दोन एसटी बसमध्ये चिरडून 17 वर्षीय मुलाचा मृत्यू
सांगली : येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथील १८ वर्षीय विद्यार्थ्याचा राजस्थानच्या कोटा शहरात १ जानेवारीला अपघाताने मृत्यू झाला आहे. कुटुंबातील एकुलत्या मुलाच्या मृत्यूने खंडागळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. बारावी परीक्षेच्या तोंडावरच त्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. केशवराज खंडागळे असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.
येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) सेवानिवृत्त मुख्याध्यापक गुणवंत खंडागळे यांचा केशवराज हा नातू होता. त्याला चांगले शिक्षण मिळावे, यासाठी आजोबांनी जीवापाड मेहनत घेतली. त्याच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करताना दहावीनंतर कोटा येथे कोचिंग क्लासमध्ये पाठविले. केशवराजची बहीण वैष्णवी कराडमध्ये शिकत आहे. शेतकरी वडील अमोल काही दिवस कोटा येथे केशवराजसोबत, तर वैष्णवीसाठी काही दिवस गावात राहत होते. केशवराजची आई रूपा या मात्र मुलासोबत कोटा येथेच राहत होत्या.
३१ डिसेंबरला केशवराज लवकरच परत येतो, असे आईला सांगून घरातून बाहेर पडला. रात्री उशिरापर्यंत ताे न परतल्याने आईने शोध सुरू केला. कोटा येथील ओळखीच्या मराठी माणसांची मदत घेतली पण तो सापडला नाही. त्यांनी कोटा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. ही बातमी कळताच वडील अमोल हेदेखील त्वरित कोटाकडे रवाना झाले. याचदरम्यान कोटापासून दिल्लीच्या दिशेने सुमारे ८० किलोमीटर अंतरावर रेल्वे रुळांवर केशवराजचा मृतदेह सापडला. त्याचा अपघाती मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगताचं खंडागळे कुटुंबाला धक्क बसला. केशवराजचा मृतदेह रुळांवर सापडल्याने हा अपघात आहे की घातपात, याविषयी कुटुंबियांच्या मनात सांशकता आहे. सखाेल तपासानंतर कारण स्पष्ट हाेणार आहे.
हे सुद्धा वाचा : ते दोघे आले, मिरची पूड डोळ्यात टाकली अन्…; शिक्रापुरातील खळबळजनक प्रकार
आजाेबांना बसला मानसिक धक्का
केशवराजचा मृतदेह गावाकडे आणून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. केशवराज एकुलता हाेता. मुलाच्या मृतदेहासोबत रुग्णवाहिकेतून २२ तास प्रवास करण्याची वेळ वडील अमोल यांच्यावर आली. आजोबा गुणवंत यांना नातवाच्या अपघाती मृत्यू झाल्याचे समजताच त्यांना मानसिक धक्का बसला. नातवाचा उच्च अधिकारी बनल्याचे पाहण्याचे त्यांचे स्वप्न अधूरेच राहिले.
महिला पोलिसाला कारने उडवले
राज्यात अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाईनिमित्त नाकाबंदी करून कारवाई करत असताना एका भरधाव आलिशान कारने कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक विभागातील महिला कर्मचाऱ्याला उडविल्याची धक्कादायक घटना घडली. यात महिला कर्मचारी गंभीररित्या जखमी झाल्या असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आलिशान कारमध्ये चौघेजन असल्याचे माहिती समोर आली. महिला अंमलदार दीपमाला राजू नायर (वय ३५) असे गंभीर जखमी झालेल्या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.