Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Badlapur News: बदलापूर एमआयडीसीच्या निष्काळजीपणामुळे उल्हासनदी धोक्यात; रासायनिक सांडपाणी वाहिनी फुटल्याने जलप्रदूषण

Badlapur News: बदलापूर एमआयडीसीतील रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी पुन्हा एकदा फुटल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सुमारे १२८ कोटी रुपये खर्चून नवीन वाहिनी टाकल्यानंतरही वाहिनी फुटीचे सत्र कायम असल्याने एमआयडीसी प्रशासनाच्या तांत्रिक नियोजनावर आणि कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 22, 2026 | 09:50 AM
फोटो सौजन्य- gemini

फोटो सौजन्य- gemini

Follow Us
Follow Us:
  • नवीन वाहिनी टाकूनही ती पुन्हा फुटल्याने कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे
  • सांडपाणी थेट रस्ते, नाले आणि इमारतींच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये शिरले आहे
  • रासायनिक सांडपाणी नदीत मिसळल्यामुळे गंभीर जलप्रदूषण झाले आहे.
 

बदलापूर एमआयडीसीतील रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी पुन्हा फुटली आहे. रासायनिक सांडपाणी वाहिनीच्या फुटीचे सत्र रोखण्यासाठी सुमारे १२८ कोटींचा खर्च करून एमआयडीसी प्रशासनाने नवीन रासायनिक सांडपाणी वाहिनी टाकण्याचे काम केले आहे. मात्र, त्यानंतरही वाहिनी फुटीचे सत्र सुरू असल्याने या कामाच्या दर्जाविषयी तसेच तांत्रिक नियोजनाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे या संपूर्ण कामाची चौकशी करण्याची मागणी भाजपाचे नगरसेवक तथा नियोजन समिती सभापती संभाजी शिंदे यांनी केली आहे.

बदलापूर एमआयडीसीतील रासायनिक सांडपाणी अंबरनाथपर्यंत वाहून नेणारी रासायनिक सांडपाणी वाहिनी पुन्हा फुटल्याने सोमवारी मोठ्या प्रमाणावर रासायनिक सांडपाणी रस्त्यावर पसरले, नाल्यामध्ये मिसळले, अनेक इमारतींच्या पाण्याच्या टाक्यांमध्येही हे रासायनिक सांडपाणी मिसळले. तसेच नाल्यावाटे हे रासायनिक सांडपाणी उल्हासनदीच्या पाण्यातही मिसळले गेले असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण झाले असल्याबद्दल कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या नियोजन व विकास समितीचे सभापती संभाजी शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

एमआयडीसी प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. यापुढे असा प्रकार घडल्यास मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशारा शिंदे यांनी दिला. त्याचबरोबर रासायनिक सांडपाणी वाहिनीच्या कामाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

ठाणेकरांवर पाणी कपातीचे संकट; शहराचा पाणी पुरवठा 36 तास पूर्णपणे राहणार बंद

 

वापरलेले साहित्य, कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह

बदलापुरात गेल्या काही वर्षांपासून ठराविक महिन्यांच्या अंतराने बदलापूर एमआयडीसीतील सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी फुटण्याचे सत्र सुरू होते. यावर संभाजी शिंदे यांनी सातत्याने आवाज उठविल्यानंतर याठिकाणी नवीन सांडपाणी वाहिनी टाकण्यात येणार असल्याचे आश्वासन एमआयडीसी प्रशासनाकडून देण्यात आले होते. त्यानुसार याठिकाणी नवीन रासायनिक सांडपाणी वाहिनी टाकण्यात आली. त्यामुळे आता रासायनिक सांडपाणी वाहिनी फुटीचे सत्र संपेल अशी अपेक्षा होती. परंतु सोमवारी पुन्हा एकदा ही वाहिनी फुटून रासायनिक सांडपाणी रस्त्यावर आले.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी युवासेनेचा मदतीचा हात; श्रीकांत शिंदे फाउंडेशनला १० लाखांचा धनादेश सुपूर्द

