Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumabi News: नवी मुंबईत नवरात्रोत्सवाच्या मंडपांमध्ये जुगाराचे अड्डे? पोलिसांच्या कारवाईवर नागरिकांचे प्रश्न

Navi Mumabi News: नवी मुंबईत नवरात्रोत्सवाच्या मंडपांमध्ये आणि परिसरात जुगाराचे अड्डे सुरू असल्याचा आरोप होत असून, या प्रकारामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. उत्सवाच्या आड सुरू असलेल्या कथित अवैध धंद्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 15, 2026 | 09:32 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • नवी मुंबईतील नवरात्रोत्सवाच्या मंडपांमध्ये जुगाराचे अड्डे सुरू असल्याचा आरोप.
  • रात्रीच्या वेळी मंडपांमध्ये किंवा मंडपांच्या आडोशाने जुगाराचे खेळ सुरू असल्याची नागरिकांमध्ये चर्चा
  • जुगाराच्या तक्रारींनंतरही पोलिसांकडून प्रभावी कारवाई होत नसल्याचा नागरिकांचा दावा
 

सध्या सर्वत्र नवरात्रोत्सवाचा दांडगा उत्साह पाहायला मिळत आहे. देवीच्या भक्तीत आणि आराधनेत तल्लीन झालेल्या या पवित्र वातावरणात नवी मुंबईतील विविध भागांतून एक अत्यंत गंभीर आणि चिंताजनक प्रकार समोर आला आहे. गणेशोत्सवाप्रमाणेच आता नवरात्रोत्सवाच्या मंडळांमध्ये आणि गल्लीबोळांमध्ये जुगाराचे अड्डे मोठ्या प्रमाणावर थाटण्यात आल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. तर समारंभाच्या नावाखाली सुरू असलेल्या या अवैध धंद्यांवर नवी मुंबई पोलीस कठोर कारवाई करणार का? पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे या प्रकरणाची गुप्त चौकशी करून संबंधितांवर बडगा उगारणार का? याकडे संपूर्ण नवी मुंबईचे लक्ष लागले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी मंडळांच्या मंडपात किंवा त्याच्या आडोशाने जुगाराचे टेबल मांडले जात आहेत. हे खेळ चालवणारे व्यावसायिक असून, नवरात्रोत्सवाचा गैरफायदा घेऊन ते सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मंडळांच्या आश्रयाने हा काळा धंदा चालवतात. काही प्रामाणिक मंडळांनी आणि पदाधिकाऱ्यांनी जुगाराला स्पष्ट नकार दिला असला, तरी अनेक ठिकाणी आर्थिक मोबदला आणि देणगीच्या नावाखाली हा खेळ सुरू ठेवण्यास परवानगी दिल्याचे बोलले जात आहे.

पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

या सर्व प्रकारावर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. जेव्हा कधी जुगाराची तक्रार नियंत्रण कक्षाला दिली जाते, तेव्हा बीट मार्शल पोलिस घटनास्थळी केवळ औपचारिकता म्हणून फेरफटका मारण्यासाठी जातात. मात्र, मंडळाच्या जवळ पोहोचताच ‘फक्त देवी लक्ष्मी दर्शन घेऊन माघारी फिरतात’, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.

स्थानिकांच्या मते, हा जुगार चालवणारे मुख्य सूत्रधार ‘खालपासून वरपर्यंत साहेबांचा आशीर्वाद आहे, त्यामुळे कसलेही टेन्शन घेऊ नका’, असे उघडपणे सांगतात. त्यामुळे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे आणि गुन्हे शाखा या प्रकाराची गांभीर्याने दखल घेणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

Navi Mumbai News: नवी मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय! कैलास गायकवाड यांचे निलंबन रद्द, गाडेंची चौकशी होणार

भवितव्य धोक्यात आणि वाढती गुन्हेगारी

जुगाराचा हा विळखा कर्करोगासारखा तरुणाईला उद्धवस्त करत आहे. रात्रीच्या वेळी जुगाराच्या अड्ड्यांवर होणारी उलाढाल आणि मद्यधुंद तरुणांचा वावर यामुळे वाद, हाणामारी, धमक्या यांसारख्या गंभीर घटना घडतात. यामुळे भक्तीसाठी सुरू असलेल्या सार्वजनिक उत्सवांची नावे बद्नाम होत असून देणगीसाठी जुगाराचा पैसा स्वीकारणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न सुजाण नागरिक विचारत आहेत.

