Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

म्हणजे पक्ष फोडायचा अन् आमदार गोळा करायचे…; हिंदी भाषा सक्तीवरून अरविंद जगतापांची टीका

महाराष्ट्रासारख्या मराठी भाषिक राज्यात स्थानिक भाषेला योग्य प्रतिष्ठा मिळावी, ही जनतेची अपेक्षा आहे. मात्र, केंद्रीय शैक्षणिक मंडळांच्या (CBSE, केंद्रीय विद्यालय इ.) शाळांमध्ये ‘हिंदी’ ही तिसरी भाषा म्हणून सक्तीने शिकवली

  • By anuradha sagar
Updated On: Jun 21, 2025 | 01:54 PM
म्हणजे पक्ष फोडायचा अन् आमदार गोळा करायचे…; हिंदी भाषा सक्तीवरून अरविंद जगतापांची टीका
Follow Us
Follow Us:

Mumbai Politics: राज्य सरकारने महाराष्ट्रातील शालांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावरून राजकीय पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी तर,  हिंदी भाषा कशी शिकवता हे आम्ही बघतोच, असा खुला इशारा दिला आहे. त्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार मंडळींसह अनेक सेलिब्रिटींकडूनही राज्य सरकारच्या या निर्णयाला वोरोध केला आहे. यात  सचिन गोस्वामी, हेमंत ढोमे , समीर चौगुले यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी हिंदी भाषा सक्तीकरणावर निषेध व्यक्त केला आहे.

कलाकारांनंतर आता  लेखक अरविंद जगताप यांनी सोशल मीडियावर हिंदी भाषा सक्तीकरणाला विरोध करत शेअर केलेली एक पोस्टची चर्चा सुरू झाली आहे.  अरविंद यांनी आपल्या पोस्ट मधून सरकारवर टीकास्त्र डागले आहे.  “पहिलीतील वीस मुलांनी एकत्र यायचं आणि तिसरी वेगळी भाषा निवडायची. मग हे सरकार शिक्षक देणार, म्हणजे पक्ष फोडायचा अन् आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासून शिकायचं म्हणा ना.

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातील पोस्टमन म्हणून अरविंद जगताप यांची ओळख आहे. त्यांच्या पत्रांची चर्चा राज्यभरात सुरू असते.  पण राज्य सरकारच्या हिंदी भाषेच्या सक्तीच्या निर्णयामुळे जगताप यांनी सरकारलाच खडसावले आहे. त्यांची ही पोस्ट व्हायरल होत असून अनेकांच्या कमेंट्सही येत आहे.

हिंदी भाषेची सक्ती कशासाठी?

महाराष्ट्रासारख्या मराठी भाषिक राज्यात स्थानिक भाषेला योग्य प्रतिष्ठा मिळावी, ही जनतेची अपेक्षा आहे. मात्र, केंद्रीय शैक्षणिक मंडळांच्या (CBSE, केंद्रीय विद्यालय इ.) शाळांमध्ये ‘हिंदी’ ही तिसरी भाषा म्हणून सक्तीने शिकवली जाते. अनेक शाळांमध्ये पर्यायी भाषेचा पर्यायच दिला जात नाही, यामुळे मराठी विद्यार्थ्यांवर हिंदी शिकण्याची सक्ती होत असल्याची भावना पालक व अभ्यासक व्यक्त करत आहेत.

अलीकडेच महाराष्ट्र शासनाने नवीन शालेय भाषा धोरण जाहीर केल्यानंतर पुन्हा एकदा ‘हिंदी सक्ती’चा मुद्दा चर्चेत आला आहे. एप्रिल महिन्यात सरकारने इयत्ता १ ते ५ मध्ये हिंदी तिसऱ्या भाषेप्रमाणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सर्वपक्षीय विरोधामुळे तो निर्णय मागे घेण्यात आला. आता नव्या शासन निर्णयात हिंदी “सामान्यपणे तिसरी भाषा” असेल, असे नमूद करण्यात आले आहे, त्यामुळे नव्याने वाद निर्माण झाला आहे.

या शासन निर्णयात ‘अनिवार्य’ शब्द वगळण्यात आला असला, तरी हिंदीला पर्याय म्हणून दुसरी भारतीय भाषा निवडण्यासाठी एका वर्गात किमान २० विद्यार्थ्यांची मागणी आवश्यक असल्याची अट आहे. ही अट पूर्ण करणे अनेक शाळांसाठी अशक्य असल्यामुळे प्रत्यक्षात हिंदीच तिसरी भाषा ठरणार, अशी टीका शिक्षणतज्ज्ञ करत आहेत.

Web Title: That means breaking the party and gathering mlas arvind jagtaps criticism of hindi language compulsion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2025 | 01:54 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • State Governments

संबंधित बातम्या

माळशेज घाट भोरांडे जलविद्युत प्रकल्पाविरोधात गाढव मोर्चा; अदाणी हटाओ, सह्याद्री बचाओच्या घोषणांनी परिसर दणाणला
1

माळशेज घाट भोरांडे जलविद्युत प्रकल्पाविरोधात गाढव मोर्चा; अदाणी हटाओ, सह्याद्री बचाओच्या घोषणांनी परिसर दणाणला

चाकण एमआयडीसीसाठी तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी द्या; आदित्य ठाकरेंची मागणी
2

चाकण एमआयडीसीसाठी तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी द्या; आदित्य ठाकरेंची मागणी

चिखलोली न्यायालय परिसरात अपहरणाचा प्रयत्न भोवला! तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
3

चिखलोली न्यायालय परिसरात अपहरणाचा प्रयत्न भोवला! तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

8 वर्षांची प्रतीक्षा संपली; पिंपरी-चिंचवड पोलिसांना मुख्यालयासाठी मिळाली 50 एकर जागा
4

8 वर्षांची प्रतीक्षा संपली; पिंपरी-चिंचवड पोलिसांना मुख्यालयासाठी मिळाली 50 एकर जागा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.