस उपायुक्तांची ओळख एक अनुभवी अधिकारी म्हणून आहे. कोपरखैरणे परिसरातील या रोजच्या समस्येवी त्यांना खरोखरच माहिती आहे का आणि ते यावर काही ठोस उपाययोजना करणार का, असा प्रश्न आता कोपरखैरणेकर विचारत आहेत. वाहतूक पोलीस आयुक्तांनी या समस्येत तातडीने लक्ष घालून कोपरखैरणेकरांची या कोंडीच्या विळख्यातून मुक्तता करावी, हीच एकच अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Navi mumbai koparkhairane traffic congestion police action pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • Navi Mumbai
  • Navi Mumbai News
  • Traffic

संबंधित बातम्या

Navi Mumbai News: नवी मुंबईत रात्रीच्या फूड स्टॉल्सचा सुळसुळाट; हायवेवर सिलेंडरच्या वापरामुळे सुरक्षेचा प्रश्न
1

Navi Mumbai News: नवी मुंबईत रात्रीच्या फूड स्टॉल्सचा सुळसुळाट; हायवेवर सिलेंडरच्या वापरामुळे सुरक्षेचा प्रश्न

Navi Mumbai : पोलीस कस्टडीत प्रकृती बिघडली, 38 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; मृत्यूचं गूढ कायम
2

Navi Mumbai : पोलीस कस्टडीत प्रकृती बिघडली, 38 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; मृत्यूचं गूढ कायम

Navratri Traffic: कल्याणमध्ये नवरात्रोत्सवासाठी वाहतुकीत मोठे बदल; ‘या’ ७ मार्गांवर अवजड वाहनांना प्रवेशबंदी
3

Navratri Traffic: कल्याणमध्ये नवरात्रोत्सवासाठी वाहतुकीत मोठे बदल; ‘या’ ७ मार्गांवर अवजड वाहनांना प्रवेशबंदी

Navi Mumbai Crime: कोपरखैरणे हादरले! बॅटच्या प्रहाराने कवटी फ्रॅक्चर, चार दिवसांनी मृत्यू; पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू
4

Navi Mumbai Crime: कोपरखैरणे हादरले! बॅटच्या प्रहाराने कवटी फ्रॅक्चर, चार दिवसांनी मृत्यू; पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.