Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akola Constituency: प्रकाश आंबेडकरांचा डाव फसला? अकोल्यातून वंचितच्या उमेदवाराची माघार

अकोला पश्चिम मतदारसंघातून वंचितचे उमेदवार डॉ. जिशान हुसेन यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.  डॉ. जिशान हुसेन यांनी माघार घेतल्यामुळे  अचानक उमेदवारी मागे घेतल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा होऊ लागल्या आहेत.  

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 04, 2024 | 09:30 PM
Akola Constituency: प्रकाश आंबेडकरांचा डाव फसला? अकोल्यातून वंचितच्या उमेदवाराची माघार
Follow Us
Close
Follow Us:

अकोला: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता.राज्यभरातून अनेक उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतले. अशताच अकोल्यातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या अकोला पश्चिम मतदारसंघातून वंचितचे उमेदवार डॉ. जिशान हुसेन यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.  डॉ. जिशान हुसेन यांनी माघार घेतल्यामुळे  अचानक उमेदवारी मागे घेतल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा होऊ लागल्या आहेत.

डॉ. जिशान हुसेन यांनी माघार घेतल्यानंतर हुसेन आणि काँग्रेसचे उमेदवार साजिद खान पठाण यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सामाजिक कार्यकर्ते जावेद जकेरिया यांच्या मुलीच्या लग्नातील हा फोटो असल्याचे सांगण्यात येत आहे. या फोटोच्या माध्यमातून  हुसेन आणि साजिद खान पठाण यांच्यात दोघांमध्ये मनोमिलन झाल्याचं दिसत आहे. त्यांच्यातील या सहमतीनंतर त्यांच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर होत आहे.

हेही वाचा:  Mahim Constituency Politics: सदा सरवणकरांनी घेतला निर्णय; माहीममध्ये तिरंगी लढत अटळ

डॉ. जिशान हुसेन हे काँग्रेसचे नेते आहेत. काँग्रेसकडून तिकीट मिळण्यासाठी ते इच्छुक होते. पण काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्यामुळे हुसेन नाराज होते. ते काँग्रेसकडून इच्छुक होते. मात्र पक्षाने त्यांचं तिकीट नाकारलं. हुसेन यांची उमेदवारी नाकारून साजिद खान पठाण यांना संधी दिली. त्यामुळे नाराज असलेल्या हुसेन यांनी बंडखोरी केली. त्यांनी वंचितकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अखेर आज अर्ज माघार घेण्याच्या अंतिम दिवशी डॉक्टर हुसेन यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे वंचितला या मतदारसंघात उमेदवार राहिला नाही. आता या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी कुणाला पाठिंबा देते हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे.

त्याचबरोबर लातूरच्या औसा विधानसभा मतदारसंघातही ठाकरे गटातून बंडखोरी करून वंचितकडून तिकीट मिळवलेल संतोष सोमवंशी यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. ठाकरे गटाच्या महिला उपनेत्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या मध्यस्थीने संतोष सोमवंशी यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याची माहिती आहे.  विशेष म्हणजे संतोष सोमवंशी यांनी औसा विधानसभेचे ठाकरे गटाचे उमेदवार दिनकर माने यांना जाहीर पाठिंबाही दिला आहे.

हेही वाचा: 5 नोव्हेंबरपासून CAT 2024 चे हॉल तिकीट करता येणार डाउनलोड, जाणून घ्या प्रक्रिया

Web Title: The candidate of vanchit withdrew his nomination form from akola nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2024 | 09:30 PM

Topics:  

  • Congress
  • Prakash Ambedkar
  • Vanchit Bahujan Aghadi

संबंधित बातम्या

संगमनेरमध्ये दहशत निर्माण करण्याचा डाव, गावगुंडांचा बंदोबस्त करा; बाळासाहेब थोरातांचे आवाहन
1

संगमनेरमध्ये दहशत निर्माण करण्याचा डाव, गावगुंडांचा बंदोबस्त करा; बाळासाहेब थोरातांचे आवाहन

बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची…; काँग्रेसचा बडा नेता संतापला
2

बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची…; काँग्रेसचा बडा नेता संतापला

हर्षवर्धन सपकाळांचं काँग्रेस पदाधिकाऱ्यांना महत्वाचं आवाहन, म्हणाले; आता 272 जागांवर…
3

हर्षवर्धन सपकाळांचं काँग्रेस पदाधिकाऱ्यांना महत्वाचं आवाहन, म्हणाले; आता 272 जागांवर…

Amit Shah: “कोर्टाने निर्दोष सोडले नाही तोवर…”; अमित शाह संसदेत गरजले, विरोधकांनी बिल फाडले अन् थेट…
4

Amit Shah: “कोर्टाने निर्दोष सोडले नाही तोवर…”; अमित शाह संसदेत गरजले, विरोधकांनी बिल फाडले अन् थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.