Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News: ठाण्यात १८० वातानुकूलित ई-बसेस येणार; पण पालिकेला सोसावी लागणार ४५० कोटींची तूट

ठाणे शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी १८० नव्या वातानुकूलित ई-बसेस दाखल होणार आहेत. मात्र, या पर्यावरणपूरक प्रवासासाठी पालिकेला १२ वर्षांत तब्बल १,११७ कोटी रुपये खर्च करावे लागणार असून, उत्पन्नाच्या तुलनेत ४५० कोटींची तफावत निर्माण होणार आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 06, 2026 | 09:25 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • ठाणे महापालिकेला किती नव्या ई-बसेस मिळणार?
  • ई-बसेसच्या संचालनासाठी पालिकेला दरवर्षी किती रुपये मोजावे लागणार
  • तिकीटांमधून किती उत्पन्न मिळणार
 

ठाणे शहरातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आणि सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेच्या ताफ्यात १८० नवीन वातानुकूलित ई-बसेस दाखल करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र, पर्यावरणपूरक प्रवासाचा हा निर्णय पालिकेच्या तिजोरीवर आर्थिक ताण आणणारा ठरणार आहे. या बसगाड्या ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट (जीसीसी) तत्त्वावर १२ वर्षे चालवण्यासाठी तब्बल १ हजार ११७कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असताना, प्रत्यक्ष तिकिट विक्रीतून मात्र केवळ ६६६ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे खर्च आणि उत्पन्नात तब्बल ४५० कोटी रुपयांची वित्तीय तफावत निर्माण होणार असून, हा आर्थिक बोजा पालिकेला सोसावा लागणार आहे.

केंद्राच्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ठाणे महापालिकेला एकूण ३०३ ई-बसेस मंजूर करण्यात आल्या आहेत. यातील १२३ बसेस यापूर्वीच सेवेत दाखल झाल्या असून उर्वरित १८० वातानुकूलित ई-बसेससाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात ९ मीटरच्या १०० बसेस (एरोईगल ऑटोमोबाईल्स), १२ मीटरच्या ७० बसेस (सीएलएल फॅसिलिटीज) आणि ९ ते १० मीटरच्या १० डबल डेकर वातानुकूलित ई-बसेसचा (सीएलएल फॅसिलिटीज) समावेश आहे. कमी दर देणाऱ्या कंपन्यांशी वाटाघाटी केल्यानंतर ९ मीटर बससाठी प्रति किलोमीटर ७५ रुपये, १२ मीटरसाठी ८४.३३ रुपये आणि डबल डेकर बससाठी तब्बल १४६.६१ रुपये प्रति किलोमीटर दर निश्चित करण्यात आले आहेत. या दरानुसार १८० बसेस चालवण्यासाठी पालिकेला दरमहा ७कोटी ७६ लाख रुपये, म्हणजेच वर्षाला तब्बल ९३ कोटी १२ लाख रुपये मोजावे लागणार आहेत.

४० कोटींची तूट कितपत शहाणपणाची ?

पालिकेने दरवर्षी ३७ ते ४० कोटी रुपयांची तूट पदरात पाडून घेणे कितपत शहाणपणाचे आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. १२ वर्षांत १,११७ कोटी रुपये खर्च करण्याचा हा प्रस्ताव आता सर्वसाधारण सभेच्या मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. लोकप्रतिनिधी यावर काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.

अपेक्षित वार्षिक उत्पन्नः ५५ कोटी ५० लाख रुपये

पहिल्या वर्षातील संचलन तूटः ३७कोटी ६१ लाख रुपये

अपेक्षित मासिक उत्पन्नः ४ कोटी ६२ लाख रुपये

तिकिटातून किती उत्पन्न मिळणार?

पालिकेच्या अंदाजानुसार या बससेवेतून दरवर्षी सुमारे ५५ कोटी ५० लाख रुपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. पहिल्याच वर्षी संचालनातील तूट सुमारे ३७ कोटी ६१ लाख रुपये राहण्याचा अंदाज आहे. म्हणजेच पर्यावरणपूरक बससेवा सुरू करताना पालिकेला दरवर्षी मोठी आर्थिक तूट सहन करावी लागणार आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Thane electric bus project cost

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • thane
  • Thane news

संबंधित बातम्या

Thane Dahi handi 2026: संकल्प दहीहंडीचा थरार! विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदांना मिळणार २१ लाख
1

Thane Dahi handi 2026: संकल्प दहीहंडीचा थरार! विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदांना मिळणार २१ लाख

Thane News: ठाण्यात दहीहंडीच्या मडक्यांना मोठी मागणी; महागाईमुळे यंदा किमतीत किमान ५० रुपयांची वाढ
2

Thane News: ठाण्यात दहीहंडीच्या मडक्यांना मोठी मागणी; महागाईमुळे यंदा किमतीत किमान ५० रुपयांची वाढ

Thane Dahi Handi 2026: रेमंडमध्ये सलग दुसऱ्या वर्षी दहीहंडीचा उत्साह; ११ थरांसाठी २१ लाखांचे बक्षीस
3

Thane Dahi Handi 2026: रेमंडमध्ये सलग दुसऱ्या वर्षी दहीहंडीचा उत्साह; ११ थरांसाठी २१ लाखांचे बक्षीस

SIR Voter List: मतदारांनो, नाव तपासा! SIR ची प्रारूप यादी प्रसिद्ध, नागरिकांना नाव तपासण्याचे आवाहन
4

SIR Voter List: मतदारांनो, नाव तपासा! SIR ची प्रारूप यादी प्रसिद्ध, नागरिकांना नाव तपासण्याचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.