Bhiwandi News : भिवंडीत राजकीय भूकंप! महापालिकेत स्वीकृत नगरसेवक निवडीचा वाद पेटला, समाजवादीच्या ६ नगरसेवकांची जागेवरच हकालपट्टी!

नियमांचा बडगा फक्त कागदावरच ?

अध्यक्षावर नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवात आपण पाहिले असेल की, अनेक मंडळाचे कार्यकर्त्यांवर ‘फटाके वाजवण्याच्या’ कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आले. वरिष्ठांच्या स्पष्ट आदेशाचे कारण देत पोलिसांनी अशा कारवाई करण्यात आला आणि ते योग्य सुद्धा आहे आणि उत्कृष्ट कामगिरी पोलिसांची त्याबद्दल. मात्र, आज नवरात्रोत्सवात जिथे सर्रास आणि मोठ्या प्रमाणावर जुगाराचे अड्डे थाटले जात आहेत, तिथे मात्र तीच पोलिस यंत्रणी बघ्याची भूमिका घेत आहे.

याठिकाणी काय ‘लक्ष्मी दर्शन’ झाल्यामुळे कारवाई टाळली जात आहे का? की वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश केवळ सर्वसामान्यांवर आणि छोट्या गोष्टींवरच चालतात, असा संतप्त सवाल आता नवी मुंबईतील नागरिक विचारत आहेत. फटाक्यांवर कठोर कारवाई करणारे पोलिस, जुगाराच्या अड्ड्यांवर मूग गिळून का बसले आहेत? याचे उत्तर जनतेला हवे आहे

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: नवी मुंबईत नवरात्रोत्सवाच्या मंडपांमध्ये जुगाराचे अड्डे सुरू असल्याचा आरोप काय आहे?

    Ans: नवी मुंबईतील काही नवरात्रोत्सव मंडळांच्या मंडपांमध्ये किंवा परिसरात रात्रीच्या वेळी जुगाराचे खेळ सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत पुष्टी होणे आवश्यक आहे.

  • Que: नवरात्रोत्सवात जुगार सुरू असल्याच्या तक्रारी का होत आहेत?

    Ans: उत्सवाच्या आड जुगाराचे खेळ सुरू असल्याचा आरोप होत असून, अशा प्रकारांमुळे सार्वजनिक उत्सवांच्या वातावरणावर परिणाम होत असल्याची चिंता नागरिक व्यक्त करत आहेत.

  • Que: जुगाराच्या अड्ड्यांमुळे कोणत्या समस्या निर्माण होऊ शकतात?

    Ans: जुगारामुळे आर्थिक नुकसान, वाद, हाणामारी आणि धमक्यांसारख्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा प्रकारांवर वेळीच नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे.

Web Title: Navi mumabi news navratri mandaps gambling allegations pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 09:32 AM

Topics:  

  • Navi Mumbai
  • Navi Mumbai News
  • Navratri

संबंधित बातम्या

Navratri 2026: नवरात्रीचा पाचवा दिवस स्कंदमातेला समर्पित, अशी करा देवीची पूजा आणि महत्त्व
1

Navratri 2026: नवरात्रीचा पाचवा दिवस स्कंदमातेला समर्पित, अशी करा देवीची पूजा आणि महत्त्व

CIDCO Encroachment in Ghansoli : घणसोलीत सिडकोच्या भूखंडांवर बिल्डर्सची अनधिकृत कार्यालये
2

CIDCO Encroachment in Ghansoli : घणसोलीत सिडकोच्या भूखंडांवर बिल्डर्सची अनधिकृत कार्यालये

Bhondla 2026: ऐलमा पैलमा गणेश देवा… भोंडला म्हणजे काय? जाणून घ्या परंपरा, महत्त्व आणि खेळण्याची पद्धत
3

Bhondla 2026: ऐलमा पैलमा गणेश देवा… भोंडला म्हणजे काय? जाणून घ्या परंपरा, महत्त्व आणि खेळण्याची पद्धत

Navratri Special: डोंगरावरील महालक्ष्मी गड ते गुहेतील संतोषी मातेचे स्थान; डहाणूतील मंदिरांचा इतिहास
4

Navratri Special: डोंगरावरील महालक्ष्मी गड ते गुहेतील संतोषी मातेचे स्थान; डहाणूतील मंदिरांचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.