Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai News: नवी मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय! कैलास गायकवाड यांचे निलंबन रद्द, गाडेंची चौकशी होणार

Navi Mumbai News: नवी मुंबई महापालिकेच्या तहकूब महासभेत अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड यांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण गाडे यांचे निलंबन कायम ठेवण्यात आले आहे. गाडे यांच्या कामकाजाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश महापौर सुजाता पाटील यांनी दिले आहेत.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 14, 2026 | 09:25 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • डॉ. कैलास गायकवाड यांचे निलंबन रद्द करण्याचा महासभेत निर्णय
  • लाच घेतल्याच्या आरोपाखाली गायकवाड यांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले होते
  • निलंबन रद्द झाले असले तरी त्यांच्यावरील लाचप्रकरणातील आरोप कायम आहेत
 

 

नवी मुंबई महापालिकेच्या तहकूब महासभेत लाच घेतल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेले अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड यांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या तहकूब महासभेत घेण्यात आला. तर विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण गाडे यांचे निलंबन मात्र कायम ठेवण्याचे निर्देश महापौरांनी दिले.

गाडे यांच्या संपूर्ण कार्यपद्धतीची सखोल चौकशी करण्यासाठी तदर्थ समितीकडे हा विषय सोपविण्यात येणार असून, चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना अन्य कोणत्याही विभागात कामावर घेऊ नये, असे स्पष्ट निर्देश महापौर सुजाता पाटील यांनी दिले. अतिक्रमण विभागातील एका कंत्राटदाराचे प्रलंबित बिल मंजूर करण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपाखाली लाचलुचपत विभागाने गायकवाड यांना पालिका मुख्यालयात रंगेहाथ पकडले होते.

Navi Mumbai Traffic: कोपरखैरणेकर वाहतूककोंडीने हैराण! भुयारी मार्गात टेम्पो अडकतात, वाहतूक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न

आरोप संपुष्टात नाहीत

महासभेतील विषय क्रमांक ११ वर चर्चा करताना सभागृहनेते सागर नाईक यांनी हा विषय मांडला. माजी महापौर जयवंत सुतार यांनी गायकवाड यांचे निलंबन संपुष्टात आणून त्यांना अतिक्रमण विभाग वगळता उपायुक्त म्हणून कार्यरत करण्याची सूचना केली. ही सूचना महापौर सुजाता पाटील यांनी मंजूर झाल्याचे जाहीर केले. निलंबन रद्द झाल्याने त्यांच्यावरील लाचप्रकरणातील आरोप संपुष्टात आलेले नाहीत.

गाडे यांचे निलंबन कायम; समितीकडून चौकशी

विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण गाडे यांच्या निलंबनाचा विषय महासभेत चर्चेला आला असता, त्यांच्या कार्यपद्धतीसह विद्युत विभागातील विविध कंत्राटांवरून सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले. नेरूळ येथे उघड्या विद्युत तारांमुळे दोन विद्यार्थिनींना विजेचा धक्का बसल्याच्या घटनेनंतर गाडे यांना निलंबित करण्यात आले होते.

Maharashtra Drought 2026: भाजपाचा मोठा निर्णय! दुष्काळग्रस्तांसाठी नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन अन् दिपेश म्हात्रेंची लाखाची मदत

मात्र, तरीही गाडे कार्यरत असल्याचा आरोप सदस्यांकडून करण्यात आला. भाजपचे नगरसेवक सूरज पाटील यांनी त्यांच्या व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी केली. मनसेचे नगरसेवक अभिजित देसाई यांनी प्रशासकीय काळात नेरुळ भागात सुमारे १२ कोटी रुपयांची विद्युत कामे झाल्याचा मुद्दा उपस्थित करत संबंधित कामांच्या चौकशीची मागणी केली.

चर्चेअंती महापौर सुजाता पाटील यांनी गाडे यांचे निलंबन कायम ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांच्या कामकाजाची सखोल चौकशी करण्यासाठी तदर्थ समितीकडे विषय सोपवून सविस्तर प्रस्ताव पुन्हा महासभेसमोर आणावा, असे निर्देश त्यांनी दिले.

चौकशी पूर्ण होईपर्यंत गाडे यांना अन्य कोणत्याही विभागातही कामावर ठेवू नये, असेही महापौरांनी स्पष्ट केले. त्यामुळे गाडे यांचे निलंबन कायम राहणार आहे. मात्र गाडेंवरील कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असल्याची चर्चा सर्वत्र पालिकेत रंगलेली दिसून आली.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Navi mumbai municipal corporation kailas gaikwad pravin gade suspension pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • Navi Mumbai
  • Navi Mumbai Municipal Corporation
  • Navi Mumbai News

संबंधित बातम्या

Navi Mumbai: वाहतूक शाखेतला अधिकारी ठरला गुन्हेगारांचा कर्दनकाळ! पनवेल पोलिसांच्या कामगिरीने वेधले लक्ष
1

Navi Mumbai: वाहतूक शाखेतला अधिकारी ठरला गुन्हेगारांचा कर्दनकाळ! पनवेल पोलिसांच्या कामगिरीने वेधले लक्ष

Navi Mumbai Traffic: कोपरखैरणेकर वाहतूककोंडीने हैराण! भुयारी मार्गात टेम्पो अडकतात, वाहतूक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न
2

Navi Mumbai Traffic: कोपरखैरणेकर वाहतूककोंडीने हैराण! भुयारी मार्गात टेम्पो अडकतात, वाहतूक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न

Navi Mumbai News: नवी मुंबईत रात्रीच्या फूड स्टॉल्सचा सुळसुळाट; हायवेवर सिलेंडरच्या वापरामुळे सुरक्षेचा प्रश्न
3

Navi Mumbai News: नवी मुंबईत रात्रीच्या फूड स्टॉल्सचा सुळसुळाट; हायवेवर सिलेंडरच्या वापरामुळे सुरक्षेचा प्रश्न

Navi Mumbai : पोलीस कस्टडीत प्रकृती बिघडली, 38 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; मृत्यूचं गूढ कायम
4

Navi Mumbai : पोलीस कस्टडीत प्रकृती बिघडली, 38 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; मृत्यूचं गूढ कायम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.