Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : ठाणेकरांनो इथे लक्ष द्या; मंगळवारऐवजी आता शुक्रवारी काही भागात पाणीकपात

मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात जलवाहिनी तातडीच्या दुरुस्तीच्या पार्श्वभूमीवर पाणी कपात आहे. त्यात, मंगळवारी स्टेम प्राधिकरणातर्फे शटडाऊन घेतल्यास पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jul 21, 2025 | 06:29 PM
Thane News :  ठाणेकरांनो इथे लक्ष द्या; मंगळवारऐवजी आता शुक्रवारी काही भागात पाणीकपात
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे/स्नेहा काकडे, जाधव : मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात जलवाहिनी तातडीच्या दुरुस्तीच्या पार्श्वभूमीवर पाणी कपात आहे. त्यात, मंगळवारी स्टेम प्राधिकरणातर्फे शटडाऊन घेतल्यास पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, स्टेम प्राधिकरणाने मंगळवार, २२ जुलै रोजीचे दुरुस्तीसाठीचे शटडाऊन आता शुक्रवार, २५ जुलै रोजी घेण्यात येणार असल्याचे कळवले आहे.

या बदललेल्या वेळापत्रकानुसार, आता ठाणे महापालिका क्षेत्रातील काही भागात मंगळवार, २२ जुलै रोजीऐवजी शुक्रवार,२५ जुलै सकाळी  ९.०० वाजल्यापासून शनिवार, २६ जुलै रोजी सकाळी  ९.०० वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या काळात, ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेचे नियोजन करुन टप्याटप्प्याने ठाणे शहरात एक वेळ पाणी पुरवठा सुरू ठेवण्यात येणार आहे.त्याअनुषंगाने घोडबंदर रोड, पातलीपाडा, बाळकुम, ब्रम्हांड, पवार नगर, कोठारी कम्पाउंड, डोंगरी पाडा, वाघबीळ इत्यादी ठिकाणाचा पाणी पुरवठा शुक्रवार दि .२५ जुलै सकाळी ९.०० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत बंद राहील.

ठाण्यातील ‘या’ भागात होणार पाणीकपात

समतानगर, ऋतु पार्क, सिध्देश्वर, इटरनिटी, जॉन्सन, जेल, साकेत, उथळसर, रेती बंदर, कळवा व मुंब्र्याचा काही भाग येथे शुक्रवार दि. २५ जुलै रोजी रात्री ९.०० ते शनिवार, २६ जुलै रोजी सकाळी ९.००वाजेपर्यंत पर्यंत बंद राहील. शहाड येथील अशुध्द जल उदंचन केंद्रावर मीटर बदलण्याचे काम व शहाड येथील अशुध्द जल उदंचन केंद्र येथे होत असलेली पाईपलाईन गळती बंद करणे व इतर आवश्यक कामे महावितरण कंपनीमार्फत करण्यात येणार आहे. त्यासाठी स्टेम प्राधिकऱणाचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य साठा करुन ठेवावा. पाणी जपून वापरावे व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.

Web Title: Thane news thane residents pay attention here water cut in some areas on friday instead of tuesday

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2025 | 06:28 PM

Topics:  

  • mira bhaindar
  • muncipal corporation
  • Thane news
  • water issues

संबंधित बातम्या

Thane News :  पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय  केळकर पुन्हा आक्रमक
1

Thane News : पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय केळकर पुन्हा आक्रमक

Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक
2

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन
3

Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.