Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane Mhada: घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ठाण्यात 44-46 लाखांत म्हाडाची घरं; नव्या लॉटरीची तयारी सुरू

Thane Mhada: ठाण्यात स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. चितळसर-मानपाडा येथील म्हाडाच्या गृहप्रकल्पातील घरांच्या किमती २०२०-२१ च्या रेडी रेकनरनुसार निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 11, 2026 | 12:15 PM
म्हाडाच्या घरांसाठी पुन्हा संधी; 4462 सदनिकांसाठी अर्जाची मुदत वाढली, आता सोडत 26 नोव्हेंबरला

म्हाडाच्या घरांसाठी पुन्हा संधी; 4462 सदनिकांसाठी अर्जाची मुदत वाढली, आता सोडत 26 नोव्हेंबरला

Follow Us
Follow Us:
  • ठाण्यात म्हाडाची घरं ४४-४६ लाखांपर्यंत येण्याची शक्यता
  • यापूर्वी निवड झालेले ४३४ लाभार्थी कायम राहणार
  • उर्वरित घरांसाठी सुधारित दरानुसार नव्याने लॉटरी
MHADA lottery 2026 News: ठाण्यात स्वत:चं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. चितळसर- मानपाडा येथील म्हाडाच्या गृहप्रकल्पातील घरांच्या किमती आता 2020-21 या वर्षाच्या रेडी रेकनरनुसार ठरवण्यात येणार आहे. त्यामुळे लाखो रुपयांची वाढ झालेल्या घरांच्या किमती पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे.

या निर्णयामुळे संबधित प्रकल्पातीला अनेक इच्छुकांना मोठा फायदा होणार असून या गृहप्रकल्पातील ज्या ४३४ नागरिकांची यापूर्वीच्या सोडतीत निवड झाली आहे. त्यांना कायम ठेवण्यात येणार आहे. मात्र उर्वरित घरांसाठी नव्या दरानुसार सोडत काढण्याचे आदेश देण्यात आले. या संदर्भातील माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली आहेत. Thane Mhada:

ठाणेकरांना मोठा दिलासा

म्हाडाने चितळसर-मानपाडा भागात उभारलेल्या या प्रकल्पात एकूण १,१७३ घरे उपलब्ध झाली होती. त्यापैकी ९३८ घरांसाठी १४ जुलै २०२५ रोजी सोडत काढण्यात आली होती. त्या वेळी २०२५-२६ च्या रेडी रेकनरच्या आधारावर घरांची किंमत ठरवण्यात आली होती. त्यामुळे काही घरांच्या किमती ५१ ते ५२ लाख रुपयांपर्यंत गेल्या होत्या. याच दरावरून नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती.

म्हाडाकडे याबाबत तक्रारीही दाखल करण्यात आल्या. विशेष म्हणजे, एकाच इमारतीमध्ये आणि जवळपास समान क्षेत्रफळाच्या घरांसाठी वेगवेगळे पैसे का द्यावे लागतात, असा प्रश्न लाभार्थ्यांकडून उपस्थित करण्यात आला. त्यामुळे या प्रकरणात एकसमान दर ठरवण्याची मागणी जोर धरू लागली.

वाढलेल्या किमतीवर नागरिकांचा आक्षेप

या तक्रारींची दखल घेत सोमवारी यासंदर्भात बैठक घेण्यात आली. ही बैठक दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झाली. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल, कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. विशाल राठोड यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तक्रारदार नागरिकांचे प्रतिनिधीही बैठकीत सहभागी झाले होते. बैठकीदरम्यान घरांच्या दरातील तफावत दूर करण्याबाबत चर्चा झाली.

एकाच इमारतीतील सारख्या आकाराच्या सदनिकांना केवळ भोगवटा प्रमाणपत्राच्या वेळेमुळे वेगवेगळे दर लावणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका मांडण्यात आली. त्यानंतर २०२०-२१ चा रेडी रेकनर दर आधार मानून घरांची किंमत निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले.

