Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोलिस कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून आत्महत्या; निगडीतील बस डेपोमध्ये आढळला मृतदेह

मागील दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याने सेवा पिस्तुलातून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे शनिवारी (दि. २६) सकाळी उघडकीस आले आहे. यामुळे पिंपरी- चिंचवड पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 26, 2026 | 03:10 PM
पोलिस कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून आत्महत्या; निगडीतील बस डेपोमध्ये आढळला मृतदेह

पोलिस कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून आत्महत्या; निगडीतील बस डेपोमध्ये आढळला मृतदेह

Follow Us
Follow Us:
  • पोलिस कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून आत्महत्या
  • निगडीतील बस डेपोमध्ये आढळला मृतदेह
  • कौटुंबिक वादानंतर घरातून निघून गेले होते
पिंपरी : मागील दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याने सेवा पिस्तुलातून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे शनिवारी (दि. २६) सकाळी उघडकीस आले आहे. यामुळे पिंपरी- चिंचवड पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. निगडीतील ट्रान्सपोर्टनगर बस डेपो परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. कौटुंबिक वादानंतर ते बुधवारी (दि. २३) घरातून निघून गेले होते. विजय मोतीलाल कोळी (वय ३६) असे मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते पिंपरी-चिंचवड पोलिस दलात कार्यरत होते. त्यांच्या पत्नी सारिका विजय कोळी यांनी याबाबत चिखली पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे कोळी हे आरटीपीसी म्हणून कार्यरत होते.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास कोळी घरातून निघून गेले. त्यानंतर ते घरी परतले नाहीत. जाताना त्यांच्याकडे सरकारी पिस्तूल असल्याचे समोर आल्यानंतर पोलिस यंत्रणेने त्यांचा शोध सुरू केला होता. त्यांचे शेवटचे लोकेशन निगडीतील दुर्गादेवी टेकडी परिसरात आढळल्याने त्या भागात पोलिसांनी व्यापक शोधमोहीम राबवली. ड्रोनच्या साहाय्यानेही परिसर पिंजून काढण्यात आला होता.

दरम्यान, शनिवारी सकाळी निगडी ट्रान्सपोर्टनगर येथील बस डेपो परिसरात कोळी यांचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी सरकारी पिस्तूलही मिळून आले. प्राथमिक तपासात त्यांनी त्याच पिस्तुलातून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे. चिखली पोलिस तपास करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : सासवडमध्ये पोलिसांच्या आदेशाला केराची टोपली! रात्री 8 नंतरही DJ च्या तालावर विसर्जन मिरवणुका

विवाहितेने गळफास घेऊन संपवलं जीवन

माहेरहून ५० हजार रुपये आणण्यासाठी सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या कथित शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना विष्णुनगर येथे घडली आहे. अश्विनी महेश भुसारे असे मृत विवाहितेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती महेश नारायण भुसारे, विशाल नारायण भुसारे आणि प्रयागबाई नारायण भुसारे यांनी संगनमताने अश्विनी यांच्याकडे माहेरहून ५० हजार रुपये आणण्यासाठी वारंवार तगादा लावला. पैसे न आणल्यास जीवे मारण्याची धमकी देत मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या सततच्या त्रासाला कंटाळून अश्विनी यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी त्यांचे भाऊ गोपाळ नामदेव नाटकर यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमुळे विष्णुनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: An incident involving the suicide of a police employee has occurred in pimpri chinchwad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 03:09 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Police News
  • suicide news

संबंधित बातम्या

बीड हादरलं! शिंदे गटाचे बडे नेते शिवाजीराव शिंदे यांची आत्महत्या; 4 महिन्यांपूर्वी झाला होता प्राणघातक हल्ला
1

बीड हादरलं! शिंदे गटाचे बडे नेते शिवाजीराव शिंदे यांची आत्महत्या; 4 महिन्यांपूर्वी झाला होता प्राणघातक हल्ला

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
2

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त
3

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

साईबाबांच्या नगरीत ‘मॅफेड्रोन’ ड्रगचा शिरकाव! छुप्या टोळ्या सक्रिय, पालकांसह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण
4

साईबाबांच्या नगरीत ‘मॅफेड्रोन’ ड्रगचा शिरकाव! छुप्या टोळ्या सक्रिय, पालकांसह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.