Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 28 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai: तुर्भेतील घनकचरा प्रकल्पात विषारी वायूचा धोका? NMMCने आरोप फेटाळले, जाणून घ्या वस्तुस्थिती

नवी मुंबईतील तुर्भे येथील प्रस्तावित एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पावरून विविध दावे आणि गैरसमज पसरत असल्याचे NMMCने म्हटले आहे. याबाबत महापालिकेने प्रकल्पाची प्रक्रिया आणि निविदा पारदर्शक असल्याची माहिती देत वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 28, 2026 | 09:25 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • तुर्भेतील प्रस्तावित एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पावरून गैरसमज पसरल्याचा NMMCचा दावा
  • प्रकल्पामुळे विषारी वायूचा धोका असल्याचे आरोप NMMCने फेटाळले
  • कचऱ्यापासून तयार होणाऱ्या RDFमधून २७ मेगावॅटपर्यंत विद्युत निर्मिती करण्याची योजना
 

नवी मुंबईतील तुर्भे येथील प्रस्तावित एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाबाबत विविध दावे आणि गैरसमज पसरत असल्याचे नवी मुंबई महानगरपालिकेने म्हटले आहे. प्रकल्पामुळे नागरिकांच्या आरोग्याला विषारी वायूमुळे गंभीर धोका निर्माण होईल, हा दावा चुकीचा असल्याचे NMMCने स्पष्ट केले आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या तुर्भे येथील प्रस्तावित एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात त्रुटी असल्याबाबत तसेच निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याबाबत चुकीची माहिती प्रसारित होताना निदर्शनास येत आहे. त्या अनुंषगाने सदर प्रकल्पाबाबत विसंगत व विपर्यास्त माहिती प्रसारित होऊ नये यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेने सदर प्रकल्पाबाबत वस्तुस्थिती सादर केली आहे. या प्रकल्पातील विषारी वायुमुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका असल्याचे म्हणणे मांडण्यात आले आहे. हा निष्कर्ष अत्यंत चुकीचा असून वास्तविकतः नव्याने लागू झालेला घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ अन्वये तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांनुसार असे प्रकल्प राबविणे स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अनिवार्य आहे.

ठाण्यात क्लस्टर कंपनीविरोधात नागरिक आक्रमक; आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत धडक मोर्चा

अशी केली जाणार प्रक्रिया

नवी मुंबई महानगरपालिका परिसरामध्ये १५०० मॅट्रिक टन घनकचऱ्यावर आधुनिक पद्धतीचे वर्गीकरण करून त्यापासून निर्माण होणाऱ्या ६०० टन आरडीएफमधून २७ मेगावॅट प्रतिदिन इतकी विद्युत निर्मिती करणे व ४५० मॅट्रिक टन घनकचऱ्यावर प्रोसेस करून त्यापासून नैसर्गिक गॅसची निर्मिती करणे तसेच बायोचार फॅसिलिटी व त्यामध्ये अत्याधुनिक पद्धतीचे लिचेट ट्रीटमेंट प्लांट व स्लज ड्रॉइंग फॅसिलिटी उभारणे या बाबींचा समावेश आहे.

Navi Mumbai: वर्षानुवर्षे एकाच आरोग्य केंद्रात ड्युटी; वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्सच्या बदल्यांसाठी राष्ट्रवादी आक्रमक

स्वतंत्र तांत्रिक सल्लागार समितीद्वारे निविदेची करण्यात येणार तपासणी

हा प्रकल्प सार्वजनिक-खाजगी भागीदारी पद्धती अंतर्गत डिझाइन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट आणि ट्रान्सफर प्रकल्प म्हणून संरचित करण्यात आला आहे. ही निविदा दस्तऐवज आणि बोली प्रक्रिया व्यवस्थापनाची तपासणी आयआयटी, नीरी आणि पीपीपीमधील तज्ज्ञ तसेच मित्रामधील पायाभूत सुविधा तज्ज्ञांचा समावेश असलेल्या स्वतंत्र तांत्रिक सल्लागार समितीद्वारे करण्यात आली आहे. भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या पॅनेलवरील व्यवहार सल्लागारांच्या सहाय्याने पार पाडण्यात आली आहे. निविदा प्रस्तावात नमूद केलेल्या पात्रता आणि अर्हता निकषांनुसार निविदाकाराने सादर केलेल्या तांत्रिक अनुभवाची रितसर तपासणी आणि मूल्यांकन करण्यात आले आहे. यामध्ये तांत्रिक मूल्यांकन समितीने निविदाकाराने सादर केलेल्या कागदपत्रांचा अनुभवाच्या विचार केला आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Navi mumbai navi mumbai waste project nmmc toxic gas allegations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • Navi Mumbai News
  • nmmc

संबंधित बातम्या

Navi Mumbai News: महापे एमआयडीसीतील 3 डेअरींवर FDAचा छापा; 12 लाखांहून अधिक किमतीचे दूध-दुग्धजन्य पदार्थ जप्त
1

Navi Mumbai News: महापे एमआयडीसीतील 3 डेअरींवर FDAचा छापा; 12 लाखांहून अधिक किमतीचे दूध-दुग्धजन्य पदार्थ जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.