४४ ते ४६ लाखांत घर मिळण्याची शक्यता

नव्या निर्णयामुळे या प्रकल्पातील घरे साधारण ४४ ते ४६ लाख रुपयांच्या आसपास उपलब्ध होऊ शकतात. याआधीच्या दराच्या तुलनेत ही किंमत नागरिकांसाठी नक्कीच दिलासादायक ठरणार आहे. विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी घराच्या किमतीतील काही लाखांची बचतही मोठी बाब असते. या घरांना २०२०-२१ मध्ये अंशतः भोगवटा प्रमाणपत्र मिळाले होते.

McDowell’s-Old Monk प्रकरणात FSSAI अडचणीत? हायकोर्टाने उपस्थित केला लेबलिंगचा मुद्दा

त्यावेळी प्रति चौरस फूट सुमारे १० हजार रुपये दराने किंमत निश्चित करण्यात आली होती. त्यामुळे सदनिकांची किंमत अंदाजे ४४ लाख रुपये ठरली होती. मात्र प्रकल्पाला पूर्ण भोगवटा प्रमाणपत्र २०२५-२६ मध्ये मिळाल्यानंतर उर्वरित घरांच्या किमती वाढल्या.

घराच्या स्वप्नाला पुन्हा आशेचा किरण

यामुळे एकाच प्रकल्पात घर घेणाऱ्या नागरिकांना समान आकाराच्या सदनिकेसाठी वेगवेगळे पैसे मोजावे लागत होते. याच विसंगतीवर नागरिकांनी आक्षेप घेतला होता. आता प्रशासनाने त्यावर तोडगा काढत जुन्या रेडी रेकनरनुसार दर निश्चित करण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांच्या घराच्या स्वप्नाला पुन्हा आशेचा किरण मिळाला आहे.

Mira-Bhayandar: पालिकेची सीबीएसई शाळा पुन्हा लांबणीवर? २४ वर्ग खासगी शाळेला भाड्याने देण्याचा प्रस्ताव, महासभेच्या निर्णयाकडे लक्ष

आधीच निवड झालेल्या ४३४ लाभार्थ्यांना त्यांचा हक्क कायम ठेवून दिलासा देण्यात आला आहे. तर उर्वरित सदनिकांसाठी सुधारित किमतीनुसार नव्याने सोडत काढली जाणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाकडे पुन्हा एकदा घर खरेदी करू इच्छिणाऱ्या नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Thane mhada homes at 44 46 lakh new lottery and revised prices

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 12:15 PM

Topics:  

  • MHADA Lottery
  • MHADA Lottery 2026
  • thane

संबंधित बातम्या

Thane News: मंगळुरू एक्सप्रेसमधून दारूची तस्करी; रेल्वे अटेंडंटकडून ७१ हजारांचा मद्यसाठा जप्त
1

Thane News: मंगळुरू एक्सप्रेसमधून दारूची तस्करी; रेल्वे अटेंडंटकडून ७१ हजारांचा मद्यसाठा जप्त

Eknath Shinde: 6 हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घर; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे एकनाथ शिंदें यांच्या हस्ते भूमिपूजन
2

Eknath Shinde: 6 हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घर; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे एकनाथ शिंदें यांच्या हस्ते भूमिपूजन

Thane Ring Metro: ठाणे रिंग मेट्रो थेट मुंबई, भिवंडी आणि कल्याणला जोडली जाणार; प्रवास होणार वेगवान
3

Thane Ring Metro: ठाणे रिंग मेट्रो थेट मुंबई, भिवंडी आणि कल्याणला जोडली जाणार; प्रवास होणार वेगवान

carrom tournament : गणाधीश चषक स्पर्धेत प्रसन्न गोळेला जेतेपद, सोहमला उपविजेतेपदावर मानावे लागले समाधान
4

carrom tournament : गणाधीश चषक स्पर्धेत प्रसन्न गोळेला जेतेपद, सोहमला उपविजेतेपदावर मानावे लागले समाधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.