Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane Station News: ठाणे रेल्वे स्थानक होणार ‘हायटेक’; प्रवाशांसाठी वाढणार अत्याधुनिक आणि जागतिक दर्जाच्या सुविधा!

ठाणे रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी खासदार नरेश म्हस्के आणि मध्य रेल्वेचे डीआरएम हिरेश मीना यांनी संयुक्त पाहणी केली. पावसाळ्यापूर्वी रेल्वे रुळांवरील पाणी उपशासाठी मायक्रो टनेलचे काम पूर्ण झाले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 21, 2026 | 08:54 PM
ठाणे रेल्वे स्थानक होणार 'हायटेक' (Photo Credit- X)

ठाणे रेल्वे स्थानक होणार 'हायटेक' (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:
  • ठाणे रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार!
  • खासदार नरेश म्हस्के आणि मध्य रेल्वेच्या डीआरएमकडून पाहणी
  • पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याचे आदेश
ठाणे: मुंबई महानगर क्षेत्रातील (MMR) सर्वाधिक गर्दीच्या आणि महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांपैकी एक असलेल्या ठाणे रेल्वे स्थानकाचा (Thane Railway Station) चेहरामोहरा बदलण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कंबर कसली आहे. आगामी पावसाळ्यापूर्वीच्या पूर्वतयारीचा आढावा घेणे, प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करणे आणि वाढती गर्दी नियंत्रित करणे या उद्देशाने स्थानकावरील विविध विकासकामांना गती देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश म्हस्के आणि मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) हिरेश मीना यांनी बुधवारी ठाणे स्थानकाचा संयुक्त पाहणी दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी स्थानकावरील विविध प्रवासी सुविधांचा सविस्तर आढावा घेतला.

पायाभूत सुविधांचा आढावा आणि प्रलंबित प्रकल्पांची पाहणी

पाहणी दौऱ्यादरम्यान खासदार नरेश म्हस्के आणि डीआरएम हिरेश मीना यांनी स्थानकात सुरू असलेल्या अनेक विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. यामध्ये नवीन सार्वजनिक शौचालयांचे निर्माण, प्लॅटफॉर्म क्रमांक ५ आणि ६ वरील सरकते जिने , पिण्याच्या पाण्याची सोय, आपत्कालीन वैद्यकीय कक्ष (Medical Room), पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई आणि १५ डब्यांच्या लोकल ट्रेनसाठी सुरू असलेल्या तांत्रिक तयारीचा समावेश होता. रेल्वे प्रवाशांना अधिक सुरक्षित, सुलभ आणि आधुनिक प्रवासाचा अनुभव मिळावा यासाठी सर्व प्रलंबित कामे तातडीने आणि कालबद्ध मर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश डीआरएम हिरेश मीना यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

आज ठाणे रेल्वे स्थानकातील विविध प्रलंबित प्रश्न, प्रवाशांच्या दैनंदिन गैरसोयी आणि रखडलेल्या विकासकामांना गती देण्यासाठी मी मध्य रेल्वेचे डीआरएम हिरेश मीना आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. ठाणे रेल्वे स्थानक लाखो प्रवाशांच्या रोजच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग… pic.twitter.com/j1q3ZOawbB — Naresh Mhaske (@nareshmhaske) May 20, 2026

कार खरेदीदारांना मोठा झटका! ‘या’ तारखेपासून मारुति सुझुकीच्या गाड्या महागणार; किमतीत तब्बल ३०,००० रुपयांपर्यंत वाढ

पावसाळ्यात रेल्वे रुळांवर पाणी साचणार नाही: खासदार नरेश म्हस्के

पाहणीनंतर बोलताना खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणेकरांसाठी दिलासादायक माहिती दिली. ते म्हणाले, “ठाणे पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या ‘मायक्रो टनेल’चे काम आता पूर्ण झाले आहे. यामुळे दरवर्षी पावसाळ्यात रेल्वे रुळांवर होणाऱ्या जलमय परिस्थितीपासून सुटका होईल आणि लोकल सेवा विस्कळीत होणार नाही.” तसेच, मुलुंडच्या दिशेने जाणाऱ्या नवीन पादचारी पुलाला मंजुरी मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. याशिवाय, ठाणे पूर्व येथील सॅटिस पुलावरून लवकरच ‘टीएमटी’ बस सेवा सुरू केली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

शौचालयांच्या संथ कामावर खासदारांची नाराजी

स्थानकाची पाहणी केल्यानंतर स्टेशन मास्टरांच्या कक्षात रेल्वे प्रशासन, ठाणे महानगरपालिका (TMC), प्रवासी संघटना आणि लोकप्रतिनिधींची एक महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत डी-मार्टच्या सीएसआर (CSR) फंडातून उभारण्यात येत असलेल्या सार्वजनिक शौचालयांच्या कामातील विलंबावर खासदार म्हस्के यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता, हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. पावसाळा तोंडावर असल्याने रेल्वे आणि पालिकेने समन्वय ठेवून काम करावे, जेणेकरून ठाणेकर प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही, यावर या बैठकीत एकमत झाले.

नवीन ड्रायव्हर असाल तर गाडी चालवताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर बाराच्या भावात जाल!

Web Title: Thane railway station set to go hi tech state of the art world class amenities to increase for passengers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 08:53 PM

Topics:  

  • Naresh Mhaske
  • Thane news
  • thane railway station

संबंधित बातम्या

ठाण्याच्या गावदेवी मार्केटमध्ये भीषण आग; बचावकार्यात सुरक्षा रक्षकासह अग्निशमन जवानाचा दुर्दैवी मृत्यू
1

ठाण्याच्या गावदेवी मार्केटमध्ये भीषण आग; बचावकार्यात सुरक्षा रक्षकासह अग्निशमन जवानाचा दुर्दैवी मृत्यू

Thane News : राष्ट्रगीत अपमानाच्या आरोपांवरून ठाण्यात राजकारण तापले; शिवसेनेकडून भाजपवर पलटवार
2

Thane News : राष्ट्रगीत अपमानाच्या आरोपांवरून ठाण्यात राजकारण तापले; शिवसेनेकडून भाजपवर पलटवार

Thane News :  ठाण्यात युवासेना आक्रमक! संजय राऊतांचा पुतळा जाळत जोरदार आंदोलन
3

Thane News : ठाण्यात युवासेना आक्रमक! संजय राऊतांचा पुतळा जाळत जोरदार आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.