ठाणे / स्नेहा जाधव काकडे : राष्ट्रवादी काँग्रेस -शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात निवडणूक आयोगाच्या बोधचिन्हाची होळी करण्यात आली. यावेळी, निवडणूक आयोगाने देशातील लोकशाहीचे वाटोळे केले आहे. भाजपने नियुक्त केलेले मुख्य निवडणूक आयुक्त राजीव यांनी आधी पक्षचोरांना आपल्या पंखाखाली घेतले. नंतर मतांची चोरी केली, असा आरोप डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी, लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या मदतीने सत्ताधाऱ्यांनी मत चोरी केली होती, हे सप्रमाणात दाखवून दिले आहे. तसेच, नवी दिल्ली येथे आज शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह सर्व विरोधकांसोबत राहुल गांधी यांनी आंदोलन केले. या सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच अनुषंगाने आज ठाण्यात हे आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी, ” निवडणूक आयोग चोर है; वोट चोर … गद्दी छोड; पहले लढे थे गोरो से… अब लडेंगे वोटोचोरोसे, मुर्दाबाद, इलेक्शन कमिशन मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या. तसेच, निवडणूक आयोगाचे बोधचिन्ह जाळले.
या प्रसंगी डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक आयोगाचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, आम्ही संविधानाच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरलो आहोत. 85 वर्षांचे शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगे हे आज रस्त्यावर उतरले आहेत. त्यांचा हा लढा लोकशाही टिकवण्यासाठी आहे. निवडणूक आयोगाने एकाच घरात विविध जातीधर्माचे 80 लोक रहात असल्याचे दाखविले आहे. एका माणसाला 43 अपत्यांचा पिता दाखविले आहे. हे शक्य आहे का? निवडणूक आयुक्त नेमताना सरन्यायाधीश, पंतप्रधान आणि विरोधी पक्ष नेते यांची समिती असावी, असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश होते.
मात्र, सत्ताधाऱ्यांनी सरन्यायाधीशांना बाहेर काढले. त्यातूनच राजीव हे आयुक्त झाले अन् त्यांनी महाराष्ट्रातील सत्ताबदल घडवून पक्ष चोरांना पंखाखाली घेतले. लोकसभा निवडणुकीत लाखो बोगस मतदार दाखवून मतदानाच्या शेवटच्या तासात 15% मतदार वाढविले. अशी टक्केवारी वाढवूनच मतचोरी केली आहे.
या प्रसंगी, शहराध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिलाध्यक्ष सुजाताताई घाग, महिला कार्याध्यक्ष साबिया मेमन, तस्वीर सिंग , तस्वीर सिंग , गजानन चौधरी, राजू शिंदे, राजेश साटम, राजेश कदम , रचना वैद्य , माधुरी सोनार , कैलास सुरकर, पद्माकर पाटील, सीमाताई, मनीषा करलाद, अभिजीत पवार, मिलिंद बनकर, ज्ञानेश्वर राजपंखे, राजू पाटील , कुलविंदर सिंग सोखी, सुरेंद्र यादव, वैभव खोत, अनिल राजभर, दिलीप लोखंडे, दिगंबर गरुड, डॉ. सुभाष यादव, संतोष साटम, सुनिल कुऱ्हाडे, सुनिल सोनार, वसीम खान, अविनाश खंदारे, विक्रांत घाग , मलिका पिल्ले, मेहरबानो पटेल, इकबाल शेख , जतीन कोठारे , एकनाथ जाधव, संदीप यादव , रिंकू सिंग, राजू चापले , विजयालक्ष्मी दामले , प्रमोद येरुणकर , शिवा काळू सिंग, विजय पवार, विक्रम सिंग , संजीव दत्ता, संदीप ढकोलिया , दत्तात्रय जाधव , प्रभाकर सावंत , सुजाता गवळी , सीमा कदम, कल्पना नार्वेकर , राजेश मिश्रा, प्रदीप साटम, किरण पवार, समाधान माने, दीपक क्षत्रिय, ज्योती निंबारगी, दिलीप उपडे, समीर नेटके, अनिकेत करमाळे, मकसूद खान आदी उपस्थित होते.