मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ लोकलमधून पडल्याने चार प्रवाशांचे बळी गेले तर ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे रेल्वेमुळे जाणाऱ्या बळींचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
रेल्वे प्रशासनाकडून मुंबईचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक ठाणे शहरात खास रेल्वे स्टेशन उभारलं आहे. एक दोन नाही तर तब्बल ११ मजली स्टेशन असणार आहे.
रेल्वे वापरकर्त्यांसाठी आरामदायी प्रवास आणि उत्तम सेवा सुनिश्चित करण्यासाठी, मुंबई विभाग विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी उपनगरीय, मेल एक्स्प्रेस, प्रवासी सेवा, विशेष ट्रेनमध्ये तिकीट तपासणीचे आयोजन करते.
मुलुंडहून डाऊन जलद लोकल धीम्या मार्गावर येत होती तांत्रिक बिघाडामुळे ती मध्येच अडकल्याची माहिती आहे. या बिघाडामुळे डाऊन धीमी, अप धीमी आणि डाऊन जलद या तिन्ही सेवा ठप्प झाल्या आहेत.