नेमकं प्रकरण काय?
घडलेला फसवणुकीचा संपूर्ण प्रकार ऑक्टोबर 2024 ते 30 जून 2025 या कालावधीत घडला. पीडित तरुणाच्या तक्रारीनुसार, काही अज्ञात व्यक्तींनी सुरुवातीला टेलिग्राम/व्हॉट्सअॅपद्वारे त्याच्याशी संपर्क साधला. त्यानंतर ऑनलाइन गेम खेळून आणि त्यात गुंतवणूक करून कमी वेळात दुप्पट-तिप्पट परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. यानंतर भामट्यांनी त्याला तीन वेगवेगळ्या वेबसाइट्सवर नोंदणी करायला सांगितली होती. विश्वास संपादन करण्यासाठी सुरुवातीला त्याला काही रक्कम परतावा म्हणून देण्यात आली होती. त्यानंतर दोन वर्षांच्या कालावधीत तरुणाने भामट्यांनी दिलेल्या विविध बँक खात्यांमध्ये ऑनलाइन व्यवहारांद्वारे तब्बल 1.36 कोटी रुपये जमा केले. जेव्हा त्याने आपली मूळ रक्कम आणि नफा काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा वेबसाइट चालकांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली आणि काही दिवसांतच सर्व संपर्क तोडला.
पुणे-इंदूर महामार्गावर मद्यधूंद ट्रकचालकाचा थरार, पादचाऱ्यांना चिरडले; जखमींचा आकडाही आला समोर
सखोल तपास सुरु
या प्रकरणी ठाणे सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ३ वेबसाईट्स आणि विविध बँक खातेदारांसह एकूण ७ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. सध्या या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांचा आणि संबंधित वेबसाईट्सच्या डिजिटल फूटप्रिंट्सचा सायबर पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
पोलिसांचे आवाहन
कोणतीही अनोळखी व्यक्ती किंवा वेबसाइट जेव्हा बाजारातील दरापेक्षा अवाजवी परताव्याची हमी देते तेव्हा तो 100% घोटाळा असतो. नागरिकांनी कोणत्याही अनधिकृत लिंकवर क्लिक करू नये किंवा अनोळखी बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करू नयेत. ऑनलाइन फसवणूक झाल्यास त्वरित 1930 या राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाइनवर संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पुणे पोलिसांचा कडक आदेश; नेमप्लेट लपविणाऱ्या पोलिसांवर होणार ‘ही’ मोठी कारवाई
Ans: ऑनलाइन गेमिंग आणि गुंतवणुकीच्या आमिषाने त्याची तब्बल 1.36 कोटी रुपयांची फसवणूक झाली.
Ans: टेलिग्राम आणि व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधून भरघोस परताव्याचे आमिष दाखवत बनावट वेबसाइट्सवर गुंतवणूक करण्यास भाग पाडले.
Ans: अनधिकृत लिंकवर क्लिक करू नये, अनोळखी खात्यात पैसे पाठवू नयेत आणि फसवणूक झाल्यास तातडीने 1930 हेल्पलाइन किंवा सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार करावी.






