Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhaskar Jadhav : रत्नागिरीतील सर्व तालुक्यांचा दुष्काळग्रस्तांमध्ये समावेश करा, भास्कर जाधवांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

Bhaskar Jadhav : रत्नागिरी जिल्ह्यातील सहा तालुक्यांचा तात्काळ दुष्काळग्रस्तांच्या यादीत समावेश करावा अशी मागणी आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे. त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिले आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Sep 29, 2026 | 08:37 PM
Bhaskar Jadhav : रत्नागिरीतील सर्व तालुक्यांचा दुष्काळग्रस्तांमध्ये समावेश करा, भास्कर जाधवांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

Bhaskar Jadhav : रत्नागिरीतील सर्व तालुक्यांचा दुष्काळग्रस्तांमध्ये समावेश करा, भास्कर जाधवांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

Follow Us
Follow Us:
  • सहा तालुक्यांचा तातडीने समावेश करण्याची मागणी
  • भात व नाचणी पिकांचे नुकसान
  • जाधवांकडून शासनावर दबाव
चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण अत्यंत कमी व अनियमित राहिल्याने भात आणि नाचणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असतानाही जिल्ह्यातील केवळ तीन तालुक्यांचा दुष्काळग्रस्त (Drought) तालुक्यांच्या यादीत समावेश करण्यात आल्याने शिवसेना नेते, आमदार भास्करराव जाधव  (Bhaskar Jadhav) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
गुहागर, चिपळूण, खेड, दापोली, मंडणगड आणि लांजा या सहा तालुक्यांचा तातडीने दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाधव यांनी केली आहे.

याच प्रश्नावर सोमवारी झालेल्या रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार भास्करराव जाधव यांनी आक्रमकपणे आवाज उठवला होता. जिल्ह्यातील प्रत्यक्ष पर्जन्यमान, शेतीची परिस्थिती आणि भात-नाचणी पिकांचे नुकसान लक्षात घेता उर्वरित नुकसानग्रस्त तालुक्यांचाही दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश करावा, असा ठराव त्यांनी बैठकीत मांडला. त्यानंतर आज मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र देत त्यांनी या मागणीचा पाठपुरावा अधिक तीव्र केला आहे.

राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात आला असताना रत्नागिरी जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील शेतकऱ्यांना मात्र मदतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. हा निर्णय प्रत्यक्ष परिस्थितीशी विसंगत असून संबंधित शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असल्याचे आमदार जाधव यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.

सहा तालुक्यांत प्रत्यक्ष पंचनामे करा

शासनाकडे पर्जन्यमानाची आकडेवारी उपलब्ध आहे. गावागावांत पिकांचे झालेले नुकसान स्पष्टपणे दिसत आहे. प्रशासनालाही प्रत्यक्ष परिस्थितीची जाणीव आहे. असे असताना केवळ कागदोपत्री निकषांचा आधार घेऊन नुकसानग्रस्त तालुक्यांना दुष्काळी मदतीपासून वंचित ठेवणे स्वीकारार्ह नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

तसेच या सहा तालुक्यांमध्ये पीक नुकसानीचे प्रत्यक्ष पंचनामे करून प्रत्येक पात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्याला त्वरित आणि पुरेशी आर्थिक नुकसानभरपाई द्यावी, दुष्काळग्रस्त तालुक्यांना लागू असलेल्या सर्व सवलती, मदत आणि शासकीय उपाययोजनांचा लाभ या शेतकऱ्यांना मिळावा, अशीही मागणी त्यांनी या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

‘केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून…’; महारोजगार मेळाव्यात काय म्हणाले CM Devendra Fadnavis?

जाधवांकडून शासनावर दबाव

जिल्हा नियोजन समितीतील आक्रमक भूमिका, त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांना थेट पत्र आणि सहा तालुक्यांसाठी ठाम मागणी यामुळे रत्नागिरीतील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आमदार भास्करराव जाधव यांनी शासनावर दबाव वाढवला आहे. आता राज्य सरकार या मागणीवर काय निर्णय घेते, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Maharashtra Drought: २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांसाठी मोठा ॲक्शन प्लॅन, भरत गोगावले म्हणाले…

Web Title: Bhaskar jadhav all talukas in ratnagiri drought affected areas

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 08:37 PM

Topics:  

  • Bhaskar Jadhav
  • CM Devedra Fadnavis
  • drought news

संबंधित बातम्या

Maharashtra Drought: २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांसाठी मोठा ॲक्शन प्लॅन, भरत गोगावले म्हणाले…
1

Maharashtra Drought: २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांसाठी मोठा ॲक्शन प्लॅन, भरत गोगावले म्हणाले…

हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लांबणीवर, आयटी कर्मचारी नाराज; ‘हा’ टप्पा तातडीने सुरू करण्याची मागणी
2

हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लांबणीवर, आयटी कर्मचारी नाराज; ‘हा’ टप्पा तातडीने सुरू करण्याची मागणी

Maharashtra Cabinet Decision : माजी अग्निवीरांना सरकारी नोकरीत 10 % आरक्षण तर दुष्काळाबाबत नवे धोरण लागु
3

Maharashtra Cabinet Decision : माजी अग्निवीरांना सरकारी नोकरीत 10 % आरक्षण तर दुष्काळाबाबत नवे धोरण लागु

Amravati News: दुष्काळी परिस्थितीत प्रशासन सज्ज! जिल्हाधिकाऱ्यांचे दुष्काळ कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश
4

Amravati News: दुष्काळी परिस्थितीत प्रशासन सज्ज! जिल्हाधिकाऱ्यांचे दुष्काळ कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.