नवीन जलवाहिनीचे काम करताना याठिकाणी स्टेनलेस स्टीलची वाहिनी टाकण्यात यावी, अशी मागणी आपण केली होती. परंतु, एमआयडीसी प्रशासनाने एचडीपीई वाहिनी टाकली असून ही वाहिनी फुटली आहे. त्यामुळे या वाहिनीवर सुमारे १२८ कोटी रुपये खर्च करूनही पुन्हा सांडपाणी वाहिनीफुटी झाली असल्याचे संभाजी शिंदे यांचे म्हणणे आहे. एवढा मोठा खर्च झाल्यानंतरही सांडपाणी वाहिनी वारंवार फुटत असल्याने कामाचा दर्जा, वापरलेले साहित्य आणि तांत्रिक नियोजन यांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी संभाजी शिंदे यांनी केली आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: बदलापूरमध्ये नक्की काय घटना घडली आहे?

    Ans: बदलापूर एमआयडीसीतील रासायनिक सांडपाणी अंबरनाथकडे वाहून नेणारी वाहिनी पुन्हा फुटली आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर विषारी पाणी रस्त्यावर, नाल्यांमध्ये आणि इमारतींच्या टाक्यांमध्ये पसरले आहे.

  • Que: या वाहिनीसाठी किती निधी खर्च करण्यात आला होता?

    Ans: एमआयडीसी प्रशासनाने वाहिनी फुटीचे सत्र रोखण्यासाठी आणि नवीन सांडपाणी वाहिनी टाकण्यासाठी सुमारे १२८ कोटी रुपये खर्च केले होते.

  • Que: या वाहिनी फुटीमुळे पर्यावरणावर काय परिणाम झाला आहे?

    Ans: हे रसायनयुक्त सांडपाणी नाल्यांच्या माध्यमातून थेट उल्हासनदीच्या पात्रात मिसळल्यामुळे नदीत गंभीर जलप्रदूषण झाले आहे

Web Title: Thane news badlapur midc chemical sewage pipe bursts causing water pollution pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2026 | 09:50 AM

Topics:  

  • Badlapur
  • MIDC
  • Thane news

संबंधित बातम्या

Badlapur Crime News : बदलापुरात जुन्या वादातून एका तरुणाची कुऱ्हाडीने हल्लाकरत हत्या गणेश यादवचा मृत्यू,
1

Badlapur Crime News : बदलापुरात जुन्या वादातून एका तरुणाची कुऱ्हाडीने हल्लाकरत हत्या गणेश यादवचा मृत्यू,

Thane Coastal Road: घोडबंदर रोडवरील वाहतूककोंडी कमी होणार? फ्लेमिंगो आणि खारफुटीच्या संरक्षणासाठी कठोर अटी
2

Thane Coastal Road: घोडबंदर रोडवरील वाहतूककोंडी कमी होणार? फ्लेमिंगो आणि खारफुटीच्या संरक्षणासाठी कठोर अटी

Dombivli Navratri: डोंबिवलीत ‘श्रीदेवी महिषासुरमर्दिनी’ नाट्याविष्काराने जिंकली रसिकांची मने; भारतीय संस्कृतीचे घडले दर्शन
3

Dombivli Navratri: डोंबिवलीत ‘श्रीदेवी महिषासुरमर्दिनी’ नाट्याविष्काराने जिंकली रसिकांची मने; भारतीय संस्कृतीचे घडले दर्शन

Thane News: ठाणेकरांसाठी फॅशनची गुड न्यूज! युनिक्लोचं पहिलं स्टोअर लेक शोअरमध्ये सुरू
4

Thane News: ठाणेकरांसाठी फॅशनची गुड न्यूज! युनिक्लोचं पहिलं स्टोअर लेक शोअरमध्ये सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.